गौण खनिज बाबतीत बेकायदेशीर कारवाया थांबवावया: व्यापारी महासंघाची मागणी.

*प्रतिनिधी: डॉ .किरण चाकोते*

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now

रिसोड तालुक्यात काही ठिकाणी गौण खनिज बाबतीत नियमाचा धाक दाखवत कोणती शहानिशा न करता धडक कारवाया सुरू आहेत याबाबत रिसोड व्यापारी महासंघ यांनी तहसीलदार तेजनकर मॅडम यांची भेट घेऊन निवेदन दिले आहे याबाबत गौण खनिज अवैध ठरवत कारवाया सुरू आहेत याचा परिणाम बांधकाम ,शासनाने गरिबांना दिलेली घरकुल, इमारती बांधकाम, वर परिणाम होत असून मजूर वर्ग कामगार मिस्त्री यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.

रिसोड येथील व्यापारी नंदकिशोर बगडिया यांनी जुन्या घराची बांधकाम करण्यासाठी नियमानुसार रॉयल्टी भरून रीती आणली असून जुन्या घरी वाहतूक अडथळा येत असल्याने त्यांनी वाशिम रोड वर त्यांच्या जागेत वाळू साठा केला होता तसे लेखी त्यांनी प्रशासनाला कळवले होते तरी रेती बांधकामावर नेत असताना आपल्या कार्यालयाद्वारे रेती बेकायदेशी ठरवत कारवाई करण्यात येत आहे .

यामुळे रिसोड व्यापारी महासंघाने तहसीलदार यांची भेट घेत आम्ही घरकाम करायची तरी कशी असा प्रश्न उपस्थित करत सदर कारवाई थांबवावी व अशा घटना आपल्या कार्यालयाकडून होऊ नये असे निवेदन दिले आहे .यामध्ये मोठ्या संख्येने व्यापारी, मिस्त्री, मजूर वर्ग, प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now

Leave a Comment

seven + 20 =