Smartwatch New Feature : जाणून घ्या स्मार्टवॉच कसे सोडवणार सिगारेट ओढण्याचे व्यसन !

Smartwatch New Feature : अनेक लोकांना विविध व्यसन असतात यात सिगारेट ओढण्याचे व्यसन असणाऱ्या लोकांना हे व्यसन सोडावे यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात. मात्र आता इंग्लंड मधील ब्रिस्टल विद्यापीठातील वैज्ञानिकांनी आधुनिक युगात प्रसिद्ध झालेली स्मार्ट वॉच टेक्नॉलॉजी मध्ये एक असा स्मार्ट वॉच ॲप तयार केला आहे,जे सिगारेट व्यसन सोडविण्यासाठी महत्त्वाची मदत करणार आहे.

Bristol University Scientist Developed New Smartwatch App.यासाठी वैज्ञानिकांनी स्मार्ट वॉच ॲप तयार केले आहे.हे स्मार्टवॉच एप्लीकेशन कसे काम करते हे,आपण जाणून घेऊया.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now

सध्या स्मार्टफोन आणि स्मार्टवॉच जमाना आहे.स्मार्टवॉच जगातील विविध देशातील समयसारिणीनी सोबतच, स्मार्टफोन सारखे कॉलिंग मेसेजिंग सुविधा देण्यासोबतच स्मार्ट वॉच वापरणाऱ्यांना “फिटनेस फ्रेंडली” ठरली आहे.

अनेक लोक तर स्मार्ट वॉच फक्त यातील फीचर्स हे शारीरिक फिट राहण्यासाठी फायदेशीर असल्यानेच वापरतात.स्मार्ट वॉच आरोग्याची काळजी घेण्याची मदत तर करतेच,पण आता स्मार्टवॉचमुळे मोठा फायदाही समोर आला आहे.

ब्रिस्टल युनिव्हर्सिटीच्या वैज्ञानिकांनी बनविलेले स्मार्ट वॉच एप्लीकेशन मुळे आता सिगारेट ओढण्याची सवय बंद केली जाऊ शकते. ही स्मार्टवॉच आता धुम्रपानाच्या व्यसनांपासून मुक्ती देणार आहे.New Smart Watch App Will Free From Cigarette Habit.

ब्रिस्टल विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी जो स्मार्ट वॉच एप्लीकेशन तयार केला आहे.ते सिगारेट ओढण्याची सवयीपासून आणि सिगारेट पिण्यापासून मुक्त होण्यासाठी कशी मदत करू शकते?हे ॲप्लीकेशन कसे काम करते? हे आपण समजून घेऊया.

Smartwatch New Feature : अशी काम करणार स्मार्टवॉच एप्लीकेशनची टेक्नॉलॉजी.

सध्या बाजारात एप्पल स्मार्ट वॉच Apple Smartwatch  सह विविध कंपन्यांचे अनेक फिचर्स असलेले स्मार्ट वॉच उपलब्ध आहेत. या स्मार्ट वॉच मध्ये एक्सलेरोमीटर Accelerometer sensor आणि जायरोस्कोप सेंसरची Gyroscopic sensor सुविधा दिलेली असते. मात्र आता ब्रिस्टल युनिव्हर्सिटीच्या शास्त्रज्ञांनी बनवलेल्या स्मार्ट वॉच ॲप मध्ये लावण्यात आलेल्या सेंसरचा वापर आपल्या शारीरिक हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी कामी येणार आहे.

विशेष म्हणजे या स्मार्ट वॉच मध्ये लावल्या गेलेले सेंसर हे अवघ्या काही मिनिटातच हा एप्लीकेशन वापरणाऱ्या युजरची सिगारेट ओढण्याची क्रिया तात्काळ ओळखू शकेल.

स्मार्ट वॉच मध्ये एक्सलेरोमीटर Accelerometer आणि जायरोस्कोप  Gyroscopic सह app मध्ये  सेंसरची सुविधा

  • मनगटावर हा स्मार्ट वॉच लावलेल्या आणि ॲप स्विच ऑन केलेल्या स्थितीमध्ये जर एखादा व्यक्ती वारंवार सिगारेट ओढण्याची क्रिया करीत असेल,तेव्हा हा स्मार्ट वॉच अप्लिकेशन त्याला लगेच सेन्सर प्रक्रियेतून Sensor System Alert अलर्ट पाठवते.
  • हा अलर्ट स्मार्ट वॉच स्क्रीनवर व्हायब्रेशन होईल.
  • सोबतच वेळोवेळी मोटिवेशनल मेसेज मिळेल.
  • हे मेसेज स्मार्ट वॉच ॲप वापरणाऱ्या व्यक्तीला जर सिगारेट ओढण्याची सवय असेल तर त्यापासून परावृत्त करण्यासाठी असेल.

या 18 शास्त्रज्ञांची चाचणीसाठी झाली होती निवड.

लंडन येथील ब्रिस्टल युनिव्हर्सिटी मध्ये हे स्मार्ट वॉच एप्लीकेशन बनविण्यापूर्वी 18 वैज्ञानिकांची निवड करण्यात आली होती नुकतेच जनरल ऑफ मेडिकल इंटरनेट रिसर्च फॉर्मेट रिसर्च JMIR फॉरमॅटमध्ये प्रकाशित झालेल्या माहितीनुसा, हे तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी आणि चाचणीसाठी करण्यात आलेली प्रक्रिया आणि यासाठी कोणी प्रयत्न केले याची माहिती देण्यात आली आहे.

या स्मार्टवॉच रिसर्च मध्ये सामील असलेल्या 18 लोकांनी तब्बल 2 आठवडे नियमित हे स्मार्ट वॉच एप्लीकेशन वापरले.यादरम्यान त्यांनी प्रत्येक वेळी सिगारेट ओढण्याचा प्रयत्न केला,आणि त्यांना रियल टाईम मध्ये अलर्ट मिळत होता.स्मार्ट वॉच स्क्रीनवर व्हायब्रेशन सह येणारे मेसेज हे एप्लीकेशन मध्ये फिट करण्यात येणारे प्रेरणादायी मेसेज असल्याने त्यांना सिगारेट ओढण्यापासून परावृत्त करण्यासाठी याची खूप मदत मिळाली.

स्मार्ट वॉच साठीच या अप्लिकेशनचीनिवड का?

ब्रिस्टल युनिव्हर्सिटी मध्ये ज्या शास्त्रज्ञांनी हे स्मार्टफोन एप्लीकेशन विकसित केले त्यांची निवड ही त्यांच्या तांत्रिक वैशिष्ट्यांमुळे करण्यात आली. या शास्त्रज्ञांनी हा ॲप स्मार्टवॉच साठी विकसित करण्यापूर्वी त्यांनी याला स्मार्टफोन मध्ये वापरले होते.

मात्र शेवटी यासाठी स्मार्टफोन ऐवजी स्मार्ट वॉच साठी एप्लीकेशन का निवडण्यात आले हा प्रश्न अनेकांना पडत असेल?तर यामागे कारण सांगण्यात आले आहे की ही स्मार्ट वॉच नेहमी मनगटावर बांधण्यात येते,आणि ते ताबडतोब अलर्ट पाठवू शकते, यासाठी स्मार्टफोन्स जास्त प्रभावी नाही.

त्यामुळे स्मार्ट वॉचसाठी शेवटी हा एप्लीकेशन तयार करण्यात आला आहे. यातून आता सिगारेट ओढणाऱ्या लोकांना ही सवय सोडण्यासाठी महत्त्वाची मदत मिळणार आहे.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now
Sharing Is Caring:

Leave a Comment

ten − three =

Whatsapp ने लॉंच किया नया फीचर , Whatsapp Channels. 5 पड़ावों से होकर गुजरता है रिश्ता. देश के सबसे महंगे वकील Harish Salve ने 68 वर्ष की उम्र में की तीसरी शादी. रूस ने मार गिराए यूक्रेन के  3  ड्रोन. रूस का लूना – 25 चांद पर क्रैश.