*वणी ता. प्रतिनिधी: प्रफुल महारतळे*
वणी : स्वावलंबी शिक्षण संस्था द्वारा संचालित Sushganga Public Schoolमध्ये २७ फेब्रुवारी रोजी मराठी राजभाषा दिवस म्हणजेच मराठी भाषा दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. २७ फेब्रुवारी हा दिवस म्हणजे प्रसिद्ध ज्येष्ठ लेखक,कवी,कादंबरीकार विष्णू वामन शिरवाडकर म्हणजेच कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस.
कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनी त्यांना आदरांजली अर्पण करण्यासाठी दरवर्षी मराठी भाषा दिन साजरा केल्या जातो. कुसुमाग्रज यांची जयंती तसेच मराठी राज्यभाषा दिवस याचे औचित्य साधून शाळेत विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून शाळेचे प्राचार्य सन्माननीय प्रवीण कुमार दुबे लाभले होते.
कार्यक्रमाची सुरुवात स्वराज संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज व कवी कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. श्रीमती माधवी लाभे यांनी आपल्या प्रास्ताविकपर भाषणाद्वारे विद्यार्थ्यांचा मराठी भाषेचा इतिहास, मराठी भाषेतील विविध महान ग्रंथ व कवी यांच्या बद्दल माहिती सांगितली. आपल्या अध्यक्षीय भाषणात प्राचार्य प्रवीण कुमार दुबे सरणी मराठी भाषेला अधिकाधिक संपन्न करण्यासाठी व तिच्या समृद्धीसाठी ज्या साहित्यिक महात्म्यांनी आपले जीवन व्यतीत केले.
त्यांच्याबद्दल आपण ऋणी असले पाहिजे असे संदेश दिला व प्रत्येकाने मराठी भाषेतील साहित्याचा अभ्यास करून तिची किर्ति जगामध्ये दुरवर पसरली पाहिजे असे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पलक शिरभाते तसेच आभार प्रदर्शन रेशमा दोडेवार यांनी केले. कार्यक्रमाचा यशस्वी आयोजनाकरिता इतर शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.