पांढरकवडा : दि. २५ ऑक्टोबर रोजी Tipeshwar Sanctuary क्षेत्रातील ४२ गावातील शेतक-यांच्या समस्यांचे निवेदन मा. वनमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांना प्राप्त झाल्यानंतर जगाचा पोशिंदा जगला पाहिजे’ या अर्थी त्याची तात्काळ दखल घेवून वांजरी, वा-हा, कवठा, सावरगाव, मंगी, अधारवाडी, बोरी, पिंपळशेंडा, खैरी आणि इतर साधारणपणे ४२ गावातील ग्रामस्थांसह.
मा. वनमंत्री यांचे स्वीय सहाय्यक मा. श्री. संतोषजी अतकरे यांच्या मार्गदर्शनात व मा. वनसंरक्षक यांच्या अध्यक्षते खाली वनभवन पांढरकवडा येथे समस्याचे निराकरण करण्याकरिता जनसंवाद साधण्यात आला. टिपेश्वर अभयारण्य क्षेत्रामधील जवळपास गावांचा विकास व्हावा आणि वनसंपदेचे रक्षण व्हावे. याकरिता.
मा. वनमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी ‘शामाप्रसाद मुखर्जी जनवन योजना अंमलात आणून सर्व गावांमध्ये समित्या स्थापन करून वन्यप्राणी व शेतकरी यांच्यामधील संघर्षाचा समूळ उच्चाटनाचा वीडा उचलला सर्व गावांमध्ये समिती स्तरावर कृती आराखडा तयार करून, मावा नाटे मावा राज या उक्ती प्रमाणे योजनेची अमलबजावणी करण्यास निधी देण्यात येतो.
वनभवन येथे झालेल्या सभेमध्ये उपस्थित २४० शेतकरी व ४२ गावातील प्रतिनिधी यांचे मत ऐकून घेण्यात आले पीक नुकसान निधी, झटका बैटरी, शेती साहित्य, जनवन समिती, तारकुंपण, आरोग्य सुविधा अशा छोट्या मोठ्या प्रत्येक विषयावर सखोल चर्चा मा. वनमंत्री यांचे स्वीय सहाय्यक संतोषजी अतकरे व मा. वनसंरक्षक (मुख्य) यांनी तात्काळ निर्णय घेवून शासन आपल्या दारी असल्याचे सिद्ध केले.
सर्व शेतकऱ्यांचे प्रश्न, समस्या, ऐकल्यानंतर मा. संतोषजी अतकरे (स्वीय सहाय्यक, वनमंत्री) यांनी शासन निर्णय व त्यापलीकडे असणाऱ्या समस्या जसे की गायरान जमीनीवर वनविभागामार्फत गवत लागवड करणे, झटका बैटरी खरेदी करिता लाभार्थी यांचे खात्यात DBT: प्रणाली द्वारे निधी देणे. कृती आराखडा बदलवून सुधारीत कृती आराखडा तयार करणे संदर्भात मार्गदर्शन केले.
सोबतच मा. मुख्यवनसंरक्षक यांनी सुद्धा वनविभाग व शेतकरी यांच्यातील कर्मचारी यांनी दुवा बनून अधिकाअधिक संबंध दृढ करण्यासंदर्भात मार्गदर्शन केले. समस्या निकाली निघाल्याने उपस्थित सर्व शेतकरी व प्रतिनिधींमध्ये उत्साहाचे वातावरण पहायला मिळाले. या जनसंवाद सभेमध्ये मा. वनमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचे स्वीय सहाय्यक मा. संतोषजी अतकरे, मा. प्रकाशजी दरणे वनमंत्री यांचे कार्यालय व वनविभागाकडून श्री. वसंत घुले (मुख्य वनसंरक्षक) श्री. किरण जगताप (उपवनसंरक्षक) श्री. उत्तम फड (विभागीय वनाधिकारी श्री मयुर सुरवसे ( वनक्षेत्रपाल) श्री. रणजीत जाधव श्री. मनिष पवार (वनक्षेत्रपाल) श्री. सुरेश मुडाले (वन रक्षक) श्री सचिन येडमे ( वनरक्षक) हजर होते. शेतकऱ्यांची बाजू मांडण्याकरिता श्री. डंभारे, श्री. योगेश शेडमाके, श्री. संतोषभाऊ बोडेवार, श्री मोहन कनाके, श्री. समीरजी मुस्तीलवार श्री. शिवारेड्डीकाका येल्टिवार, सावरगावचे सरपंच तथा अनेक जनप्रतिनिधी उपस्थित होते.