Solar Park In Maharashtra : पारंपरिक वीज पुरवठ्याला फाटा देऊन महाराष्ट्रात आधुनिक पद्धतीने सोलर पावर वर वीज निर्मिती आणि पुरवठ्याच्या संकल्पनेला मूर्त स्वरूप देण्यात आलेला आहे.सोलर पॅनल मधून सूर्यप्रकाशाची ऊर्जा घेऊन सोलर तांत्रिक माध्यमातून वीज निर्मिती झाल्याने विजेचे निर्माण आणि आर्थिक बचत होते.
तसेच पर्यावरणाची सुरक्षा आता सोलर एनर्जीमुळे होत आहे.त्यामुळे देशात आणि महाराष्ट्रात सोलर पावर वर आधारित वीज निर्मिती प्रकल्प,आणि घरगुती सोलर पॅनल माध्यमांना चालना देण्यात येत आहे. घरकुल योजनेत निर्माण झालेल्या घरांमध्येही सोलर पावर पॅनल बसविण्यासाठी राज्य सरकारने अनुदान योजना सुरू केली.
यानंतर आता महाराष्ट्र सरकारकडून राज्यातील चार जिल्ह्यांमध्ये Solar Park ची निर्मिती होणार आहे.या प्रकल्पांमुळे 1352 मेगावॅट सोलर माध्यमातून वीज निर्मिती होणार आहे.यातून शेतकऱ्यांना सिंचनासाठी दिवसात भरपूर वीज उपलब्ध होणार आहे. तर जाणून घेऊया महाराष्ट्रात सर्वात प्रथम कोणत्या ४ जिल्ह्यांमध्ये हे Solar Park उभारण्यात येणार आहे…..
महाराष्ट्रात चार जिल्ह्यात सोलर पावर वर आधारित पार्क निर्माण झाल्यानंतर राज्यभरातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी दिवसांमध्येही भरपूर विज उपलब्ध होणार असल्याचा दावा सरकारकडून करण्यात येत आहे.ग्रामीण भागात सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत कमी क्षमतेचे मात्र सोलर वीज निर्माण करणारे सौर ऊर्जा प्रकल्प केंद्र म्हणजेच Solar Park आहेत.
हे महावितरण कंपनीच्या राज्यभरातील अनेक वीज उपकेंद्र सोबत जुळलेले असेल,आणि ग्रिड मधून सोलर पावर पासून निर्माण होणारी वीज सिंचनासाठी शेतकऱ्यांना उपलब्ध होईल.हे Solar Park लवकरच उभारण्याचे काम सुरू होत आहे.
राज्यभरात सिंचनाकरिता Solar Park मधून 1352 मेगावॅट वीज निर्मिती होणार.
राज्य सरकारकडून समोर आलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रात छत्रपती संभाजी नगर, सोलापूर, पुणे आणि नाशिक या 4 जिल्ह्यात एसजेव्हीएन.ग्रीन एनर्जी कंपनीकडून हे Solar Park उभारण्यात येणार आहे.
यातून राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी सिंचनाकरिता वीज उपलब्ध होणार आहे,या Solar Park मधून एकूण 1352 मेगावॅट वीज निर्मिती होणार आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत लहान आणि मध्यम असे दोन आणि दहा मेगाव्हेट क्षमतेचे 102 सौर ऊर्जा प्रकल्प राज्यात उभारण्याचे लक्ष ठेवण्यात आले आहे.
चार जिल्ह्यात इतक्या क्षमतेचे Solar Park उभारणार.
- पुणे जिल्ह्यात निर्माण होत असलेल्या Solar Park अंतर्गत 9 ठिकाणी सोलर वीज निर्मिती होईल यातून 154 मेगावाट वीज निर्मिती होईल.
- नाशिक जिल्ह्यात उभारण्यात येत असलेल्या Solar Park अंतर्गत 22 ठिकाणी सोलर वीज निर्मिती केंद्र राहणार असून येथून 304 मेगावॅट सोलर माध्यमातून वीज निर्मिती होणार आहे.
- सोलापूर जिल्ह्यात 52 ठिकाणी सोलर वीज निर्मिती केंद्र राहणार असून येथून 579 मेगावॅट वीज निर्मिती होईल.
- छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात एकूण 19 ठिकाणी सोलर वीज निर्मिती केंद्र असेल तेथून 579 मेगावॅट वीज निर्मिती होईल.
वीज उपकेंद्रांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत सोलर वीज पोहोचेल.
वरील चार जिल्ह्यांमध्ये सोलर पार्क निर्माण झाल्यानंतर राज्यत वाहून नेणाऱ्या पॉवरग्रेडने हे सोलर पार्क जुळलेले असेल या प्रकल्पातून तयार होणारी वीज थेट शेतकऱ्यांच्या कृषी पंपाला पूरविली जाईल. राज्यभरातील शेतकऱ्यांना शेती सिंचनासाठी मोठी कसरत करावी लागते. दिवसा विज पुरवठा उपलब्ध होत नसल्याने ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना रात्री विजेचा पुरवठा होतो.
त्यामुळे रात्रपाळीतून शेतकऱ्यांना सिंचनासाठी कष्ट सोसावे लागते या सोलर पार्कमुळे निर्माण होणाऱ्या सोलर ऊर्जेतून शेतकऱ्यांना दिवसात सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत विजापुरवठा होणार आहे या योजनेअंतर्गत कमी क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प उभारले जात असून येथे तयार होणारी वीज महावितरण कंपनीच्या वीज उपकेंद्रांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पोहोचेल.
25 वर्षे शेतकऱ्यांच्या शेतांसाठी वीजपुरवठा करण्याचा लक्ष
महाराष्ट्रात पुणे सोलापूर नाशिक आणि छत्रपती संभाजी नगर या जिल्ह्यात ग्रीन एनर्जी कंपनी जे सोलर पार्क उभारणार आहे.त्याची देखभाल, तांत्रिक दुरुस्ती आणि संचालन करण्यासाठी राज्यभरात निविदा काढण्यात आलेले आहेत.या सोलर प्रकल्पातून महाराष्ट्रात पुढील 25 वर्षे शेतकऱ्यांच्या शेतांसाठी वीजपुरवठा करण्याचा लक्ष ठेवण्यात आला आहे.
उल्लेखनीय म्हणजे सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत निर्माण होणाऱ्या या सोलर पार्क प्रकल्पांमुळे महावितरणच्या विविध विविध उपकेंद्रांवर वीज पुरवठा संबंधात येत असलेला विजेचा भार कमी होईल,अशी अपेक्षा या प्रकल्पामुळे वर्तवली जात आहे.