महाराष्ट्रातील MSRTC ची Shivshahi Bus सेवा बंद होणार ? जाणून घ्या कारणे ?

Shivshahi Bus : तत्कालीन महाराष्ट्र सरकार आणि महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाकडून महाराष्ट्रात सर्वसामान्य नागरिकांना आरामशीर आणि सुविधाजनक प्रवासासाठी मोठ्या गाजावाजा करीत शिवशाही एसटी बस सेवा काही वर्षापूर्वी सुरू करण्यात आली होती.मात्र आता एमएसआरटीसीच्या उदासीन कामकाज आणि या शिवशाही बसेसचे योग्य देखभाल न झाल्याने आता शिवशाही बस सेवा एकूणच बंद होण्याच्या मार्गावर आलेली आहे. {MSRTC SHIVSHAHI BUS SERVICE}.

लवकरच राज्य परिवहन महामंडळाच्या ताफ्यात सामील असलेल्या शेकडो शिवशाही बसेस बंद होण्याच्या मार्गावर आली आहे.त्यामुळे एअर कंडिशनर आणि चांगली आसन व्यवस्था खराब झालेल्या शिवशाही बस महाराष्ट्राच्या रस्त्यांवर आता धावताना दिसणे दुरापास्त होणार आहे.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now

राज्यात सर्वसामान्य मध्यमवर्गीय प्रवाशांना किफायती दरात आरामशीर आणि एअर कंडिशनसह चांगली आसन व्यवस्था असलेल्या बसमध्ये प्रवास करता यावा,यासाठी एमएसआरटीसीच्या बस सेवेत शिवशाही या आलिशान बसला दाखल करण्यात आले होते.{MSRTC Shivshahi Bus Service}.

त्यानंतर मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रातील रस्त्यांवर मागील अनेक वर्षांपासून ह्या शिवशाही बसेस धावत आहे.मात्र राज्य परिवहन महामंडळाकडून या मोठ्या बसेसचे नियमित Maintenance होत नसल्याने शिवशाही मध्ये नागरिकांना प्रवास करणे अडचणीचे ठरले आहे.

अनेक शिवशाही बस मध्ये Air Condition आणि आसन व्यवस्थेची दुरवस्था झाली आहे.मात्र MSRTC कडून या बस मध्ये प्रवासासाठी सुद्धा जास्त दर आकारण्यात येत असल्याची प्रवाश्यांची तक्रार दिसत आहे.

खाजगी ट्रॅव्हल्स कंपन्या देत आहेत शिवशाही बसला टक्कर.

SRTC च्या ताफ्यात असलेल्या शिवशाही बस बसेसचा योग्य रखरखाव होत नसल्याने त्यांची दुरावस्था झाली आहे.{MSRTC Shivshahi Bus Maintenance System}.तर दुसरीकडे राज्यात खाजगी ट्रॅव्हल्स कंपन्या  आलिशान वातानुकूलित श्रेणी आणि चांगली आसन व्यवस्था असलेल्या Travels गाड्या चालवीत आहेत.

त्यामुळे प्रवाशी एमएसआरटीसीची शिवशाही बसमधील खडतर प्रवास टाळून खाजगी बसेस मध्ये जास्त पैसे देवून प्रवास करीत आहे.सध्या खाजगी ट्रॅव्हल्स कंपन्या चांगली सुविधा देवून शिवशाही बसला टक्कर देताना दिसत आहे.यामुळे MSRTC ला आर्थिक नुकसान होत असल्याचे दिसत आहे.

याचे प्रमुख कारण शिवशाही बस व्यवस्था आणि देखभाल वर उदासीन धोरण असल्याचे बोलले जात आहे.अव्यवस्थेमुळे शिवशाही बससेवा आता कुचकामी ठरताना दिसत आहे.

उल्लेखनीय म्हणजे खाजगी कंपन्यांच्या लांब पल्ल्याच्या वातानुकूलित  ट्रॅव्हल्स बसेस मध्ये चांगली सुविधा असल्याने सर्वसामान्य पुरुषांचा ओढा खाजगी बसेस कडे वळला आहे.

एकूणच खाजगी ट्रॅव्हल्स कंपन्या शिवशाही बसेसच्या तुलनेने चांगली सेवा देत आहे,यामुळे किंबहुना जास्त पैसे देत प्रवासी अश्या बसला प्राधान्य देत आहे.

कारण जास्त तिकीट दर नुसार पैसे अदा करुनही शिवशाही बस मध्ये सुविधा मिळत नसल्याची अनेक तक्रारी आहे.त्यामुळे एक्नादारच शिवशाही बसची सेवा एमएसआरटीसी प्रशासनाच्या उदासीन धोरणामुळे माघारली आहे.

Shivshahi Bus : हे आहेत सेवा माघारण्याचे प्रमुख कारण.

  • महाराष्ट्रात राज्य परिवहन महामंडळाकडून {MSRTC} एसटी बस ताफ्यात आलिशान अशा शिवशाही बसेस आधुनिक सुविधांसह उपलब्ध करण्यात आल्या होत्या.System बिघडलेले आहे.
  • अनेक बसमध्ये वातानुकुलीत यंत्रणेत प्रवासादरम्यान बिघाड येत असल्याने प्रवाश्यांना ही सुविधा मिळत नाही.
  • शिवशाही बसेस मध्ये आसन व्यवस्था खूप खराब झालेली दिसते.
  • या बस माध्यमातून प्रवाशांना स्वस्त दरात वातानुकूलित प्रवास करणे अडचणीचे ठरले आहे.
  • आता अनेक शिवशाही बसेसची तांत्रिक स्तरावर दुरावस्था झाली आहे.GPS,wIfi System बंद पडलेले आहे.
  • एमएसआरटीसी कडून गेल्या अनेक वर्षापासून शिवशाही बसेस मेंटेनन्स वर खर्च किंवा सुविधांमध्ये वाढ होताना दिसत नाही.
  • अनेक शिवशाही बस नादुरुस्त झाले असून त्यात असलेली एअर कंडिशनर सिस्टीम अधून मधून बंद होऊन जाते.सोबतच शिवशाही बसेस चे अधून मधून अपघात सुद्धा होण्याचे प्रमाण वाढले आहे.
  • राज्य परिवहन महामंडळाच्या विविध विभागीय नियंत्रण कार्यालयांच्या मार्फत सुद्धा त्यांच्या डेपोमध्ये संचालित होणाऱ्या शिवशाही बसेस चे  देखभाल आणि याच्या यंत्रणेवर दुर्लक्ष करण्यात येत असल्याचे चित्र आहे.
  • या शिवशाही बसेस आहे त्या स्थितीमध्ये प्रवाशांकडून जास्त दर आकारून सेवेमध्ये वापरण्यात येत आहे,मात्र शिवशाही बसेस मध्ये प्रवास करणाऱ्या सर्वसामान्य प्रवासांना याबसेस मध्ये वेळोवेळी एअर कंडिशनिंग सिस्टम बंद पडणे,पैसे अदा करुनही सीट न मिळणे.
  • शिवशाही बस वाहक आणि चालकाकडून कोठेही बस थांबवून मनमानी पद्धतीने प्रवाश्यांकडून पैसे घेत चढवून घेणे.बुकिंग करुनही जागा न मिळाल्यास वाहकाकडून असहकार्य.

रस्त्यात कधीही शिवशाही बसेस मध्ये बिघाड येऊन प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत असल्याचे चित्र आहे. दुसरीकडे एमएसआरटीसी प्रशासन अख्या महाराष्ट्रात शिवशाही बसेसच्या योग्य देखभाल आणि त्यांच्यात सुधारणा करण्यात उत्साहित नसल्याचे दिसत आहे.

एकंदरस यामुळे सध्या शिवशाही बसेस खाजगी ट्रॅव्हल्स कंपन्यांच्या बसेसच्या तुलनेत सुविधांच्या बाबतीत खूप माघारले असल्याचे सर्वसामान्य नागरिकांमध्ये चर्चा आहे.

शिवशाही बसेस मध्ये आलेले कटू अनुभव सोशल  मीडियाच्या माध्यमातून  चव्हाट्यावर. 

शिवशाही बसेस मध्ये कर्तव्यावर असलेले कंडक्टर ड्रायव्हरचे प्रवाशांसोबत गैरवर्तन सुद्धा नेहमी चर्चेत असते,अनेक कारणांमुळे शिवशाही बस आता प्रवाशांच्या मनातून खाली उतरत आहे.

उल्लेखनीय म्हणजे अनेक मराठी चित्रपट अभिनेत्यांनी सुद्धा शिवशाही बस मधून प्रवास करताना त्यांना आलेल्या कटू अनुभव सोशल  मीडियाच्या माध्यमातून चव्हाट्यावर आणले आहे.

त्यामुळे शिवशाही बसेसची व्यवस्था आता सार्वजनिक चर्चेचा विषय ठरली आहे.एकेकाळी राज्यात एमएसआरटीसीच्या बस सेवेला अडचण ठरणाऱ्या खाजगी बस सेवांना लगाम लावण्यासाठी या शिवशाही आलिशान बसेस ताफ्यात दाखल करण्यात आले होते.{Private Travelers Companies}.

मात्र एमएसआरटीसीच्या चुकीच्या धोरणामुळे{MSRTC Policy About Shivshahi Bus Service}आता महाराष्ट्राच्या रस्त्यांवर शिवशाही ह्या आलिशान बसेस इतिहास जमा होतात की काय?असे चित्र निर्माण झालेले आहे.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now
Sharing Is Caring:

Leave a Comment

sixteen + sixteen =

Whatsapp ने लॉंच किया नया फीचर , Whatsapp Channels. 5 पड़ावों से होकर गुजरता है रिश्ता. देश के सबसे महंगे वकील Harish Salve ने 68 वर्ष की उम्र में की तीसरी शादी. रूस ने मार गिराए यूक्रेन के  3  ड्रोन. रूस का लूना – 25 चांद पर क्रैश.