SSC Hall Ticket 2025 : महाराष्ट्रात महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षक आणि उच्च माध्यमिक शिक्षक मंडळाकडून फेब्रुवारी आणि मार्च 2025 च्या दरम्यान दहावीची परीक्षा SSC Exams 2025 होणार आहे. विद्यार्थी या महत्त्वाच्या परीक्षेसाठी आता अभ्यासात व्यस्त आहेत दरम्यान माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावीच्या परीक्षेची प्रक्रिया सुरळीत राबविण्यासाठी परीक्षा मंडळ स्तरावर तयारी सुरू केली असू, येत्या दोन दिवसात एसएससी परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना त्यांचे परीक्षा हॉल तिकीट उपलब्ध होणार आहे.हे हॉल तिकीट ऑनलाइनरित्या जारी करण्यात येईल अशी माहिती परीक्षा मंडळाकडून देण्यात आली आहे.
यापूर्वी एसएससी परीक्षेचा वेळापत्रक ठरवून देण्यात आला असून,आता एसएससी हॉल तिकीट परीक्षा मंडळ सोमवार 20 जानेवारीपासून जारी करणार आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेमध्ये प्रवेशासाठी येत्या सोमवार 20 जानेवारी पासून एसएससी परीक्षा हॉल तिकीट SSC Exames Hall Ticket Online मिळणार असून,डाउनलोड केलेल्या हॉल तिकीटची प्रिंट संबंधित विद्यार्थ्यांच्या संबंधित शाळांकडून शिक्का आणि स्वाक्षरीसह उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
विद्यार्थ्यांनो असे करा आपले SSC Hall Ticket 2025 डाउनलोड?
- माध्यमिक परीक्षा मंडळाकडून सोमवार 20 जानेवारीपासून आपल्या अधिकृत वेबसाईटवर हॉल तिकीट ऑनलाइन उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
- सर्व माध्यमिक शाळांकडून आपापल्या शाळेतील दहावीच्या परीक्षेत बसणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना
www.mahahsscboard.in वर Admit Card या लिंकवरून दिलेल्या पर्यायातून प्रवेशपत्र Hall Ticket प्रिंट करून द्यावयाची आहेत. - माध्यमिक शाळांकडून SSC Hall Ticket 2025 परीकक्षेसाठी हॉल तिकीट प्रिंट करून उपलब्ध करून देताना,विद्यार्थ्यांकडून कोणताही वेगळा शुल्क आकारले जाऊ नये,असे निर्देश परीक्षा मंडळांने शाळांना दिलेले आहे.
- पेड स्टेटस Paid Status असलेल्या दहावीच्या विद्यार्थ्यांची प्रवेश पत्रिका या वेबसाईटवर रिलेटेड ऑप्शन मध्ये उपलब्ध असेल.
- माध्यमिक शाळांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी प्रवेश पत्रिका डाऊनलोड केल्यानंतर,आणि प्रिंट काढल्यानंतर संबंधित शाळेतील मुख्याध्यापकांचा हॉल तिकीट वर शिक्का आणि स्वाक्षरी करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे.
उल्लेखनीय म्हणजे दहावीच्या परीक्षेसाठी उशिरा अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांची शुल्कासह अर्ज स्वीकारल्या गेली आहेत. अशा विद्यार्थ्यांची हॉल तिकीट एक्स्ट्रा सीट आणि नो एडमिट कार्ड, या पर्यायाद्वारे वेबसाईटवर उपलब्ध असतील.
विद्यार्थ्यांचे परीक्षेपूर्वी किंवा परीक्षेदरम्यान हॉल तिकीट गहाळ झाल्यास, किंवा नष्ट झाल्यास संबंधित शाळांकडून अशा विद्यार्थ्यांना तात्काळ हॉल तिकीटची नवीन प्रिंट काढून आणि त्यावर डुप्लिकेट Duplicate असा शेरा देऊन, त्या विद्यार्थ्याला प्रवेश पत्र उपलब्ध करून द्यावे लागेल.
शिक्षण मंडळ सचिव देविदास कुलाळ यांनी दिली माहिती.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ सचिव देविदास कुलाळ यांनी या संदर्भात माध्यमांना माहिती देताना सांगितले की,एचएससी आणि एसएससी परीक्षेत बसणाऱ्या विद्यार्थ्यांचे हॉल तिकीट जर गहाळ झाले तर,त्यांनी आपल्या संबंधित शाळा किंवा ज्युनियर कॉलेज सोबत संपर्क साधावा, अशा विद्यार्थ्यांसाठी शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालयानी परीक्षा मंडळाच्या वेबसाईटवरून हॉल तिकीट ची नवीन प्रिंट काढावी, त्याच्यावर डुप्लिकेट शेरा,शिक्का आणि स्वाक्षरीनिशी अश्या विद्यार्थ्यांना द्यावा.
सोबतच विद्यार्थ्यांनी निर्धारित वेळेत आपले प्रवेश पत्र शाळांकडून प्राप्त करून,या महत्त्वाच्या परीक्षेसाठी तयारी करावी, असा सल्ला दिला आहे.दरम्यान 12वी ची एच एस सी परीक्षा ही 11 फेब्रुवारी 2025 पासून सुरू होत आहेत.बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रवेश पत्रे हे 10 जानेवारी पासूनच परीक्षा मंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. ज्या विद्यार्थ्यांचे प्रवेश पत्रावरील फोटो हे सदोष आहेत त्यावर दुसरा फोटो चिकटवून मुख्याध्यापकांची यावर शिक्का आणि स्वाक्षरी अनिवार्य असेल.
सदोष फोटो असलेले SSC Hall Ticket 2025 संदर्भात अशी करा कार्यवाही.
HSC Exames 2025 बारावीच्या परीक्षा येत्या 11 फेब्रुवारी 2000 पासून सुरुवात होणार आहे.यासाठी बारावीच्या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षा मंडळाकडून हॉल तिकीट 10 जानेवारीपासूनच परीक्षा मंडळाच्या वेबसाईटवर उपलब्ध आहेत.
यावर ज्या विद्यार्थ्यांचे प्रवेश पत्रावरील फोटो सदोष आहेत, अशा विद्यार्थ्यांनी ते हॉल तिकीट डाऊनलोड करून त्याच्यावर आपला स्वतःचा दुसरा फोटो चिकटवून,आपल्या शाळेच्या मुख्याध्यापकांमार्फत त्याच्यावर शिक्का आणि स्वाक्षरी करवून घ्यावी, अशी सूचना परीक्षा मंडळांने दिलेली आहे.