शासन निर्णय प्रमाणे कामगारांना सही शिक्का देण्यात यावा.
*बाभुळगाव ता. प्र.मोहम्मद अदिब*
जिल्हाधिकारी यांना कामगार संघटनेचे निवेदन.
ग्रामीण भागातील बांधकाम व इतर बांधकाम कामगारांना शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ मिळणेसाठी व त्यांची नोंदणी व नुतणीकरण करणेसाठी ग्राम पंचायतीकडून त्यांच्या 90 दिवसाच्या अर्जावर ग्रामसेवकांच्या सही व शिक्का मिळण्यात यावा या संदर्भाचे निवेदन दि.28डिसेंबर रोजी जनवादी बांधकाम कामगार मजदुर संघटनेच्या वतीने तहसीलदार मार्फत जिल्हाधिकरी यांना दिले आहे.
तालुक्यातील बांधकाम व इतर बांधकाम कामगारांची नोंदणी व नुतणीकरण करणेसाठी ग्रामीण भागात ग्रामसेवकांच्या सही व शिक्क्यांची आवश्यकता भासत असते. कामगारांनी 90 दिवस काम केल्याचे पत्र किंवा दस्तावेज ग्रामसेवकांना सादर केल्यानंतर त्यावर ग्रामसेवक सही व शिक्का देतात.महाराष्ट्र शासनाच्या शासन निर्णयाप्रमाणे जिल्हाधिकारी यांनी महारष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनचे जिल्हाध्यक्ष हिम्मत म्हातारमारे यांना 25 मे 2023 रोजीच्या आदेशाप्रमाने बांधकाम कामगार व इतर कामगारांचे काम सातत्य नसलेले/अस्थायी दैनदिन(casual) सवरुपाचे काम आहे.
त्यामुळे कामगारांना एकापेक्षा जास्त मालकाकडे काम करावे लागते. अश्या इमारत व इतर बांधकाम कामगाराला संबधित ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक यांनी 90 दिवसाचे प्रमाणपत्र निर्गमित करावे असे नमूद केले आहे.परंतु काही ग्रामसेवक हे संबंधीत कामगारांना सही व शिक्का देण्यासाठी संबंधीत ठेकेदार, कंत्राटदार किंवा ज्यांचेकडे ते काम करतात त्या व्यक्तींचे लायसेंन्स किंवा इतर प्रकारच्या कागदपत्रांची अवास्तव मागणी करून त्यांना सही व शिक्का देण्यास टाळाटाळ करीत आहेत.
परंतु ग्रामीण भागातील असंधीत कामगार हे काही वर्षभर एकाच ठिकाणी काम करीत नाहीत ते वेगवेगळ्या कंत्राटदार ठेकेदार किंवा घरमालक इतरही प्रकारच्या व्यावसायिकांकडे काम करतात अश्यावेळी त्यांचेकडे संबंधितांचे लायसेंस किंवा इतर कागदपत्र उपलब्ध राहत नाही त्यावेळी ग्रामसेवक हे प्रमाणित करण्यासाठी टाळाटाळ करतात कामगारांना 90 दिवस काम केल्याचा प्रमाणपत्रावर सही शिक्का देण्याकरिता आवश्यक कार्यवाही करण्यात यावे असे निवेदनात म्हटले आहे.
निवेदन देते वेळि जनवादी बांधकाम कामगार मजदूर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रत्नपाल डोफे संजय शेळके सहसचिव सुजाता रत्नपाल डोफे कोषाध्यक्ष जनवादी बांधकाम कामगार मजदूर संघटना यवतमाळ शैलेश भगत,राम देवघरे,संघपाल डोफे,प्रविण काळे,चेतन कानोरकर, सुरेश ठाकरे, संजय शिवरकर नंदा राउत वैशाली ठाकरे वैशाली चकटे अर्चना ठाकरे सीमा चिकटे मनीषा फुगे सविता काके अर्चना चोरे शीला ठाकरे विद्या ठाकरे सोनु पारीसे शोभा हरने शारदा शिवरकर आदि कामगार मंडळी उपस्थित होते.