Toll Tax New Rules 2026 : राष्ट्रीय महामार्गावरून (National Highway) प्रवास करणाऱ्या लाखो वाहनचालकांसाठी केंद्र सरकारने दिलासादायक निर्णय घेतला आहे. Toll Tax New Rules अंतर्गत टोल दरांमध्ये मोठी सवलत देण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला असून, काही परिस्थितींमध्ये वाहनचालकांना थेट 70% पर्यंत Toll Discount मिळणार आहे. हा निर्णय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने घेतला असून याबाबत अधिकृत अधिसूचना देखील जारी करण्यात आली आहे.
सध्या देशभरात मोठ्या प्रमाणावर राष्ट्रीय महामार्गांचे रुंदीकरण आणि आधुनिकीकरणाचे काम सुरू आहे. या बांधकामांमुळे प्रवाशांना वाहतूक कोंडी, धूळ, अपघातांचा धोका आणि वेळेचा अपव्यय सहन करावा लागतो. याच पार्श्वभूमीवर सरकारने National Highway Fee Rules 2008 मध्ये महत्त्वपूर्ण सुधारणा करत प्रवाशांना आर्थिक दिलासा देण्याचा निर्णय घेतला आहे.
2-Lane Highway वर 70% सूट
नवीन नियमांनुसार, ज्या Two Lane National Highway चे Four Lane Highway मध्ये रूपांतर सुरू आहे, अशा ठिकाणी वाहनचालकांना पूर्ण टोल भरावा लागणार नाही. बांधकाम सुरू झाल्याच्या तारखेपासून ते प्रकल्प पूर्ण होईपर्यंत प्रवाशांना केवळ 30% Toll Tax भरावा लागेल. म्हणजेच थेट 70% Toll Discount मिळणार आहे. हा नियम सध्या सुरू असलेल्या तसेच नवीन प्रकल्पांनाही लागू राहील.
Four Lane ते Six/Eight Lane साठी 25% सवलत
जर एखाद्या Four Lane Highway चे Six Lane किंवा Eight Lane मध्ये रुंदीकरण सुरू असेल, तर अशा रस्त्यांवर टोल दरांमध्ये 25% सूट दिली जाईल. म्हणजेच वाहनचालकांना 75% टोल भरावा लागेल. याशिवाय रस्त्याचा संपूर्ण खर्च वसूल झाल्यानंतर केवळ 40% Toll घेण्याचा नियम आधीपासूनच लागू आहे.
देशभरात 25–30 हजार किमी महामार्गांचे काम | Toll Tax New Rules 2026
सरकारी आकडेवारीनुसार, सध्या देशात सुमारे 25 ते 30 हजार किलोमीटर लांबीच्या दोन पदरी महामार्गांचे चौपदरीकरण सुरू आहे. यासाठी जवळपास 10 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक केली जात आहे. या प्रकल्पांमुळे मालवाहतूक (Freight Transport) अधिक वेगवान होणार असून, व्यावसायिक वाहनांचा सरासरी वेग 30–35 km/h वरून 50 km/h पेक्षा अधिक होण्याची अपेक्षा आहे.
Highway Construction सुरू असलेल्या रस्त्यांवर प्रवाशांकडून पूर्ण टोल वसूल करणे अन्यायकारक ठरू नये, यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता राष्ट्रीय महामार्गावर प्रवास करणाऱ्यांना कमी Toll Tax, वेगवान प्रवास आणि आर्थिक दिलासा मिळणार आहे.