Solar Car : भारतात सध्या इलेक्ट्रिक वाहनांचा {Electric Bikes And Cars} चलन वाढला आहे. लिथियम बॅटरी वर चालणाऱ्या बाईक आणि कार भारतात उत्पादन आणि त्यांचे रस्त्यांवर धावणे सुरू झाले आहे.भारतात वाहन बाजारात इलेक्ट्रिक वाहनांची चलती आहे.पेट्रोल वर लागणारा आर्थिक खर्च आणि पैश्यांची बचत करण्यासाठी ग्राहक ही इलेक्ट्रिक आणि लिथियम बॅटरीवर चालणाऱ्या बाईक्स आणि कार खरेदीसाठी प्राथमिकता देत आहेत.
इलेक्ट्रिक आणि लिथियम बॅटरीवर चालणाऱ्या वेगवेगळ्या वाहन बनविण्यासाठी प्रसिद्ध कंपन्या आणि स्टार्टअप कंपन्या सक्रिय असून. विविध डिझाईन, आधुनिक फीचर्स आणि रंगांमध्ये इलेक्ट्रिक वाहन बाजारात आले आहे. ते मोठ्या प्रमाणात रस्त्यावर धावताना दिसत आहे.मात्र आता लवकरच आता पर्यावरणाला पूर्णतः नुकसान टाळण्यासाठी सोलर पॅनल लागलेल्या कार सोलर एनर्जी चार्जिंग सिस्टमसोबत रस्त्यावर लवकरच धावताना दिसणार आहे.
पुण्यातील एका स्टार्टअप कार कंपनीने भारताची पहिली Solar Car बनवून तयार केली आहे ज्याला सोलर पॉवर वर फुल चार्जिंग होण्यासाठी फक्त 45 मिनिटे लागणार आहे.यानंतर ही कार घेऊन कुठेही फिरता येणे सहज ठेवणार आहे. या Solar Car ला प्रत्येक किलोमीटर फक्त 50 पैसे खर्च येइल,तर फक्त 5 सेकंदामध्ये 0 ते 40 किलोमीटरचा वेग प्राप्त करणारी या कारची स्पीड लिमिट प्रति तास 70 किलोमीटर राहणार आहे.
सौर उर्जेवर चालणारी भारतातील पहिली कार एक्सपो मध्ये प्रस्तुत होणार.
मुंबईत लवकरच राष्ट्रीय स्तरावर भारत मोबिलिटी ग्लोबल एक्सपो (Bharat Mobility Global Expo 2025) चे आयोजन होणार असून. या ग्लोबल कार एक्सपो मध्ये आधुनिक फीचर्स आणि सोलर पावर, लिथियम बॅटरी आणि इतर सौर उर्जेवर आधारित वाहनांचे सादरीकरण होणार असून,यात स्टार्ट अप कार कंपन्यां आपल्या आधुनिक Solar Car मॉडेल प्रदर्शन करतील.
यात आता पुण्यामधील प्रसिद्ध असलेली वेव्ह मोबिलिटी (VAYVE Mobility) या स्टार्टअप कंपनी आता इव्हा या सौर ऊर्जेवर चालणाऱ्या कारचा नवीन वर्जन प्रस्तुत करणार आहे. ही आपण अपग्रेडेड Solar Car असेल. यापूर्वी 2023 मध्ये झालेल्या ऑटो एक्सपो मध्ये इव्हा कारचे पहिल्यांदा सादरीकरण झाले होते. तेव्हापासून आतापर्यंत या कार्डचा फायनल प्रोडक्शन मॉडेल ची जी प्रतीक्षा होती ती आता संपणार आहे. कारण संपूर्ण भारतात सौर उर्जेवर चालणारी ही पहिली कार मानली जात आहे. जी आता अपग्रेड वर्जन मध्ये लवकरच बाजारात लॉन्च होऊ शकते.
सर्व सामान्यांसाठी परवडणारी कारची किंमत.
Vayve Solar (इव्हा सोलर)या कारची किंमत सर्व सामान्यांसाठी परवडणारी अशी राहणार आहे. प्राथमिक माहितीनुसार या Solar Car ची किंमत 10 लाख पर्यंत असू शकते, मात्र अद्याप किमती बद्दल कंपनीने अधिकृत माहिती सार्वजनिक केलेली नाही. मात्र या Solar Cars अंतिम प्रोडक्शन मॉडेल सादर करण्यात आलेला आहे. तिची किंमत ही बाजार मध्ये असलेल्या इतर Solar Car च्या किमती सोबत स्पर्धा करणारी असेल. आधुनिक असे फीचर असल्याने या कारला बाजारात खूप प्रतिसाद मिळण्याची चिन्हे दिसत आहे.
मेट्रोसिटी ट्रॅफिक लक्षात घेत बनविले कारचे डिझाईन.
सौर उर्जेवर चालणारी ही इव्हा कारची जी डिझाईन आहे ती खूप आकर्षक तर आहेच,पण त्याच्या कंपनीने मेट्रोसिटी मध्ये असणाऱ्या ट्रॅफिकला लक्षात ठेवून याची साईज आणि विशेष डिझाईन बनविले आहे.यामुळे चालताना रस्त्यात या कारला फार कमी जागा लागते. त्यामुळे ट्रॅफिक मध्ये याला ड्राईव्ह करणे सहज शक्य राहणार आहे.विशेष म्हणजे या कारची पार्किंगही फार कमी जागेत करता येईल.
एक किलोमीटर ला फक्त 50 पैसे खर्च येणार.
मी आधुनिक कार खूप कमी खर्चात जास्त किलोमीटरची रेंज देणार आहे.या कार मध्ये फक्त 50 पैसे खर्च करून एक किलोमीटर अंतर कापता येणार आहे. आपण याच्या स्पीड बाबत विचार केला तर, गिअर टाकतात एक्सलेटर देताच सुरुवातीच्या पाच सेकंद मध्ये ईव्हा ही कार 0 ते 40 किलोमीटर्सचा वेग प्राप्त करू शकते.ही याची खासियत राहणार आहे.तर कारची minimum speed limit प्रती तास 70 किलोमीटर असेल. त्यामुळे या कारणा चालवताना याचा रनिंग कास्ट खूप कमी असून कार मध्ये स्मार्टफोनला सिस्टम जोडण्यासाठी विशेष फीचर असेल.
एकदा पूर्ण चार्ज झाली तर 250 किलोमीटरची रेंज.
‘वेव्ह मोबिलिटी’या कंपनीने ईव्हा या कार संदर्भात केलेल्या दाव्यानुसार याला एकदा पूर्ण चार्ज करताच ही कार तब्बल 250 किलोमीटरची रेंज देईल.या कारच्या छतावर सोलर पॅनल्स लावण्यात आलेले आहेत त्याच्या मदतीने ईव्हा कार एका वर्षात 3 हजार किलोमीटरचा अंतर कापू शकणार आहे. उल्लेखनीय म्हणजे या कारला आधुनिक असा अल्ट्रा फास्ट चार्जिंग सपोर्ट देण्यात आला असून फक्त पाच मिनिट चार्ज करताच 50 किलोमीटर पर्यंत ची रेंज ही कार देऊ शकते.