सुशगंगा पब्लिक स्कूलमध्ये Makar Sankranti साजरी.

सुशगंगा पब्लिक स्कूलमध्ये Makar Sankranti साजरी.

*वणी ता. प्रतिनिधी: प्रफुल महारतळे*

वणी : येथील स्वावलंबी शिक्षण संस्था द्वारा संचालित सुशगंगा पब्लिक स्कूलमध्ये १५ जानेवारी रोजी Makar Sankranti हा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी विद्यार्थ्यांना पतंग बनविणे तसेच पतंग उडवण्यातील कलाबजीचे प्रत्यक्ष अनुभव देण्यात आले. शाळेचे संस्थापक अध्यक्ष मा. प्रदीपजी बोनगिरवार यांनी तीळ हे स्नेहाचे, तर गूळ मधुरतेचे प्रतीक असुन दोन्हींचे मिश्रण सामाजिक संघटन, समरसता आणि पूरकता यांचे प्रतीक असून तोच गोडवा व प्रेम आपण आपल्या भाषेत रुजवावा हा शुभेच्छा संदेश दिला.

व्यवस्थापकीय संचालक मा . मोहनजी बोनगिरवार विद्यार्थ्यांना मकर संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या. ज्योतिषशास्त्रानुसार मकरसंक्रांतीच्या दिवशी सूर्याचे एका राशीतून दुसर्‍या राशीत झालेल्या परिवर्तनाला ‘अंधकारातून प्रकाशाकडे झालेले परिवर्तन’, असे मानले जाते. मकरसंक्रांतीपासून दिवसाचा कालावधी वाढत जातो आणि रात्रीचा कालावधी न्यून होतो. या काळात दिवसाचा कालावधी मोठा झाल्यामुळे प्रकाश अधिक असतो आणि रात्रीचा कालावधी न्यून झाल्याने काळोख न्यून असतो.

सूर्य ऊर्जेचा अखंड आणि अमर्याद स्रोत आहे. सूर्याच्या किरणाने प्राणी जगतामध्ये चेतना निर्माण होऊन त्यांच्या कार्यशक्तीमध्ये वृद्धी होते. यामुळेच भारतीय संस्कृतीत ‘मकरसंक्रांत’ हा सण साजरा करण्याचे विशेष महत्त्व असल्याचे प्रतिपादन प्राचार्य मा.प्रवीण कुमार दुबे यांनी केले. काईट मेकिंग अक्टिविटी माधवी लाभे, स्मिता काळे, दीपक ठेंगणे ,विनायक कीटे यांच्या मार्गदर्शाखाली घेण्यात आली तसेच शाळेतील इतर शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार्यांचे सहकार्य लाभले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

two × 5 =