TOD Meter Update : घरगुती वीज ग्राहकांना T.O.D Meter मध्ये मिळणार का आर्थिक सवलत ? जाणून घ्या !

TOD Meter Update : विज नियामक आयोगाच्या निर्देशाने आणि भारत सरकारच्या अनुदानाने महावितरण कंपनीने आता महाराष्ट्रात वीज ग्राहकांना आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित नवीन टीओडी  मीटर बसवण्याची सुरुवात केलेली आहे.त्यामुळे आता राज्यात स्मार्ट प्रीपेड वीज मीटर लावण्यात येणार नाही हे निश्चित झाले आहे. T.O.D. मीटर पोस्टपेड प्रणालीवर आधारित असून यासाठी वीज ग्राहकांना दर महिन्याला नियमित वीज बिल भरावे लागेल,मात्र टीओडी मीटर मधून वीज युनिट वापर आणि खर्च ग्राहकांना त्यांच्या मोबाईल मधून अपडेट स्वरूपात दर दिवशी मिळणार आहे.

यापूर्वी राज्यात उद्योगांना तेवढी मीटर मधून वीज पुरवठा आणि रात्री वीज वापरावर प्रति युनिट दोन रुपयाची सूट देण्यात येत आहे तर दुसरीकडे घरगुती वीज ग्राहकांना तेवढी मीटर मधून वीज वापरताना 300 युनिट मर्यादेपेक्षा जास्त युनिटवर किती सवलत मिळेल याबाबत सध्या संभ्रमाची परिस्थिती आहे.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now

मात्र महावितरण कडून हे आधुनिक टाईम ऑफ द डे अर्थातच टीओडी मीटर वीज ग्राहकांना अगदी मोफत बसून देण्यात येणार आहे.यासाठी वीज ग्राहकांना कोणताही शुल्क महावितरण अदा करावा लागणार नाही.

पण वीज ग्राहकांना युनिट वापरावर काय चालत मिळेल यावर महावितरण कडून अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.तर आपण या माध्यमातून जाणून घेऊया की,हे Time Of Day Meters (T.O.D.)मीटर सिस्टम काय आहे आणि महावितरण कडून याला का उपलब्ध करण्यात येत आहे…..

महाराष्ट्रात महावितरण कंपनीकडून आपल्या वीज ग्राहकांच्या घरात लागलेल्या पूर्वीच्या वीज मीटरच्या जागी टीओडी मीटर बसवून देत आहे.नवीन वीज जोडणी, तसेच जुने प्रीपेड वीज मीटर,सदोष आणि नादुरुस्त वीज मीटरच्या जागी नवीन आणि आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित टाईम ऑफ डे मीटर लावण्याची राज्यात सुरुवात करण्यात आलेली आहे.

या नवीन वीज मीटर प्रणालीतून नवीन ग्राहकांना आणि मीटर संबंधात तक्रारी असलेल्या ग्राहकांना टीओडी मीटर देण्यास प्राथमिकता दिली जात आहे.सोबतच सर्व ग्राहकांच्या घरी आता हे T.O.D.मीटर लावण्यात येणार आहे.

याव्यतिरिक्त व्यावसायिक आणि मोठ्या उद्योजकांना वीज मीटर संदर्भात तक्रारी वाढल्याने,आता उद्योगांमध्ये हे टीओडी मीटर प्रणाली लागू करण्यात आलेली आहे.

तेथे रात्री वीज वापरावर प्रति युनिट 2 रुपये सूट ची सवलत देण्यात येत आहे.मात्र घरगुती TOD Meter युनिट सवलत सध्या महावितरणकडून घोषित झाली नाही.

  • महावितरण कडून वीज ग्राहकांना हे डिजिटल वीज मीटर अगदी मोफत बसवून देण्यात येणार असल्याची प्राथमिक शक्यता आहे.
  • या मीटरच्या शुल्क संबंधात महावितरण कडून अद्यापही कोणतीही घोषणा करण्यात आली नाही.
  • केंद्र आणि राज्य सरकार महावितरण कंपनीला ग्राहकांना ही वीज मीटर देण्यासाठी अनुदान देईल.
  • महावितरण कडून राज्य सरकारला मिळणाऱ्या महसुलातून महावितरणचे हे मीटर वर होणारे आर्थिक खर्च भागविले जाणार आहे.
  • केंद्र सरकारकडून TOD.मीटर निर्मिती साठी विविध कंपन्यांना ठेके देण्यात आले आहे.
  • या ठेकेदार कंपनीकडूनच महावितरण ला टीओडी मीटर उपलब्ध होणार आहेत,पण हे आधुनिक डिजिटल वीज मीटर महावितरणचे मालकीचे राहणार आहे.

TOD Meter Update : टीओडीमीटर मुळे वीज ग्राहकांना हे होणार फायदे होणार असल्याचे दावे.

टीओडी वीज मीटर मुळे महाराष्ट्रातील वीज ग्राहकांना वेगवेगळे फायदे होणार आहे.असे दावे केले जात आहे.घरात वीज मीटर वापरताना ग्राहकांना दर दिवशी आणि रात्री वीज युनिट्स किती वापरले जात आहे,किती युनिट खर्च होत आहे याचा मोजमाप करूनच पोस्टपेड बिल महावितरण करून देण्यात येणार आहे.

सोबतच वीज ग्राहकांना त्यांच्या मोबाईल मध्ये असलेल्या महावितरणच्या एप्लीकेशन मुळे युनिट खर्च संदर्भात दर दिवशी अपडेट माहिती मिळणार आहे.सोबतच निर्धारित वेळेत वीज वापर करताना महावितरण ग्राहकांना आर्थिक सवलतही देणार आहे.

मात्र किती आणि कशी सवलत मिळेल यावर अद्याप अधिकृत माहिती सार्वजनिक करण्यात आलेली नाही.

  • घरगुती टीओडी वीज मीटर बसविण्यासह महावितरण सोलर पावर प्रकल्पांसाठी नेट मीटर सिस्टम आणि टेक्निकल एअररहीत अचूक मीटर रिडींग सिस्टम देणार आहे. यामुळे वीज वापर ची अपडेट माहिती उद्योग व्यवसायासाठी वीज वापरणाऱ्या ग्राहकांना टीओडी मीटर मुळे मिळणार आहे.
  • हे मीटर बसविल्यानंतर ग्राहकांना वीज युनिट खर्च विजेचा एकूण वापर, आणि टीओडी मीटर मधून युनिट रीडींग हे ग्राहकांना महावितरण कडून लावण्यात येणाऱ्या या डिजिटल मीटर मधून दररोज उपलब्ध होणार आहे.यासाठी मोबाईल ॲप्लिकेशनची सुविधा वीज ग्राहकांना मिळणार आहे.
  • अगदी काही मिनिटांमध्ये घरगुती आणि व्यवसायिक वीज ग्राहकांना ते वापरत असलेल्या टाईम ऑफ डे अपडेट वीज मीटर मध्ये एकूण किती युनिट वीज वापरण्यात आली आहे,किती युनिट खर्च होत आहे,आणि टीओडी मीटर मध्ये युनिटची किती रीडिंग झालेली आहे, याची अपडेट माहिती मिळेल.

वीज ग्राहकांना आर्थिक सवलत मिळण्यासाठी न्यायालयीन कारवाई सुरू.

उल्लेखनीय म्हणजे घरगुती TOD.मीटर लावण्यापूर्वीच महाराष्ट्रात औद्योगिक क्षेत्रांमध्ये या मीटरचा वापर मोठ्या प्रमाणात सुरू झालेला आहे.महावितरण कडून सर्व प्रकारचे औद्योगिक इंडस्ट्रीज ना रात्रीच्या वेळेत तेवढी मीटर मधून वीज वापर करताना प्रति युनिट दोन रुपयांचे सूट देण्यात येत आहे.

मात्र महावितरण कडून घरगुती वीज वापरात सवलत देण्यासंदर्भात घोषणा होत नसल्याने आणि दुसरीकडे औद्योगिक वापरातील प्रति युनिट सूट देण्यात येत असल्याने महावितरणच्या या धोरणाचा ग्राहक मंचाने विरोध सुरू केलेला आहे.कारण सध्या औद्योगिक वापराच्या तुलनेत घरगुती वीज वापर युनिट रेट जास्त आहे.

यामुळे याचा विरोध होत आहे.आता टाईम ऑफ डे मीटर हे आधुनिक मीटर बसविण्यात येत असल्याने घरगुती वीज ग्राहकांना सुद्धा महावितरण करन रात्रीच्या वेळी वीज वापरताना प्रति युनिट दोन रुपयांची सवलत देण्यात यावी अशी मागणी ग्राहक मंचाचे पदाधिकारी सचिव विलास देवळे यांनी विज नियामक आयोग आणि महावितरण कंपनीकडे केलेली आहे.

उल्लेखनीय म्हणजे महाराष्ट्राच्या शेजारी असलेल्या काही राज्यात घरगुती ग्राहकांना वीज पुरवठा करणारी यंत्रणा 300 युनिट पेक्षा जास्त वीज वापर असल्यास 12 रुपये ते 13 रुपये प्रति युनिट असा दर आकारण्यात येत आहे.

त्यामुळे महाराष्ट्रात 300 युनिट पर्यंत आणि त्यापेक्षा जास्त युनिट वापर प्रणालीत कायद्यानुसार वीज मंडळाने घरगुती ग्राहकांना पोर्टेबिलिटी युनिट सुविधा द्यावी,आणि घरगुती मीटर वीज ग्राहकांना प्रति युनिट सवलत द्यावी,अशी मागणी करण्यात आलेली आहे.

दरम्यान या संदर्भात वीज नियमन आयोगात सुनावणी सुद्धा सुरू आहे. त्यामुळे महावितरण कंपनीचे अधिकारी टीओडी.

घरगुती वीज मीटर आणि युनिटवर सवलत देण्यासंदर्भात अधिकृतपणे माहिती देत नाही, त्यामुळे सध्या घरगुती टीओडी मीटर प्रणाली मध्ये 300 युनिट वापर मर्यादा वर वीज ग्राहकांना किती आर्थिक सवलत मिळेल यावर काहीशी संभ्रमाची परिस्थिती आहे.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now
Sharing Is Caring:

Leave a Comment

seventeen − 11 =

Whatsapp ने लॉंच किया नया फीचर , Whatsapp Channels. 5 पड़ावों से होकर गुजरता है रिश्ता. देश के सबसे महंगे वकील Harish Salve ने 68 वर्ष की उम्र में की तीसरी शादी. रूस ने मार गिराए यूक्रेन के  3  ड्रोन. रूस का लूना – 25 चांद पर क्रैश.