Shiv Jayanti “न भूतो, न भविष्यती” असा राजा म्हणजे शिवछत्रपती!

Shiv Jayanti “न भूतो, न भविष्यती” असा राजा म्हणजे शिवछत्रपती!

Shiv Jayanti: ज्याचे नाव घेतल्यावर अभिमानाने छाती फुलते आणि मरणाच्या दारात उभ्या असलेल्यांना बारा हत्तीचं बळ संचार ते अशा छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आज आनंदाने जगभर साजरी केली जाते.

शिवजयंतीचे महत्व.

शिवजयंती म्हणजे महाराष्ट्रातील एक अत्यंत महत्त्वाचा सण आहे. हा सण मराठा साम्राज्याचे संस्थापक, स्वराज्याचे महानायक छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मदिनानिमित्त उत्सवात आचरण केले जाते. महाराष्ट्रात उत्सवी वातावरण हेच सूचित करतो की महाराज हे एक महान योद्धा, राजकारणी आणि आर्थिक सुधारणारे नेते होते. शिवजयंतीचा उत्सव विविध रूपात साजरा केला जातो. ज्यात राजगड, रायगड, प्रतापगड व त्यांच्या स्मृतिचे किल्ले सजवले जातात.

शिवाजी महाराजांच्या नावाचा अर्थ तुम्हाला माहिती आहे का?

पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहराजवळ शिवनेरी या Itself किल्ल्यावर 19 फेब्रुवारी 1630 मध्ये शिवाजी महाराजांचा जन्म झाला. शिवाई या देवतेवरून शिवाजी महाराजांचे नाव शिवाजी असे ठेवण्यात आल्याचे सांगितले जाते.
‘शि’ म्हणजे शिव ( महादेव )
‘व’ म्हणजे वाघ
‘जी’ म्हणजे जीवन
जीवनभर वाघासारखे जगणारे म्हणजेच शिवाजी.

शिवरायांचे स्वराज्यस्थापन.

शिवरायांनी कान्होजी जेधे, बाजी पासलकर, तानाजी मालुसरे, सूर्याजी मालुसरे, येसाजी कंक, सूर्याजी काकडे, बापूजी मुदगल, नरसप्रभू गुप्ते, सोनोपंत डबीर या आपल्या बारा मावळातील सवंगडी यांच्या साथीने स्वराज्याची शपथ राजमाता जिजाऊसोबत वयाच्या 16 व्या वर्षी रायरेश्वराच्या मंदिरात 27 एप्रिल 1645 रोजी स्वराज्याची शपथ घेतली.

शिवरायांचे राजकारण.

शिवाजी महाराजांना सामान्य जनतेचा आणि त्यांच्या मावळ्यांचा पुन्हा पाठिंबा होता परंतु याशिवाय राजकारणात अजून एक गोष्ट लागते ते म्हणजे एक अनुभवी आणि मुरब्बी सहकाऱ्यांची आणि हे सहकारी शिवाजी महाराजांकडे होते. महत्त्वाचं म्हणजे राजमाता जिजाऊंचा त्यांना पूर्ण पाठिंबा होता. महाराज वेळ प्रसंग पाहून बदलते राजकीय निर्णय घेण्यात पटाईत होते. सह्याद्री डोंगरांची स्वराज्य स्थापनेत महाराजांना सर्वात जास्त मदत मिळाली होती. त्यांनी हाती आलेला शत्रू कधीही परत जाऊ दिला नाही. अफजल खानचा वध हे त्याचे प्रतीक आहे.

हिंदवी स्वराज्य चालवताना त्यांनी मध्य आशियाचे तंत्र समजून घेतले होते. एकदा वापरलेला गनिमी कावा त्यांनी पुढे वापरला नाही. नवे तंत्र सतत वापरत आले. स्वतःचे आरमार उभारले. तोफा गाळण्याचा कारखाना काढला. शत्रूची प्रत्येक चाल आणि त्याचे आरमार राजे ओळखून होते. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे राजांनी स्वामीनिष्ठेच्या पलीकडे जाऊन ध्येयनिष्ठता शिकवली. तानाजी पडल्यानंतर कोंढाणा जिंकायचा राहिला का? मुरारबाजी पडले तेव्हा पुरंदर राहिला का? शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांच्या महानिर्वाणानंतर मराठ्यांनी शस्त्रे खाली ठेवली का? अर्थातच नाही. हेच कारण आहे की शिवाजी महाराज सर्वांचे छत्रपती बनले. इतिहासातील त्यांची गाथा, योगदान नेहमीच अजरामर असणार.

सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिवशंभू राजा, दरीदरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा. विदर्भ टाइम्स परिवाराकडून शिवजयंतीच्या मनःपूर्वक शुभेच्छा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

17 − thirteen =