Anil Deshmukh | Devendra Fadnavis : Thakare पिता-पुत्रांना अडकवण्याचा डाव, अनिल देशमुखांवरही दबाव, Shyam Manav यांचा खळबळजनक दावा.

Anil Deshmukh | Devendra Fadnavis : Thakare पिता-पुत्रांना अडकवण्याचा डाव, अनिल देशमुखांवरही दबाव, Shyam Manav यांचा खळबळजनक दावा.

उद्धव ठाकरे,आदित्य ठाकरेना तुरुंगात टाकण्यासाठी शपथपत्र तयार करून सही करा”गृहमंत्री देशमुख”अन्यथा….वाचा देवेंद्र  फडणवीसांवर श्याम मानव यांचे आरोप…

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now

नेहमी राज्यात अंधश्रध्देबद्दल जनजागरण करणारे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष श्याम मानव यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप केले आहेत.तत्कालीन मुख्यमंत्री व शिवसेना कार्यकारी अध्यक्ष उद्धव ठाकरे व त्यावेळी कॅबिनेट मंत्री असलेले त्यांचे पुत्र आदित्य ठाकरे यांना तुरुंगात धाडण्यासाठी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर ईडीची कारवाई व तुरुंगात जाण्याचा धोखा टाळण्यासाठी 4 शपथपत्र तयार करून त्यांच्यावर सही करण्याचा दबाव टाकण्यात आला होता,असा सनसनाटी आरोप व राजकीय स्तरावर आतापर्यंत गोपनीय अशी माहिती श्याम मानव यांनी नागपूर येथे पत्र परिषदेत बोलताना आपल्या वक्तव्यातून उजागर केली आहे.या आरोप व संदर्भात तत्कालीन गृहमंत्री असलेले अनिल देशमुख यांनी लगेच वक्तव्य करून या मुद्द्याला बळ दिला आहे.

तुरुंगात धडण्यासाठी रचला होता डाव.

राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीची सरकार असताना त्यावेळचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर दबाव टाकुन आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे, अनिल परब यांना तुरुंगात टाकण्याचा डाव रचला होता,राज्यात राजकीय वातावरण ढवळून टाकणारा धक्कादायक असा दावा अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष श्याम मानव यांनी केला आहे.या आरोपांमुळे बुधवारी राजकीय स्तरावर खळबळ माजली आहे.सोबतच मानव यांनी वर्तमान उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नाव घेत म्हटले आहे की,गुटखा व्यवसायीकांकडून अजित पवार राज्यभर वसुली करीत होते असा शपथ पत्र तयार करून त्याच्यावरही  सही करण्याचा दबाव देशमुख यांच्यावर टाकण्यात आला होता.श्याम मानव यांच्या या आरोपांवर अनिल देशमुख यांनीही बळ देत या संदर्भात आपल्याकडे या सगळ्यांचे पुरावे असल्याचे म्हटले आहे.

मानवांचे फडणवीस यांच्यावर काय आहेत आरोप?

“अनिल देशमुख गृहमंत्री असताना त्यांना फडणवीस यांनी संपर्क साधून बोलावलं होत,त्यांच्याकडून सांगण्यात आलं होतं की, तुम्हाला ईडीच्या प्रकरणातून स्वतःची सोडवणूक करून घ्यायची असेल, तर शपथपत्र तयार करून सही करा. देवेंद्र फडणवीस यांनी अनिल देशमुख यांना म्हटले होते की शपथपत्रावर लिहा की मुख्यमंत्री असलेले उद्धव ठाकरे यांनी तुम्हाला मुख्यमंत्री बंगल्यावर बोलावून बार वाल्यांकडून १०० कोटी रुपयांच्या वसुली करण्याचे आदेश दिले होते,सोबतच आदित्य ठाकरे यांनी दिशा सालियन नावाच्या मुलीवर बलात्कार करून तिचा खून केला होता,तेव्हाचे कॅबिनेट मंत्री अनिल परब यांचंही नाव त्यांच्याशी संबंधित बेकायदेशीर व्यवहारांच्या प्रकरणात घ्यावं.असे 4 शपथपत्र तयार करून व त्यावर सही करण्यासाठी दबाव टाकण्यात आला होता,अनिल देशमुखांना ईडी कारवाई व तुरुंगात जाण्यापासून स्वतचं बचाव करण्यासाठी हा पर्याय देवून त्यांच्यावर हा सर्व दबाव टाकण्यात आला होता,पण गृहमंत्री असल्याने जबाबदारीचे भान ठेवून ते या दबावाचे शिकार झाले नाही,अशी माहिती श्याम मानव यांनी सार्वजनिकरीत्या समोर आणली आहे.

अनिल देशमुखांवर अजित पवारांबद्दलही टाकण्यात आला दबाव.

तत्कालीन गृहमंत्री “अनिल देशमुख यांच्यावरही फडणवीस यांनी दबाव आणून म्हटले होते की,तुम्ही तपास यंत्रणांना जबाब द्या की, उपमुख्यमंत्री असलेले अजित पवारांनी पार्थ पवारांच्या उपस्थितीत त्यांना देवगिरी बंगल्यावर बोलावले व राज्यात गुटखा व्यवसाय करणाऱ्या लोकांकडून कोट्यवधी रुपयांची वसुली करून द्यावी,असं सांगितलं होतं. पण अनिल देशमुख यांनी तसं करण्यासही नकार दिला. अनिल देशमुख हे अजित पवार यांना जर अडकवू शकत नसेल तर किमान उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि अनिल परब यांची नावं घेऊन त्यांना खोट्या प्रकरणात अडकवा,यासाठी वरील ऑफर देण्यात आली होती, असा आरोप श्याम मानव यांनी केला आहे.सोबतच त्यांनी अनिल देशमुखांच्या हिमतीची प्रशंसा करून म्हटले की,मी अनिल देशमुख यांना सलाम करतो की,त्यांनी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, अनिल परब या तिघांचं नाव घेण्यास व लिहून ठेवलेल्या शपथ पत्रांवर सही करण्यास नकार दिला.या षडयंत्राला नकार दिल्यानेच नंतर अनिल देशमुख यांना १३ महिने तुरुंग भोगावं लागलं,सोबतच संजय राऊत यांनाही देवेंद्र फडणवीस व त्यांच्या टीम ने अशाच पद्धतीनं खोट्या प्रकरणात अडकविले होते,असा दावाही श्याम मानव यांनी केला आहे.

हो देवेंद्र फडणवीस यांनी मला शपथपत्र तयार करावयास सांगितले होते – अनिल देशमुख

श्याम मानवांच्या देवेंद्र फडणवीस यांच्यावर या गंभीर आरोपांच्या पार्श्वभूमीवर तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी तात्काळ राजकीय स्तरावर भाष्य केले आहे अनिल देशमुख यांनी म्हटले आहे की,मला देवेंद्र फडणवीस यांनी तीन ते चार प्रतिज्ञापत्रं तयार करून द्यायला सांगितली होती.पण मी त्यांना स्पष्ट सांगितलं की अश्या प्रकारे मी कुणावरही खोटे आरोप करणार नाही. हे सांगितल्याने व प्रतित्रापत्र करून देण्यास नकार दिल्यानेच नंतर माझ्यामागे ईडी-सीबीआय चा ससेमिरा लागला व मला अटक करण्यात आली,अस वक्तव्य अनिल देशमुख यांनी केलं आहे. सोबतच च श्याम मानव यांनी या संदर्भात जे दावा केलेत ते सर्व योग्यच असून माझ्याकडे या सर्व बाबींचे पुरावे आहेत असेही अनिल देशमुख यांनी म्हटले आहे.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

3 + twenty =