*वणी ता. प्रतिनिधी: प्रफुल महारतळे*
वणी – येथील स्वावलंबी शिक्षण संस्थाद्वारा संचालित Sushganga Public Schoolमध्ये दिनांक २३ व २४ जानेवारी रोजी वार्षिक क्रीडा महोत्सवाचे अतिशय उत्साहात आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्षपद शाळेचे प्राचार्य मा. प्रवीणकुमार दुबे यांनी भूषविले तसेच उद्घाटक मा. ॲड.जितकुमार चालखुरे व विशेष अतिथी ॲड. सरिकाजी चालखुरे व उपप्राचार्य प्रफुल महातळे आदी मान्यवरांची उपस्थिती होती. मराठमोळी वेशभुषा केलेल्या मुलींच्या लेझिम पथकाच्या गजरात मान्यवरांचे आगमन झाले.
मान्यवरांच्या शुभहस्ते मशाल प्रज्वलीत करीत व बलून हवेत सोडत कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. मान्यवरांचे स्वागत पुष्गुच्छ व संगीत चमूद्वारे स्वागत गीताच्या माध्यमातून करण्यात आले. वर्ग २ री व ४ थी च्या विद्यार्थ्यांनी ड्रिल सादर केली. हाऊस लीडर्स यांच्या नेतृत्वात परेड पथकाद्वारे मंचावरील मान्यवरांना मानवंदना देण्यात आली. डान्स ग्रूपने सादर केलेल्या राजस्थानी नृत्याने दर्शकांचे लक्ष वेधून घेतले. कार्यक्रमाचे उद्घाटक अँड चालखुरे यांनी जीवनातील खेळाचे महत्त्व विषद केले.
विशेष अतिथी अँड. सारिका चालखुरे यांनी विद्यार्थी शिक्षक यांच्यातील आदर्श नात्यावर भाष्य केले. आपल्या अध्यक्षीय भाषणात नवीन शैक्षणिक धोरणातील तरतुदींवर प्रकाश टाकीत शरीर व मन निरोगी राखण्यात, मनुष्यात धैर्य, सहनशीलता आणि मानवी गुणांचा विकासमध्ये खेळाचे अनन्यसाधारण महत्त्व असल्याचे विचार प्रगट केले. क्रीडा महोत्सवाअंतर्गत खो खो, रनिंग रेस, कोन जंपिंग, शॉट पूट,रस्सीखेच,संगीत खुर्ची, लिंबू चमच, क्रिकेट ,स्केटिंग, बुद्धिबळ अशा विविध खेळांचे आयोजन करण्यात आले होते.
इंटर हाऊस स्पोर्ट स्पर्धेत येलो हाऊस मधील स्पर्धकांनी सर्वाधिक स्पर्धा जिंकत कॉक हाऊस हा किताब पटकाविला. विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते स्मृतिचिन्ह व प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु.सोनाक्षी जग्यासी व मुस्कान भावनाणी यांनी संयुक्तरित्या तसेच आभार प्रदर्शन सौ. प्रियांका कानकुटला व आलिया शेख यांनी केले. कार्यक्रमाच्या सफल आयोजनाकरिता दिपक ठेंगणे,विनायक किटे.
शैलेंद्र धोटे,नागेश कडूकर,विजय महाजन,भूषण सोनवणे,सागर देवगडे,कपिल ताटेवार, अश्मिर भगत,सौ. प्रियांका पांडे,खुशबू तोडसाम, नुरसायमा खान, पूजा पांडे, माधवी लाभे, सविता राजुरकर, रिना मॅडम ,सोनू मॅडम, , पल्लवी वांढरे, सोनल दुबे, पलक शिरभाते, मुस्कान शेख,स्मिता काळे,ममता मॅडम, नुसरत मॅडम, सायली लडके, मेघा ठेंगणे व स्नेहा गौरकर, मोनाली मॅडम आदी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.