चेतन पवार दारव्हा तालुका प्रतिनिधी
Skill Development Centre: सद्यस्थितीत कोणतेही सरकार विद्यार्थ्यांना कमी कालावधीत रोजगार मिळवून देऊ शकत नाही. दुसरीकडे कॉर्पोरेट क्षेत्रात अनेक कंपन्या कौशल्य संपन्न मनुष्यबळाच्या शोधामध्ये आहे. यामुळे आपल्या ग्रामीण भागातील तरुणांना शहरात नोकरी मिळू शकत नाही.
हीच गरज लक्षात घेऊन, ग्रामीण परिसरातील युवा, युवती व महिलाना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देऊन त्यांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देणे या उद्देशाने कला व वाणिज्य महाविद्यालय, बोरी अरब येथे सायास कौशल्य विकास केंद्र सुरू करण्यात आले. या माध्यमातून टेलरिंग,ब्युटी व मेहंदी कोर्से इत्यादीअभिनव उपक्रम सुरू करण्यात आले.
संबंधित कोर्सेस 2 महिन्याचे कालावधीचे असून यामध्ये बेसिक व adavance प्रशिक्षण घेऊन या माध्यमातून मुली व गरजू महिला स्वतःच्या पायावर उभ्या राहू शकतील. लघु उद्योगांना प्रोत्साहन देणारा हा कोर्स सर्वासाठी खुला असून याकरिता महाविद्यालय व महाविद्यालय बाहेरील मुली, महिला प्रवेश घेऊ शकतात. सुसज्ज आणि सर्व साधन सामग्रिने समृद्ध असलेल्या या केंद्रामध्ये विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून मूल्यमापन केल्या जाते.
प्राविण्यप्राप्त सदस्यांना व कोर्स पूर्ण करणाऱ्या सर्व सदस्यांना NSDC चे प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात येते. त्यामुळे परिसरातील सर्व इच्छुक सदस्यांनी त्वरित आपला प्रवेश निश्चित करावा अशाप्रकारचे आवाहन प्राचार्य व सायास कौशल्य विकास केंद्राच्या वतीने करण्यात आले.