Solar Urja Yojana : नागरिकांना या माध्यमातून मिळेल मोफत वीज,काय आहे सोलर उर्जा योजना?
आपल्या दैनंदिन जीवनात व्यक्तिगत सार्वजनिक उद्योग प्रतिष्ठान,व्यापार आदि सर्व ठिकाणी विजेची मोठ्या प्रमाणात मागणी असते,देशात शासकीय स्तरावर वीज पुरवठा कंपन्यांक्डून पुरविण्यात येणाऱ्या वीजपुरवठामुळे सर्वांना वीज बिल स्वरूपात मोठी रक्कम करावी लागते.मात्र आता केंद्र शासनाने सौर उर्जा {Solar Urja Yojana} माध्यमातून नागरिकांना स्वस्त वीज पुरवठा मिळावा,यासाठी महत्वाची योजना सुरू केली असून फक्त 500 रुपयांमध्ये आयुष्यभरासाठी मोफत वीज मिळणार आहे.
विशेष म्हणजे वाढत्या महागाईच्या या काळात सर्वांसमोर वीज घेणे आणि त्याचा बिल अदा करणे हा मोठा आव्हान आहे. सर्वांना जरूर विजेची गरज असते आणि त्या आयोजित मोठा बिल भरावा लागतो या आर्थिक समस्येवर आता एक प्रभावी उपाय उपलब्ध झाला आहे. देशात सौर ऊर्जा पॅनल योजना अमलात आणली जात असून यातून सर्व नागरिकांना आपल्या घरावर सौर पॅनल बसवून वीज बिलातून नेहमीसाठी सुटका मिळविता येईल,याबाबत आपण जाणून घेऊ या.
काय आहे सौर पॅनल योजनेची विशेषता.
घरांवर सोलर पॅनल लावण्यासाठी केंद्र सरकारची एक ही महत्त्वाची योजना मानली जात आहे.या अंतर्गत देशाच्या प्रत्येक नागरिकांना आपल्या घरांच्या छतावर सौर पॅनल बसविण्यासाठी सरकारकडून अनुदान दिल्या जाते. त्यामुळे देशातील सर्वसामान्य नागरिकांना खूप कमी किमतीत सौर ऊर्जाद्वारे वीजपुरवठा मिळतो. नागरिकांना स्वस्त वीजपुरवठा या सौर योजनेद्वारे मिळणार असल्याने देशासाठी ही महत्त्वाची योजना आहे याद्वारे नागरिकांना स्वस्त वीज पुरवठा व्हावा हा सरकारचा उद्देश आहे. यात सौर ऊर्जेतून पुरवठा घेण्यासाठी नागरिकांना खूप कमी खर्च लागणार असून सोबतच शासनाकडून अनुदान सुद्धा मिळणार आहे.
किती मिळतो शासनाचा अनुदान.
नागरिकांना आपल्या घरावर सौर पॅनल बसविण्यासाठी खूप कमी खर्च लागणार आहे दोन किलोवॅट क्षमतेच्या सौर पॅनल साठी सर्वसाधारणपणे 1 लाख 20 हजार रुपयांचा खर्च येतो पण सौर ऊर्जा योजनेतून सरकारकडून यासाठी 40 टक्के अनुदान मिळत असल्याने यावर नागरिकांना फक्त 72 हजार रुपये खर्च करावे लागणार तर उर्वरित 48 हजार रुपये सरकार अनुदान स्वरूपात देते. ही योजना भारतात लागू झाली असून घरावर एकदा लागला तर हा वीजपुरवठा सिस्टम पुढील 25 वर्षे काम करणार आहे.यामुळे नागरिकांना भरमसाठ वीज पुरवठा बिलापासून सुटका मिळेल.
फक्त घरगुती वापरासाठी असेल सौर ऊर्जा पॅनल.
जर नागरिक सरकारी अनुदानातून आपल्या घरावर वीजपुरवठ्यासाठी पॅनल लावतील तर हे पॅनल घरगुती वीज पुरवठ्यासाठी वापरात येणार आहे.कारण व्यवसायिक आणि व्यापारी तसेच मोठ्या उद्योगांसाठी मोठ्या क्षमतेचे पॅनल आणि त्यासाठी उपकरण लागतात. उद्योग आणि व्यापारांसाठी सौर ऊर्जा पॅनल आणि त्याचे उपकरणावर मोठा खर्च करावा लागतो. दहा नग 250 वॅटचे सौर पॅनल आणि 2.5 kV GREED INVERTER यासाठी लागतात.
घरगुती सौर ऊर्जा पॅनलवर हे चालणार घरेलू उपकरण
घरावर लावण्यात येणारे सौर ऊर्जा पॅनल द्वारे विजपुरवठा होऊन याद्वारे अनेक घरगुती उपकरण विजेच्या माध्यमातून चालणार आहे,पण याचा पुरवठा हा प्राकृतिक ऊर्जेद्वारे होणार आहे.यातून घरातील कुलर पंखे रेफ्रिजरेटर सबमर्सिबल पंप,टीव्ही,एसी एलईडी लाईट,वॉशिंग मशीन, गिझर आणि इतर कमी क्षमतेचे वीज उपकरण या उर्जा माध्यमातून चालणार आहे.
कसे कराल योजनेसाठी अर्ज आणि काय लागतील कागदपत्रे?
सौर ऊर्जा पॅनल आपल्या घरावर बसविण्यासाठी अर्ज प्रक्रिया खूप सोपी असून यासाठी फार कमी कागदपत्रे आणि दस्तावेज लागतात. सर्व नागरिक यातून अर्ज करून आपल्या घरावर सौर पॅनल बसू शकतात सौर ऊर्जा योजनेचा लाभ घेण्यासाठी हे कागदपत्र लागतील.
# संबंधित कुटुंबाचे ration card
# आधार कार्ड
# अधिवास प्रमाणपत्र
# लाभ धारकाचा पासपोर्ट आकाराचा फोटो
# मोबाईल क्रमांकतसेच ई-मेल आयडी
# डोमिसाईल सर्टिफिकेट
हे कागदपत्रे लागतील
योजनेपासून हे lमिळणार फायदे.
सौर ऊर्जा पॅनल घरावर बसविल्याने वीजपुरवठ्यासाठी देणाऱ्या वीज बिलामध्ये मोठी आर्थिक बचत होते एकदा हा पॅनल घरावर बसला,तर पुढील 25 वर्षे त्या कुटुंबाला सहज वीज पुरवठा होऊन मोठी बचत होणार आहे.सोबतच यातून पर्यावरण संरक्षणासाठी प्रत्येक कुटुंबाचा हातभारही लागणार असून स्वच्छ ऊर्जा मिळून पर्यावरण संरक्षणात प्रत्येक जण योगदान देणार आहे.याव्यतिरिक्त विशेष म्हणजे सौर पॅनल घरावर लावण्यासाठी एकूण खर्चाचा मोठा आर्थिक भाग हा सरकारी अनुदान स्वरूपात मिळतो.यामुळे प्रत्येक कुटुंब वीज पुरवठ्यासाठी स्वावलंबी होणार आहे.
विशेष म्हणजे घरावर लावण्यात येणारे सौर ऊर्जा पॅनल हे फक्त वीज बिलातून सुटका मिळेल, यासाठीच नव्हे तर भविष्यातील सुरक्षित ऊर्जा आणि वीज पुरवठ्यासाठीहा महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.देशातील सर्वसामान्य नागरिक या soller Enrgy pannel योजनेचा लाभ घेऊन आपल्या घरात स्वच्छ ऊर्जेच्या वापराला प्राधान्य देतील अशी अपेक्षा आहे.