Sugarcane Farmer: शेतकऱ्यांच्या ऊस नोंदी साठी ऊस कर्मचाऱ्यांची टाळाटाळ.
गोड उसाची कडू कहाणी शेतकऱ्यांच्या नशिबी धोंडे.
Sugarcane Farmer: सध्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांची ऊस लागवडीसाठी लगबग चालू आहे. यात बऱ्याच शेतकऱ्यांची ऊस लागवड झालेली आहे. परंतु काही कर्मचारी जाणून बुजून उसाची नोंद घेण्यासाठी टाळाटाळ केल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या वेळी बऱ्याच शेतकऱ्यांनी शिऊर कारखान्यास ऊस दिला गेला होता.
परंतु नॅचरल शुगर व शिऊर कारखाना यांच्यात भावाबद्दल बरीच तफावत दिसून येत असल्यामुळे बरेच शेतकरी नॅचरल शुगर येथील कर्मचाऱ्यांना नोंद घेण्यासाठी विनंती करीत आहेत परंतु ती नोंद घेण्यासाठी कर्मचारी टाळाटाळ करीत आहेत. त्यातच काही कर्मचारी पैसे घेऊन सुद्धा उलट सुलट नोंद घेतल्याचे ऐकूवात आहे.
शेतकऱ्यांना यावर्षी सुद्धा शिऊर कारखाना व नॅचरल शुगर कारखाना या दोन्ही कारखान्यात तफावत असल्यास नोंद घेण्यास काय हरकत आहे असे शेतकऱ्यांचे मत आहे.जेणेकरून यावेळी सुद्धा शिऊर कारखान्यांनी नॅचरल शुगर प्रमाणे भाव न दिल्यास पुन्हा तरी आपणास नॅचरल शुगर कारखान्यात ऊस देता येईल या भाबड्या आशेवर आहेत. तरी संबंधित विभागाने व कारखाना संचालक यांनी याकडे लक्ष देण्याची गरज आहे.
चौकट
पत्रकार दिगांबर शिरडकर यांनी किरण सुरोशे ऊस नोंद या कर्मचाऱ्यास शेतकऱ्यांच्या उसाची नोंद का घेतली जात नाही याबद्दल विचारना केली असता, गेल्यावेळी ज्या शेतकऱ्यांनी शिऊर कारखान्यांना ऊस दिला गेला व तिथे नोंद केली असल्यामुळे आम्ही नोंद घेऊ शकत नाही. त्यांना शासना तर्फे काही जीआर आले आहेत का? किंवा कारखाना संचालक यांच्या कडून आपणास काही आदेश आलेले आहेत का?
असे विचारले असता जीआर येण्यासाठी हे क्षेत्र काही सहकारी नसून यात फ्कत आम्हाला कारखान्याकडून आदेश आलेला असतो.त्याचे आम्ही पुरेपूर पालन करत आहे.असे नॅचरल शुगरचे कर्मचारी किरण सुरोशे यांनी उडवा उडवी ची उत्तर दिले.त्यांना आपल्या वरिष्ठांचा अथवा ऑफिसचा संपर्क नंबर द्यावा असे विचारले असता माझ्याकडे कुणाचाही नंबर नसून तुम्ही कारखान्याकडे जा व चौकशी करा असे उत्तर मिळाले.
त्यातच आमचा जो खालचा कर्मचारी असतो त्यांच्यावरच शेतकऱ्यांचा रोश असतो असे ही ते म्हणाले.