Sushganga Public Schoolमध्ये राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा.
*वणी ता. प्रतिनिधी: प्रफुल महारतळे*
वणी : स्वावलंबी शिक्षण संस्था द्वारा संचालित Sushganga Public Schoolमध्ये २८ फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय विज्ञान दिवसाचे औचित्य साधत एजुफेस्ट अंतर्गत विज्ञान व कला प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. महान शास्त्रज्ञ डॉ. सी.व्ही. रमण यांच्या रमन इफेक्टचा शोध साजरा करण्यासाठी दरवर्षी 28 फेब्रुवारी रोजी देशात राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा केला जातो.
कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून डॉ. हेमंत मसराम, अध्यक्षरुपी प्राचार्य मा. प्रवीण कुमार दुबे, विशेष अतिथी श्रीमती राखी अटरा ,प्रमुख पाहुणे श्रीमती निराली पटेल व उपप्राचार्य प्रफुल महारतळे आदी मान्यवरांची उपस्थिती होती. “विकसित भारतासाठी स्वदेशी तंत्रज्ञान” या संकल्पनेवर आधारित १०० मॉडेल्स विद्यार्थ्यांनी प्रदर्शनात प्रदर्शित केले. यामधील बहूतेक मॉडेल्स हे वर्किंग मॉडेल्स होते.
उपस्थित मान्यवरांनी राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा करण्यामागचा उद्देश विद्यार्थ्यांना विज्ञानाकडे प्रेरित करणे आणि सर्वसामान्यांना विज्ञान आणि वैज्ञानिकांच्या कामगिरीची जाणीव करून देणे हा असल्याचे मत आपल्या भाषणाद्वारे व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन पूजा पांडे,प्रास्ताविक नागेश कडूकर तसेच आभार प्रदर्शन स्मिता काळे यांनी केले. कार्यक्रमाचा यशस्वी आयोजनाकरिता इतर शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.