Jajoo English Medium School यवतमाळ येथील विद्यार्थ्यांची स्व. वसंतराव नाईक अंध-अपंग व मूक बधीर शाळेला भेट.

यवतमाळ: दि.१३ आक्टोबर विद्यार्थ्यांना समाजातील उपेक्षित घटकाबद्दल जाणीव राहावी व त्यांच्या बद्दल प्रतिष्ठा निर्माण व्हावी यासाठी संस्थाध्यक्ष श्री. प्रकाशजी जाजू, सचिव श्री. आशिषजी जाजू, कोष्याध्यक्ष तथा जाजू इंटरनॅशनल स्कूलच्या (Jajoo English Medium School) प्राचार्या सौ. शिल्पा आशिष जाजू, मुख्याध्यापक श्री. सतीश उपरे,मुख्याध्यापिका रिता देशमुख, समन्वयिका सुचिता पारेख, तसनिम रतलामवाला यांच्या प्रेरणेने जागतिक दृष्टी दिनाचे औचित्य साधून स्थानिक जाजू इंग्लिश मिडीयम स्कूल यवतमाळ येथील विद्यार्थ्यांनी स्व.वसंतराव नाईक अंध, अपंग व मूकबधिर विद्यालय वडगाव येथे दिनांक १३ऑक्टोबर रोजी भेट दिली.

यावेळी शाळेच्या विद्यार्थ्यांनी दृष्टीहीन, अपंग विद्यार्थ्यांना कसे अध्यापन केले जाते? त्यांना शिकवण्यासाठी कोणकोणत्या अध्यापन पद्धती वापरल्या जातात? विशेष म्हणजे त्यांना किती काळजीपूर्वक सांभाळावे लागतात? तसेच त्यांच्या साठी असणारी विविध अध्यापन साहित्ये तेथील श्री. वैभव घोलप, सौ.अर्चना थोरात, आरती कलवार, निलेश लिंगोटे या शिक्षकांच्या मदतीने व इतर कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने विद्यार्थ्यांनी समजून घेतली.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now

शाळेच्या विद्यार्थ्यांनी त्यांच्यासोबत थोडावेळ गमती-जमती केल्या. तेथील विद्यार्थी देखील हे सर्व अनुभवून भारावून गेले. यावेळी शाळेतील शिक्षक सिराज भाटी, सौ.माधुरी राऊत,माहवीश खान हे उपस्थित होते.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now
Sharing Is Caring:

Leave a Comment

2 × 4 =

Whatsapp ने लॉंच किया नया फीचर , Whatsapp Channels. 5 पड़ावों से होकर गुजरता है रिश्ता. देश के सबसे महंगे वकील Harish Salve ने 68 वर्ष की उम्र में की तीसरी शादी. रूस ने मार गिराए यूक्रेन के  3  ड्रोन. रूस का लूना – 25 चांद पर क्रैश.