Tata Play Fiber : टाटा टेलिकॉम कंपनीकडून इंटरनेट यूजर साठी विशेष असे नवीन प्लान बाजारात आले आहे.यातून ग्राहकांना 100 एमबीपीएस इंटरनेट स्पीड सोबतच मोफत ओटीटीचा लाभ घेता येणार आहे.त्यामुळे आपण या लेखात या फुलांची वैधता आणि किंमती किती आहेत, याबाबत जाणून घेऊया….
जर आपणास ब्रॉडबँड इंटरनेट प्लॅन आणि टीव्ही मोबाईलवर ओटीपी प्लॅटफॉर्मचा आनंद घ्यावयाचा असेल तर आता चिंता करण्याची गरज नाही.कारण यासाठी टाटा टेलिकॉमने आपल्या ग्राहकांसाठी विशेष असे विविध प्लान आणले आहे.ते म्हणजे टाटा प्ले फायबर.अनेकदा नवीन ऑफर्स मुळे याचा ट्रेंड बदलत असतो,यामुळे आता टाटा कंपनीने एक ब्रॉडबँड प्लॅन लॉन्च केला असून, सध्या हा प्लान ग्राहकांमध्ये खूप चर्चेत दिसत आहे.यातून ओटीटी प्लॅटफॉर्मचा विविध पर्यायांचा लाभ मिळणार आहे.
Tata Play Fiber हे टाटा टेलिकॉम फायबरचे मुंबई बेंगलोर आणि दिल्ली येथे जोडलेला नेटवर्क आहे.टाटा प्ले फायबर प्लॅन हा एक वार्षिक म्हणजेच बारा महिन्यांचा प्लान आहे. मात्र याला विविध महिन्यात विभागण्यात आले आहे.1 महिना 3 महिने,6 महिने वैधता नुसार या सेवेचे शुल्क राहणार आहे. या प्लॅनमध्ये प्रति महिना 900 रुपयांचा एक महिन्यांसाठी ओटीपी लाभ ग्राहकांना मिळणार आहे l.जर ग्राहकांना ही सुविधा नको असल्यास त्यासाठी आणखी कमी पैसे मोजावे लागतील.
Tata Play Fiber प्लान मध्ये विविध सवलती.
कंपनीने Tata Play Fiber प्लान मध्ये शंभर एमबीपीएस प्राईम प्लान आणि मेगा प्लॅन हे दोन प्रकारचे प्लान दिले आहे.यात वेगवेगळे बेनिफिट्स मिळणार असून त्यांच्या किमती अगदी वेगवेगळे असतील. या प्लॅन अंतर्गत 12 महिन्यांसाठी ग्राहकाने सबस्क्रिप्शन घेतले तर, त्यावर कंपनी चांगली अशी सूट देणार आहे. जर ग्राहकांना कमी अवधीचा प्लॅन हवा असेल तर त्यासाठी लाईट प्लॅन खरेदी करण्याची सुविधा आहे.यात ग्राहकांना महिन्याला 750 रुपये या सेवेसाठी द्यावे लागतील, तर वर्षभरासाठी हा प्लॅन खरेदी करण्यासाठी ग्राहकांना जीएसटी 9 हजार रुपये द्यावे लागतील. यात सुद्धा ग्राहकांना ओटीपी सुविधा लाभ मिळणार आहे
6 OTT प्लॅन्स चा नवा असा पर्याय.
टाटा प्ले टाटा प्ले फायबर100 mbps इंटरनेट स्पीड असलेला हा खूप असा आकर्षक प्लान आहे. यात युजरला प्रतिमाह फक्त 800 रुपये शुल्क द्यावे लागतील. याशिवाय जर कुणाला याचा वार्षिक सबस्क्रीप्शन हवा असेल,तर त्याला जीएसटी सह एकूण 9600 मध्ये हा प्लान मिळेल.यात ग्राहकांना एकूण 6 OTT प्लॅटफॉर्म्स मिळणार असून,यातून 200 पेक्षा जास्त टीव्ही चॅनल मध्ये मनोरंजन आणि इतर माहिती आणि माध्यम चॅनलचा पर्याय असेल.
आणखी एक मेगा प्लान.
टाटा प्ले फायबर करून हा एक मेगा असा प्लान आहे यासाठी युजर्स दरमहा फक्त 950 रुपये शुल्क द्यावे लागेल.या प्रती महिना शुल्कात ग्राहकांना ओटीपी प्लॅटफॉर्मचा आणि इंटरनेट चा लाभ मिळणार असून,जर ग्राहकांनी पूर्ण वर्षभरासाठी हा प्लान खरेदी केल्यास जीएसटी सह एकूण 11400 द्यावे लागतील. विशेष म्हणजे कोणताही ग्राहक टाटा प्ले फायबरचा हा लाभ आपल्या बजेट आणि आवश्यक गरजेनुसार घेवू शकणार आहे.