ST Mahamandal: बसचालक मोबाइलवर बोलतोय? फोटो पाठवल्यास त्वरित कारवाई!

ST Mahamandal: बसचालक मोबाइलवर बोलतोय? फोटो पाठवल्यास त्वरित कारवाई!

एसटी चालविताना मोबाइलचा वापर नको : अन्यथा थेट निलंबन.

ST Mahamandal : एसटीचा प्रवास सुरक्षित प्रवास असल्याने यातून प्रवास करणाऱ्यांची संख्या अधिक आहे. परंतु काही चालक बस चालविताना मोबाइलवर बोलत असल्याने अपघाताचा धोका संभवतो. त्यामुळे आता एसटीचा चालक मोबाइलवर बोलताना आढळल्यास फोटो काढून पाठवा. त्वरित कारवाई केली जाईल, असे निर्देश एसटी महामंडळाने दिले आहेत.

बस चालवताना चालक मोबाइलवर बोलणारा एसटी चालकाचा व्हिडीओ एका प्रवाशाने काढला आणि व्हायरल केला. त्यामुळे चालकाची बेफिकिरी समोर आली. संबंधित चालकास त्यानंतर निलंबित करण्यात आले. परंतु आता हा प्रकार महामंडळाने गांभीर्याने घेतला असून, असे प्रकार करणाऱ्या चालकावर कठोर कारवाईचा निर्णय घेण्यात आला, प्रवाशांनीदेखील अशा प्रकारचे व्हिडीओ काढून पाठविल्यास संबंधित चालकावर कारवाई केली जाईल.

असे महामंडळाकडून जाहीर करण्यात आले आहे. बस चालविताना मोबाइलवर बोलण्यास मनाई करण्याबाबतचा आदेश २०१२ मध्येच काढला आहे. प्रवाशांचा जीव धोक्यात घालू नये, असे निर्देश पुन्हा देण्यात आले आहे. दुचाकी, चारचाकी वाहन चालवताना कोणाचाही फोन आला तर सरळ कानाला लावला जातो. अनेकदा चालकही बस चालविताना मोबाइलवर बोलत असतात. आता मात्र, अशांवर कारवाई होणार असल्याने त्यांनाही खबरदारी घ्यावी लागणार आहे.

सुरक्षित प्रवासासाठी एसटीच्या सूचना.

प्रवाशांच्या सेवेसाठी’ हे ब्रीदवाक्य एसटी महामंडळाचे आहे. एसटीचा प्रवास हा सुरक्षित प्रवास मानला जातो. त्यामुळे प्रवाशांचा प्रवास सुरक्षित व्हावा, यासाठी महामंडळाने सर्व विभाग नियंत्रण कार्यालयांना सूचना दिल्या. मुख्य सुरक्षा व दक्षता अधिकान्यांनी २६ ऑक्टोबर रोजी सर्व नियंत्रकांना या संदर्भात निर्देश दिले आहेत.

भरारी पथक ठेवणार नजर.

बसमध्ये विना तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवशांवर भरारी पथका कडून कारवाई केली जाते. या पथ- काकडून आता चालकावरही नजर ठेवली जाणार आहे. चालक मोबाइ लवर बोलताना आढळला तर पथका कडून कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे.

फोटो कुठे पाठवाल?

एसटी चालक मोबाइलवर बोलत बस चालवीत असेल तर एसटीच्या विभाग नियंत्रकांकडे फोटो पाठविता येणार आहे. आगार व्यवस्थापक वाहतूक निरीक्षकांनाही हे फोटो नागरिकांना पाठवता येईल. प्रवासानंतर बसस्थानकातही तक्रार करता येणार आहे.

एसटी चालक मोबाइलवर बोलताना आढळून आल्यास त्यांचा फोटो काढून पाठवावा, असे वरिष्ठांनी निर्देश दिले आहेत. एसटीमध्ये बसलेल्या प्रवाशांना तसेच नागरिकांना यासंदर्भात चालकाची तक्रार करता येणार आहे. अश्यावेळी तक्रार दाखल केल्यास त्या चालकावर निलंबनाची कारवाई होणार आहे.

 – चंद्रकांत कुहाटे, सहायक वाहतूक निरीक्षक, आर्वी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

2 × 4 =