Soyabin Rates : महाराष्ट्रात गेल्या दोन वर्षापासून सर्वाधिक दयनीय परिस्थिती कापूस आणि Soyabin उत्पादक शेतकऱ्यांची झालेली आहे महाराष्ट्रात गेल्या दोन खरीप सत्रापासून सरकारने Soyabin चे पडलेले दाम वाढवून देण्यासाठी तसेच उत्पादनावर आधारित 15 टक्के नफा तसेच किमान आधारभूत किंमत (MSP) देण्यावर उदासीनता बाळगलेली आहे. राज्यात सध्या सोयाबीनला 5500 रुपये प्रति क्विंटल भाव मिळत आहेत,आणि कापसाला 6500 ते 7 हजार रुपयाचे भाव मिळत आहे.
मागील दोन वर्षापासून हे जर पडलेले असल्याने उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडलेले आहे. बाजारात भाव मिळत नसल्याने अनेक शेतकरी आपला माल घरीच ठेवून भाव वाढीची अपेक्षा करीत आहेत तर पुढची शेती करण्यासाठी अधिक उत्पादन खर्च लागल्यानंतरही हजारो शेतकऱ्यांना नुकसान सहन करून आपला माल विकावा लागला आहे.
त्यामुळे राज्यात हजारो शेतकरी कापूस आणि Soyabin ला भाव नसल्याने मोठे आर्थिक संकटात सापडले आहेत. मात्र आता लवकरच Soyabin चे भाव 5500 रुपयांवरून 6500 रुपयांपर्यंत वाढणार असल्याची माहिती समोर येत आहे.
मराठवाड्यात दुष्काळ परिस्थिती.
महाराष्ट्रात सध्या सर्वाधिक दयनीय अवस्था मराठवाडा आणि विदर्भातील शेतकऱ्यांची दिसत आहे. मराठवाड्यात सध्या दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे.तर दुसरीकडे विदर्भातील यवतमाळ आणि इतर जिल्ह्यात कृषी उत्पादनाला भाव नसल्याने तसेच मागील काही काळात पीक परिस्थिती धोक्यात आल्याने शेतकरी आत्महत्यांचे सत्र थांबलेले नाही.
सध्या विशेषकर मराठवाड्यात दुष्काळाचे परिस्थितीमुळे शेतकऱ्यांची अवस्था चिंताजनक असल्याची चर्चा आहे. मागील पावसाळ्यात मराठवाडा भागात पावसाचा अभाव होता त्यामुळे तेथे मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झालेले आहेत. गेल्या खरीप हंगामात शेतकऱ्यांनी प्रचंड घेऊन Soyabin लागवड केली मात्र मान्सून आणि त्यानंतरच्या विविध नक्षत्रात पावसाने दगा दिल्याने कापसाचे उत्पादन मराठवाड्यात घटले आहे त्यामुळे मराठवाड्यात या दोन्ही पिकांचे उत्पादनात मोठे कमी आलेली आहे.
यामुळे शेतकरी आर्थिक संकटात आलेले आहेत.यंदा खरीप हंगामात निघालेले Soyabin आणि कापूस काढण्यासाठी मजूर नसल्याने शेतकऱ्यांना मशीनने माल काढावा लागला.यात मोठा खर्च आला.मात्र बाजारात सोयाबीनला भाव नसल्याने शेतातून सोयाबीन काढण्यासाठी लागणारा आर्थिक खर्च पाहता शेतकरी विवंचनेत आले होते.
यानंतर कसातरी हाती आलेल्या Soyabin ला निवडणुकीनंतर बाजारात आणि सरकारी खरेदी केंद्रात योग्य भाव मिळेल या अपेक्षेने अनेक शेतकऱ्यांनी सध्या आपला माल घरातच राखून ठेवला आहे. तर ज्या गरीब शेतकऱ्यांना पैशांची सक्त जरूरत होती त्यांनी पडलेल्या भावात आपला Soyabin नुकसान सोडून विकून टाकला आहे.
काय म्हणते बाजाराची परिस्थिती.
या खरीप क्षेत्रात सोयाबीन पिकावर पावसाचा परिणाम झाला.मात्र काही प्रमाणात सोयाबीनची प्रत चांगली आहे. मात्र वेळोवेळी पावसाचा खंड पडल्याने यंदाच्या सत्रात सोयाबीन उत्पादनात कमी आलेली आहे. त्यामुळे सध्या बाजारात सोयाबीनची मागणी वाढताना दिसत आहे. दुसरीकडे सोयाबीन खाद्य तेलाचे भाव बाजारात वाढलेले आहे त्यामुळे सोयाबीन उत्पादनाची कमतरता आणि तेलाचे वाढलेले भाव हे मुद्दे पाहता शेतकऱ्यांना आता लवकरच सोयाबीनचा वाढीव भाव मिळणार असल्याचे अपेक्षा व्यक्त होत आहे. सध्या भाव वाढीची चर्चा आहे मात्र सरकारी खरेदी आणि खाजगी व्यापाऱ्यांकडून सध्या होत असलेल्या खरेदीमध्ये सोयाबीनला जुनेच दर मिळत आहे.
मात्र बाजारातील परिस्थिती पाहता शेतकऱ्यांनी जर थोडा धीर धरून उशिरा विक्री केली तर पुढील काही महिन्यात सोयाबीनचे दर 6000 पेक्षा अधिक किंबहुना 10 हजार रुपये प्रति क्विंटल दर मिळू शकतात अशी शक्यता आता दिसत आहे.महाराष्ट्रातील कृषी बाजार सोयाबीनला मिळणारे भाव आणि यातील उतार चढावा संदर्भात माहितीसाठी शेतकरी खालील लिंक वर क्लिक करून माहिती घेऊ शकतात Soyabin Rates
त्यामुळे कृषी बाजारक्षेत्रातील तज्ञ आता शेतकऱ्यांना सोयाबीन कापसाच्या भावामध्ये होणाऱ्या चढउतारावर लक्ष ठेवून त्यांनी आपला माल विकावा असा सल्ला देत आहे.