SVAMITVA Yojana : आता प्रत्येक गावकऱ्यांला मिळेल हक्काचा Property Card !
- महसूल मंत्री बावनकुळे यांची मोठी घोषणा !
- “27 डिसेंबरला राज्य सुरू झाली स्वामित्व योजना”
केंद्र सरकारने स्वामित्व योजनेतून गाव खेड्यातील गावकऱ्यांना त्यांच्या जमिनीचे शेतीचे हक्क आणि प्रॉपर्टी कार्ड देण्यासाठी काम सुरू केले आहे. यानुसार महाराष्ट्रातही आता केंद्र सरकारच्या या योजनेचा लाभ गावकऱ्यांना मिळणार असून त्यांना त्यांचा हक्काचा प्रॉपर्टी कार्ड देण्यात येणार आहे. या संबंधात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घोषणा केलेली आहे.
तर दुसरीकडे महाराष्ट्रात 27 डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते स्वामीत्व कार्ड योजनेचे शुभारंभ सुद्धा झालेले आहे. स्वामित्व योजनेतून महाराष्ट्रातील 30 जिल्ह्यांमध्ये एकाच वेळी गावकऱ्यांना त्यांचा प्रॉपर्टी कार्ड देण्यासाठी कार्यक्रम घेण्यात येतील यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री,विविध विभागांचे कॅबिनेट मंत्री आणि संबंधित जिल्ह्यातील जिल्हाधिकारी उपस्थित राहतील अशी माहिती या योजनेच्या शुभारंभ नंतर राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे.
देशातील गावकऱ्यांना त्यांच्या शेत आणि मालकीच्या घरांचे प्रॉपर्टी कार्ड मिळावे यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून ही योजना सुरू करून ती आता रागविण्यात येणार आहे. गावकऱ्यांना आपल्या जमिनीवर हक्क मिळवून देणे हा योजनेचा मुख्य उद्देश्य आहे. गाव खेड्यातील भटक्या जाती जमाती विमुक्त जाती जमाती च्या नागरिकांना या प्रॉपर्टी कार्डचा लाभ होणार असून. या कार्डच्या आधारावर गावकऱ्यांना आपल्या जमिनीवर गृह कर्ज घेणे सुलभ होणार आहे.
महाराष्ट्रातील 30 हजार 515 गावांमध्ये राबविणार योजना.
स्वामित्व योजनेतून महाराष्ट्रातील 29 जिल्ह्यातील 30515 गावांमध्ये गावकऱ्यांना त्यांचे प्रॉपर्टी कार्ड देण्यात येणार आहे.त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील ग्रामीण भागात ही योजना एकाच वेळी राबवून संबंधितांना प्रॉपर्टी कार्ड चे लाभ मिळणार आहे.ऑनलाइन पद्धतीने तयार करण्यात आलेले गावकऱ्यांचे संबंधित प्रॉपर्टी कार्ड आधुनिक स्वरूपात त्यांना मिळणार आहेत.
तर दुसरीकडे लवकरच सरकार महाराष्ट्रातील शहरी भागातील अशा प्रकारची योजना राबवून शहरी नागरिकांना सुद्धा त्यांचे प्रॉपर्टी कार्ड देण्याचा निर्णय घेऊ शकते.यादरम्यान शहरी भागातील नजुल जमिनीच्या पट्टे आणि लिजधारकांचे प्रश्नही सरकार या निमित्ताने सोडवेल,असे महसूल मंत्री यांनी स्पष्ट केले आहे.
बेसा – बेलतरोडी नगरपंचायतीत गुंठेवारी कायदा, गावकऱ्यांना आर.एल.कायद्यानुसार प्रॉपर्टी कार्ड देणार.
विशेष म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातील एक गाव असा आहे ज्याचे नाव बेसा-बेलतरोडी आहे.ही नगरपंचायत असून येथे गावकऱ्यांसाठी गुंठेवारी कायदा लागू आहे. त्यामुळे स्वामित्व योजनेमधून प्रॉपर्टी कार्ड देण्याच्या कार्यक्रमादरम्यान बेसा-बेलतरोडी नगरपंचायतीत असलेले सर्व भूखंडांचे आर.एल.या कायद्यान्वये कार्ड जारी केले जातील, असे महसूलमंत्री बावनकुळे यांनी सांगितले आहे.
येथे महसूल मंत्री बावनकुळे स्वतः कामकाज पाहणार.
बेसा बेलतरोडी नगरपंचायतीमध्ये गुंठेवारी कायदा लागू असल्याने या कायद्यानुसारच तेथील गावकऱ्यांना आणि लिज धारकांना प्रॉपर्टी काय मिळावे, यासाठी तेथील कामकाज स्वतः महसूल मंत्री पाहणार आहेत यासाठी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे स्वतः नगरपंचायत कार्यालयामध्ये बसून कामकाज पाहणार आहेत.दरम्यान हुडकेश्वर आणि नरसाळा हे दोन्ही गाव महापालिका क्षेत्रात असल्याने तेथील भूखंड नियमित करणे हे महापालिकेच्या अखत्यारीत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
राज्यात वक्फ जमिनीचीही चौकशी होणार.
महाराष्ट्रात वक्फ बोर्डाच्या अखत्यारीत मोठ्या प्रमाणात जमिनी आहेत.यात धार्मिक संस्थांच्या जमिनीचे कामकाज आणि देखरेख वक्फ बोर्ड करतो,यात
अनेक सामाजिक व शैक्षणिक संस्थांच्या जमिनी ह्या चुकीच्या पद्धतीने वक्फ बोर्डाच्या अखत्यारीत आल्या आहेत.
यावर सरकारने थेट भूमिका घेतली आहे.आता या संदर्भातील बोर्डच्या अधिकारात येणाऱ्या सर्व जमिनींची चौकशी करण्यात येणार आहे.लवकरच केंद्र सरकार या संदर्भात कायदा करत आहे. यावर ज्याच्या मालकीची जमीन आहे,ती त्यालाच मिळाली पाहिजे, अशी राज्य सरकारची भूमिका असल्याचे महसूलमंत्री बावनकुळे यांनी सांगितले आहे.