दिग्रसच्या Shivtej Killotsav स्पर्धेला शिवराज्याभिषेकाच्या ३५० व्या वर्षामुळे आले विशेष महत्त्व !

दिग्रसच्या Shivtej Killotsav स्पर्धेला शिवराज्याभिषेकाच्या ३५० व्या वर्षामुळे आले विशेष महत्त्व !

यंदाचे सतरावे वर्ष…परीक्षण ३ डिसेंबरला

दिग्रस: गेल्या सतरा वर्षांपासून दिग्रस व परीसरात “शिवतेज किल्लोत्सवाचे यशस्वी आयोजन केले जाते. यंदा छत्रपती शिवाजी महाराज यांचे राज्याभिषेक सोहळ्याला ३५० वर्षे पुर्ण होत असल्याने यंदाच्या शिवतेज किल्लोत्सवाला विशेष महत्व प्राप्त झाले आहे.”Shivtej Killotsav” तून प्रेरणा घेवून अनेक सेवाभावी संस्था, शिवप्रेमी संघटना,शिक्षण संस्था पुढाकार घेवून अनेक शहरे,जिल्ह्यासह राज्यभर या किल्लोत्सवाचे आयोजन करीत आहेत.

दरवर्षी दिवाळीच्या सुट्यांमध्ये या शिववैभव किल्ले बनवा स्पर्धेचे आयोजन केले जाते. हि स्पर्धा सर्वांसाठी खुली व निःशुल्क आहे. या स्पर्धेत कुणीही वैयक्तिक किंवा सामुहिक सहभाग घेऊ शकतो. दगड,माती,विटा,सिमेंट यांचा वापर केलेली पर्यावरण पुरक व नोंदणीक्रुत किल्लेच स्पर्धेत विचारात घेतली जातात. शिवतेज संस्था, हे कार्य गेली सतरा वर्षांपासून अखंडपणे करीत आहे.

किल्ल्यांचे परीक्षण व स्पर्धेचे बक्षिसवितरण मान्यवरांचे हस्ते केले जाते. प्रथम येणाऱ्या चार जणांसह सर्वांनाच आकर्षक स्मृती चिन्हे व प्रमाणपत्रे देवून गौरविण्यात येते. या स्पर्धेच्या आयोजनासाठी संतोष झाडे गुरुजी, सुशील घोलप,संजीव लोखंडे, डॉ. लक्ष्मण गावंडे,वसंत खोडके, डॉ. माणिक मुनेश्वर, प्रा.डॉ. अनंत शिंदे, पांडूरंग दारोळकर, विजयालक्ष्मी झाडे, स्नेहा चिंतावार,प्रतिभा करे, सुरेंद्र राठोड, ऋषिकेश हिरास, सदानंद जाधव,अमोल झरकर,अमोल राठोड,अमोल सराफ आदी शिवतेज संस्थेचे संचालक मंडळ प्रयत्नशील आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

7 + fourteen =