आबिद फानन
Reading Culture अलीकडे कमी झाली आहे. तरुण वर्ग मोबाईल मध्ये जास्त वेळ देत आहे. यामुळे वाचन कमी झाले आहे. वाचन संस्कृती वाढली पाहिजे त्यासाठी छोटे छोटे प्रयोग झाले पाहिजे,काही उपाय योजना केल्या पाहिजेत. यासाठी जनजागृती करण्यासाठी परभणी येथील शिक्षक विनोद शेंडगे यांनी मागिल १५ तारखेपासून सायकलने परभनी ते नागपूर प्रवास सुरु केला आहे.
या प्रवासा दरम्यानच शेंडगे यांनी आर्णीला भेट दीली, त्यावेळी शेंडगे बोलत होते. आर्णीमध्ये आर्णी सायकलींग क्लब चे अध्यक्ष सुनिल राणे, हरिओमसिंह बघेल, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते प्रल्हाद इंगळे यांच्यसोबत संवाद साधला, देवूरवाडा पुनर्वसन येथिल भागवत सप्ताहात उपस्थित मंडळी ला वाचन कसे वाढवता येईल यासाठी मार्गदर्शन केले. सामाजिक कार्यकर्ते प्रल्हाद इंगळे, सुनिल राने यांनी येथे शेंडगे यांचा या कामासाठी सत्कार केला.
येथून शेंडगे यांनी ‘लोणी’ येथिल ग्रामवैभव वाचनालयाला भेट दीली. येथिल ग्रंथसंपदा येथिल वाचक वर्ग,टापटीप पणा पाहून नंदापुरे परिवाराचे कौतुक केले. मागिल पन्नास वर्षांपासून नंदापुरे परिवार ग्रामीण भागात राहून देखिल वाचन संस्कृती वाढवण्यासाठी काम करत आहेत. हे कौतुकास्पद आहे. असे शेंडगे यांनी भेटी दरम्यान सांगितले.
यावेळी ग्रामवैभव वाचणालयाचे अध्यक्ष द तु नंदापुरे, अपर्णा नंदापुरे, राम होले, ग्रंथपाल महादेव घोरसड तथा गावकरी उपस्थित होते. वाचन संस्कृती वाढवण्यासाठी कुटूंबासह दररोज काही वेळ वाचन करणे गरजेचे आहे. हा सोपा उपाय आपन केला पाहिजे असे आवाहन यावेळी विनोद शेंडगे यांनी केले.