Shiv Jayanti: बाभूळगाव येथे झुंजार फाउंडेशन तर्फे छत्रपती महोत्सवाचे शानदार आयोजन.
*बाभूळगाव प्रतिनिधी:- मोहम्मद अदीब*
Shiv Jayanti: हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त झुंजार फाउंडेशनच्या वतीने छत्रपती महोत्सवाचे आयोजन दि. 19 फेबु्रवारी रोजी बाभूळगाव येथील साई मंगल कार्यालय येथे करण्यात आले आहे. दिवसभर चालणा-या या महोत्सवांमध्ये विविध स्पर्धा व कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे. झुंजार फाउंडेशनच्या वतीने दरवर्षी शिवजयंती निमित्त रक्तदान शिबीरासह विविध उपक्रम राबविले जातात.
यावर्षी दि. 19 फेब्रुवारी रोजी सकाळी 7.00 वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पुजन, त्यानंतर सकाळी 7.30 वाजता भव्य मॅराथाॅन स्पर्धा घेण्यात येईल. यात पुरूष व महीला असे दोन गट राहतील. त्यानंतर सकाळी 9 ते दुपारी 4 पर्यंत रक्तदान शिबिर घेण्यात येईल. सकाळी 10 वाजता शिवव्याख्याते निलेश सोनटक्के यांचे शिवचरित्रावर व्याख्यान- विषय – अष्टपैलु नेतृत्त्व छ.शिवाजी महाराज हा कार्यक्रम राहणार आहे. त्यानंतर मॅराथाॅॅन स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिक व शिल्ड वितरीत करण्यात येईल.
तालुक्यात प्रथमच बाॅडी बिल्डींग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून ही स्पर्धा सायंकाळी 6 वाजता घेण्यात येणार आहे. त्यानंतर लगेच या स्पर्धेच्या विजेत्यांना पारितोषिक वितरीत करण्यात येईल. तरी या छत्रपती महोत्सवात युवक, युवती, विद्यार्थी, शिवप्रेमी, नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होवुन उपस्थिती दर्शवावी असे आवाहन झुंजार फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे.