सोमवार ठरला अपघात वार.

दारव्हा तालुका प्रतिनिधी: चेतन पवार

अपघाताच्या मालिकेने उपजिल्हा रुग्णालयात नातेवाईकांची गर्दी.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now

दारव्हा : दीपावलीच्या दुसऱ्या दिवशी दारव्हा तालुक्यातील मानकी आंबा येथे संत श्री उद्धव बाबा यांची यात्रा मोठ्या प्रमाणात भरत असल्याने भाविक भक्तांची गर्दी मोठ्या प्रमाणात असते त्याचप्रमाणे ग्रामीण भागामध्ये क्रिकेटचे सामने ठिकठिकाणी असल्याने क्रिकेट प्रेमी युवक बेधुंद अवस्थेत वाहन चालवीत असल्याने समोरासमोर धडक होऊन अनेक अपघातामध्ये अनेक रुग्ण जखमी झाल्याची घटना सोमवार दिनांक 13 नोव्हेंबर रोजी रात्री आठ वाजता दरम्यान घडली.

दीपावलीच्या दुसऱ्या दिवशी मानकी आंबा येते संत श्री उद्धव बाबा यांची यात्रा यात्रेकरूंसाठी तथा भाविक भक्तांसाठी आकर्षणाचे ठिकाण असून जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक भक्त उद्धव बाबा यांच्या दर्शनाकरिता येत असतात सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रम असल्याने मानकी आंबा कडे जाणाऱ्या भाविक भक्तांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते.

रस्त्यावरून चालणे सुद्धा कठीण होऊन बसते अशी परिस्थिती निर्माण झालेली असते याच दरम्यान ये जा करताना अनेक वाहनांची धडक होऊन तर काही वाहन पलटी होऊन त्यामध्ये अनेक झाल्याने त्यांना दारव्हा येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आले.

मात्र दारव्हा उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय सेवा तथा डॉक्टर यांना रेफरची लागण झाल्याने या ठिकाणी नुसती मलमपट्टी करून यवतमाळ रेफर करण्याचा आजार वैद्यकीय सेवेतील अधिकारी व कर्मचारी यांना लागलेला आहे अपघातामध्ये जखमी झालेल्या रुग्णांची क्ष कीरन कक्षा द्वारे तपासणी सुद्धा करण्यात आली नाही त्या रुग्णांना सरळ सरळ यवतमाळ येथील रेफर सीट बनवून देण्यात आली.

रुग्णांना नेण्याकरिता रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याने रुग्णांना बराच वेळ ताटकळत बसावे लागले रुग्णांच्या नातेवाईकांना खाजगी वाहनाची व्यवस्था करून रुग्णांना यवतमाळ नेण्याची वेळ नातेवाईकांवर आली अपघातामध्ये मानकी आंबा नांदगव्हाण कुंभार किनी इत्यादी गावाचा समावेश असून दारव्हा कुपटा रोडवर अनेक अपघात झाल्याची माहिती सूत्राकडून मिळालेली आहे.

शासकीय रुग्णालयामध्ये व्यवस्था होत नसल्याने अनेक रुग्णांनी खाजगी रुग्णालयात रुग्णांना भरती केले एका रुग्णांची प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचाराकरिता नागपूर येथे पाठविण्यात आले एक रुग्ण वसंतराव नाईक शासकीय महाविद्यालय यवतमाळ येथे तर अनेक रुग्ण खाजगी दवाखान्यामध्ये जाऊन भरती झाले शासकीय वैद्यकीय सेवा नावापूर्तीच उरली असल्याने सदर इमारत नुसता पांढरा हत्ती ठरत असल्याने याबाबत नागरिकांमध्ये कमालीची संतापाची लाट पसरली असून याकडे लक्ष देणे गरजेचे झाले आहे.

बॉक्स.

निवासी वैद्यकीय अधिकारी वेळेवर उपस्थित राहत नसल्याने रुग्णांना उपचारा अभावी ताटकळत बसावे लागते एन एन एम ए एन एम, हेच रुग्णांचे उपचार करीत असल्याने वैद्यकीय अधिकाऱ्यांचे काय काम आहे वैद्यकीय अधिकारीच हजर राहत नसल्याने ही बाब अतिशय गंभीर असून या बाबीकडे जिल्हा शल्य चिकित्सक यांनी लक्ष देऊन या विषयांमध्ये सुधारणा करण्याची गरज असल्याचे जनतेमधून बोलल्या जात आहे.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now
Sharing Is Caring:

Leave a Comment

16 + 14 =

Whatsapp ने लॉंच किया नया फीचर , Whatsapp Channels. 5 पड़ावों से होकर गुजरता है रिश्ता. देश के सबसे महंगे वकील Harish Salve ने 68 वर्ष की उम्र में की तीसरी शादी. रूस ने मार गिराए यूक्रेन के  3  ड्रोन. रूस का लूना – 25 चांद पर क्रैश.