दिग्रस येथे “डॉ.बाबासाहेब आंबेडकर भवन” लोकार्पण सोहळा थाटात संपन्न.

दिग्रस येथे “डॉ.बाबासाहेब आंबेडकर भवन” लोकार्पण सोहळा थाटात संपन्न.

दिग्रस: दिग्रस येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर भवन या नवनिर्मित वास्तुचे समाजार्पण मृद व जलसंधारण तथा पालकमंत्री संजय राठोड यांचे शुभहस्ते नुकतेच संपन्न झाले . माजी पंचायत समिती सभापती मिलिंद मानकर अध्यक्षस्थानी होते. जिल्हा नियोजन समिती सदस्य सुधीर देशमुख , शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख हरिहर लिंगनवार , तालुका प्रमुख उत्तमराव ठवकर.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now

शिवसेन उपजिल्हा प्रमुख राजकुमार वानखडे , डॉ. संजय बंग , माजी नगराध्यक्ष नूर मुहम्मद खान , महाराष्ट्र बांबू मिशनचे सदस्य डॉ. मनोज टेवरे , मंत्री महोदयाचे स्वीय सहाय्यक अमोल राठोड , संजीव चोपडे. मुख्याधिकारी ज्ञानेश सोनवाणे , नगरअभियंता समीनाथ सदगर , डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रबोधन मंडळाचे अध्यक्ष डॉ.वाल्मिक इंगोले , सचिव गौतम भोवते , कोषाध्यक्ष नंदू गुजर , सहसचिव यशवंत भरणे , संस्थापक अध्यक्षा पंचशीला इंगोले , भारतीय बौद्ध महासभा तालुकाध्यक्ष विनायक देवतळे आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

ना संजयभाऊ राठोड यांनी सदर भवनाकरीता ४६ लक्ष रुपयाचा निधी शासन स्तरावरून उपलब्ध करून दिल्यामुळे ही उत्तम वास्तु पूर्ण करण्यात यश आल्याचे यावेळी विषद करण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रबोधन मंडळ , स्वंयदीप बौद्धमहिला संघटन , बौद्धसमाज जेष्ठ नागरिक मंडळ , भारतीय बौद्ध महासभा इत्यादींच्या वतीने ना संजय राठोड यांचा जाहीर सत्कार करण्यात आला.

कंत्राटदार सुधीरभाऊ अडकिने यांचा देखील मंत्री महोदयांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. दिग्रस येथील बौध्द बांधव व समस्त समाजाच्या विकास कामात आर्थिक व इतर कोणतेही सहकार्य करण्याची नेहमीच आपली भूमिका राहील , असे मत ना. संजय राठोड व्यक्त केले. प्रबोधन मंडळाच्यावतीने अध्यक्ष डॉ. वाल्मिक इंगोले यांनी व इतर मान्यवरांनी यावेळी मनोगत व्यक्त केले. दिग्रसचे मुख्याधिकारी ज्ञानेश सोनवाणे यांनी प्रास्ताविक केले.

सुत्रसंचालन प्रबोधन मंडळाचे सदस्य डी.डी.मनवर व धनंजय मस्के यांनी केले तर आभार प्रदर्शन बौद्ध समाज जेष्ठ नागरीक मंडळाचे अध्यक्ष व राष्ट्रीय कबड्डीपटू उद्धवराव अंबुरे यांनी केले. दिग्रस नगर पालिकेतील अधिकारी , कर्मचारी , शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रबोधन मंडळाचे पदाधिकारी व सक्रिय सभासदांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले . दिग्रस तालुका व शहर शाखेचे शिवसेना पदाधिकारी , कार्यकर्ते , बौद्ध समाज बांधव – भगिनी व इतर मान्यवर मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now
Sharing Is Caring:

Leave a Comment

twelve + 10 =

Whatsapp ने लॉंच किया नया फीचर , Whatsapp Channels. 5 पड़ावों से होकर गुजरता है रिश्ता. देश के सबसे महंगे वकील Harish Salve ने 68 वर्ष की उम्र में की तीसरी शादी. रूस ने मार गिराए यूक्रेन के  3  ड्रोन. रूस का लूना – 25 चांद पर क्रैश.