Illegal Sand Transportation: अवैध वाळू वाहतुकीविरोधात तहसीलदार एक्शन मोड वर; भरारी पथकाने पाठलाग करून मॅक्स पीक-अप पकडला.

Illegal Sand Transportation: अवैध वाळू वाहतुकीविरोधात तहसीलदार एक्शन मोड वर; भरारी पथकाने पाठलाग करून मॅक्स पीक-अप पकडला.

Illegal Sand Transportation: केळापूर तालुक्यातील पैनगंगा नदीपात्रातून अवैधपणे वाळूची वाहतूक करणाऱ्या वाहनांवर महसूल पथकाने कारवाई केली. ही कारवाई मंगळवारी दुपारी ३ च्या सुमारास करण्यात आली असून, या कारवाईमुळे वाळूमाफियांमध्ये खळबळ उडाली आहे. तालुक्यातील वाळू घाटावर बेकायदा वाळू उपसा रात्रंदिवस सुरुच आहे.

वेळोवळी सांगूनही वाळूमाफिया ऐकत नसल्याचे पाहून स्वतः तहसीलदार राजेंद्र इंगळे कारवाईसाठी अॅक्सन मोडवर आल्याचे दिसून येत आहे. केळापूर तालुक्यातील पाटणबोरी येथुन काल दुपारी २ वाजताच्या सुमारास पैनगंगा नदी पात्रातून अवैध वाळू भरलेले मॅक्स पीक-अप वाहन निघत असल्याची गोपनीय माहिती तहसीलदार व नियोजित भरारी पथकातील मंडळ अधिकारी वीरेंद्र सोळंके.

दिपक पवार, तलाठी अभय मुंजेकर, विकास भोरे, राकेश कोंडावार यांना मिळताच,सदर घटनास्थळ गाठून पथकाने पाठलाग करीत पाटणबोरी ते पांढरकवडा रस्त्यावर आसलेल्या वार्हा कवठा गावाजवळ वाहन क्रमांक-एम. एच.२९ एम १२४१ वाहनास १/२ ब्रॉस वाळूसह पकडले.भरारी पथकाच्या हाती लागलेले वाहन पोलिस स्टेशनच्या आवारात जमा करण्यात आले आहेत.

प्राप्त माहितीनुसार पांढरकवडा येथील अनिल माने यांचे मालकीचे वाहन असल्याने त्यांच्या वर महसूल विभागाचे गौण खनिज कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. तालुक्यातील अवैध वाळू उपसा रोखण्यासाठी तहसीलदार इंगळे यांनी लक्ष घातले आहे. महसुल पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही पथके रात्री गस्त घालत आहेत. तसेच स्वतः तहसीलदार अवैध वाळू उपसा रोखण्यासाठी रस्त्यावर उतरले आहेत. तहसीलदारांच्या बेधडक कारवाईने वाळूमाफियांचे धाबे दणाणले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

16 + 1 =