Tesseract EV Scooter : देशात मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रिक वाहनांची मागणी वाढलेली आहे.सध्या पेट्रोलची किंमत खूप जास्त असल्याने कमी खर्चात जास्त मायलेज आणि रेंज देणाऱ्या इलेक्ट्रिक वाहनांकडे देशभरात वाहन ग्राहक आकर्षित झाले आहे. यामुळे देशातील इलेक्ट्रिक वाहन मार्केटमध्ये मोठी तेजी आली आहे.
अनेक ऑटोमोबाईल्स कंपन्या ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी,हायटेक फीचर्स,आणि नवीन डिजिटल फीचर्स देऊन विविध प्रकारचे इलेक्ट्रिक Car,Bike,Scooters EV मार्केट मध्ये लॉन्च करीत आहे.
यादरम्यान भारतातील इलेक्ट्रिक वाहन सेक्टर मध्ये एक नवा इलेक्ट्रिक स्कूटर दाखल झाला आहे,याचे नाव आहे Tesseract EV Scooter.या इलेक्ट्रिक स्कूटरला UltraViolette या कंपनीने भारतात दाखल केले आहे.
Tesseract इलेक्ट्रिक स्कूटरच्या अनेक वैशिष्ट्यामुळे लॉन्च होताच भारतात या वाहनाकडे ग्राहकांचे लक्ष वेधल्या गेले आहे.त्यामुळे अगदी सुरुवातीलाच Tesseract ची 50000 बुकिंग झाली आहे… …
पर्यावरण पूरक आणि इंधनावर कमी खर्च होत असल्याने इलेक्ट्रिक वाहन खूप फायदेशीर आणि प्रदूषणमुक्त वातावरणाला चालना देणारे ठरत आहे.त्यामुळे भारतात लवकरच पेट्रोल डिझेलवर चालणाऱ्या वाहनांपेक्षा इलेक्ट्रिक वाहनांच्या प्रमाणात मोठी वाढ होणार आहे.सोबतच इलेक्ट्रिक वाहने प्रदूषण मुक्तीला पुरक असल्याने भविष्यात प्रचंड लोकप्रिय होऊन इंधनवर चालणारे सर्व प्रकारचे वाहने मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे.
सध्या विविध कंपनीचे इलेक्ट्रिक वाहने बाजारात दाखल होत असताना या UltraViolette कंपनीने आपलाTesereact इलेक्ट्रिक स्कूटर सादर केला आहे.हे लॉन्च होताच याला बाजारात मोठा प्रतिसाद मिळताना दिसत आहे.
विशेष म्हणजे इलेक्ट्रिक दुचाकी बनविणाऱ्या कंपन्यांमध्ये ही कंपनी आघाडीची कंपनी मानली जाते.आणि याने आता भारतात आपली पहिली इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च केली आहे.या Tesseract EV Scooter चे लॉन्चिंग झाल्यानंतर अवघ्या काही दिवसांमध्येच भारतात याला खरेदीसाठी 50 हजार पेक्षा जास्त बुकिंग मिळाले आहेत.
- दरम्यान UltraViolette कंपनीने आता पुन्हा Tesseract EV Scooter 30 हजार बुकिंग साठी सुरुवात केली आहे.
- या स्कूटरची किंमत1लाख 20 हजार पासून सुरुवात होते.
- ग्राहकांना त्यांच्या जवळच्या शोरूमनुसार या इलेक्ट्रिक वाहनाची डिलिव्हरी 2026 च्या सुरुवातीच्या महिन्यात मिळणार आहे.
- सध्या भारतात याची जोरदार बुकिंग सुरू असल्याचे दिसत आहे.
असे आहे Tesseract EV Scooter चे बॅटरी आणि मोटर परफॉर्मन्स.
UltraViolette या कंपनीच्या Tesseract EV Scooter ची अनेक वैशिष्ट्ये आहेत.ग्राहक याच्या शक्तिशाली बॅटरी आणि मोटर परफॉर्मन्समुळे आकर्षित झाले आहे.यात दमदार रेंज देणारी battery आणि स्टोरेज देण्यात आला असून यात हेल्मेट सहज बसू शकते ती जागा आहे.
यात 3.5kWh,5kWh battery आणि 20.1BHP इत्कीश्क्तीशाली मोटर लावलेली आहे.ही इलेक्ट्रिक स्कूटर तीन कलर्स ऑप्शन मध्ये आहे.
Desert Sand
Sonic Pink
Stealth Black
या तीन रंगातTesseract EV Scooter उपलब्ध करण्यात आली आहे.
Tesseract Scooter ची ही आहेत खास वैशिष्ट्ये.
स्कूटरमध्ये डिटेक्शन करिता Dual Radar Camera.
ओव्हरटेक अलर्ट.
एक्सीडेंट अलर्ट सिस्टम.
Dual LED Projector.फ्लोटिंग डीआरएलसह प्रोजेक्टर हेडलॅम्प.
देण्यात आले आहे.
14 इंची मजबूत अलॉय व्हील्स.
या E Scooter मध्ये 14 इंची मजबूत Alloy Wheels देण्यात आलेले असून,याच्या पुढील आणि मागील बाजूस मजबूत ब्रेक सेटअप,Duel चॅनल ABS Braking System,ट्रॅक्शन कंट्रोल सिस्टम आणि डायनॅमिक स्टॅबिलिटी कंट्रोल प्रणाली देण्यात आली आहे.
भारतात Tesseract Scooter ठरणार इलेक्ट्रिक वाहनात चांगला ऑप्शन.
कंपनीने ही ई-स्कूटर लॉन्च केल्यानंतर याचे वैशिष्ट्य, आकर्षक लुक,दमदार बॅटरी आणि मोटर सिस्टम तसेच किमतीमुळे ग्राहक आकर्षित होताना आणि खरेदीसाठी प्रतिसाद मिळताना दिसत आहे.याची रेंज परफॉर्मन्स, सुरक्षा सिस्टम आणि हायटेक फीचर्सचा योग्य वापर दिसत आहे.यामुळे ग्राहकांचा प्रतिसाद आणि Tesseract Scooter बुकिंगचा आकडा पाहता लवकरच ही इलेक्ट्रिक स्कूटर,भारतीय इलेक्ट्रिक वाहन मार्केटमध्ये नवा बेंचमार्क कायम करून बेस्ट अशी इलेक्ट्रिक म्हणून नवा ऑप्शन देणार आहे.