शिक्षणासाठी 3 तरुणांचा अकलूज ते नागपुर सायकल प्रवास आंदोलन.
शिक्षणासाठी 3 तरुणांचा अकलूज ते नागपुर सायकल प्रवास आंदोलन.सरकारी शाळांची हळूहळू खाजगीकरणाच्या दिशेने होणारी वाटचाल बघता अकलूज येथील 3तरुण लक्षवेधी व वेगळे आंदोलन करत आहे. अकलूज ते नागपूर 750किमी चा प्रवास सायकल ने करत प्रवासादरम्यान प्रत्तेक गावात शिक्षणाबाबत नागरिकात जनजागृती होण्यासाठी पथनाट्याचे सादरीकरण करत आहे. अक्षय जाधव,लखन बेंद्रे, व राहुल चौगुले सर्व राहणार अकलूज अशी या आंदोलनकर्त्या तरुणांची नावे आहेत.
आर्णी येथील कवी व शेतकरी विजय ढाले यांनी सरकारी शाळा वाचविण्यासाठी केलेल्या उत्स्फूर्त आंदोलनाच्या बातम्या पाहून आपण प्रेरित झालो व सरकारी शाळा वाचविण्यासाठी आंदोलन उभारून शासनाला मागणी करत असल्याचे तिन्ही तरुणांनी यावेळी सांगितले.
प्रवासा दरम्यान त्यांचे मंगळवारी 17ऑक्टोंबरला आर्णी शहरात आगमन झाले आहे. यावेळी वर्हाडी कवी विजय ढाले, सरपंच संघटनेचे अध्यक्ष अमोल देशमुख, सायकलिंग क्लबचे अध्यक्ष सुनील राणे, सरोदे, नवनीत दाभडकर, व ईतर लोकांनी तिन्ही तरुणांचे स्वागत केले. सदर तरुणांनी आर्णीत स्थानिक बाबासाहेबांच्या पुतळ्यासमोर,शिवनेरी चौक व तहसिल कार्यालय समोर पथनाट्याचे सादरीकरण केले.