“शासन आपल्या दारी” मुख्यमंत्र्याच्या कार्यक्रम स्थळी आमरण उपोषण :भाई जगदीश कुमार इंगळे

“शासन आपल्या दारी” मुख्यमंत्र्याच्या कार्यक्रम स्थळी आमरण उपोषण :भाई जगदीश कुमार इंगळे

नेर: आज दिनांक १४ ऑक्टोबर २०२३ रोजी विश्रामगृह नेर येथे बैठकीचे आयोजन बिगर सातबारा शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आले होते.डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतामध्ये परिवर्तन घडवून आणले आणि हाच तो दिवस म्हणून आज अनेक ठिकाणी गाव कुसाबाहेर राहणाऱ्या समाजाकरिता शासनाने दखल घेऊन त्यांची व्यवस्था करावी. त्यांना इशारा म्हणून याकरिता अनेक गावोगावी बैठकीचे आयोजन सुरू असून या निमित्त आज दिनांक १४ ऑक्टोबर २०२३ ला नेर येथे संघटनेचे प्रणेते तथा दलित पॅंथरचे केंद्रीय कार्याध्यक्ष भाई जगदीश कुमार इंगळे यांची सर्वांसाठी शेती २०२४ धोरणावर मार्गदर्शन या विषयावर बैठकीच्या आयोजन करण्यात आले.

सदर बैठक दिनांक २५ ऑक्टोंबर २०२३ रोजी किन्ही गावात “शासन आपल्या दारी” या कार्यक्रमाच्या समोर होणाऱ्या अमर उपोषणाच्या सहभागी होण्याचे आवाहन बिगर सातबारा शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आले.शासन आपल्या दारी या कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे दिनांक २७ ऑक्टोबर रोजी यवतमाळ येथे येणार आहेत तर त्यांनी या कार्यक्रमातून “सर्वांसाठी शेती २०२४” हे धोरण घोषित करून शेतीची अतिक्रमणे नियमाकुल करण्याकरिता घोषणा करावी या प्रमुख मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी बिगर सातबारा शेतकरी संघटनेच्या वतीने दलित पॅंथरचे केंद्रीय कार्याध्यक्ष भाई जगदीश कुमार इंगळे हे दिनांक २५ ऑक्टोबर पासून कीन्ही गावात आमरण उपोषण करणार आहेत.

या बाबत संपूर्ण जिल्ह्यात भेटीगाठी व प्रचार प्रसार सुरू आहे. याबाबत नुकतीच नेर येथे महत्त्वपूर्ण बैठक बिगर सातबारा शेतकरी संघटनेचे युवा प्रदेशाध्यक्ष प्रफुल इंगोले यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली असून बैठकीमध्ये सर्वांसाठी शेती २०२४ या धोरणाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली प्रामुख्याने मुकूंदपुर पारधी बेडा, अजंती पारधी बेडा येथील फासेपारधी समाजाच्या लोकांनी निवासी प्रयोजनासाठी तर काहींनी शेतीच्या प्रयोजनासाठी अतिक्रमण केलेल्या आहे त्यांच्याकडे स्थानिक महसूल यंत्रणा अक्षम प्रमाणात दुर्लक्ष करीत आहे.

त्यामुळे संघटनेच्या वतीने पाठपुरावा करण्याचा ठराव घेण्यात आला असून दिनांक २५ ऑक्टोंबर २०२३ रोजी किन्ही गावात होऊ घातलेल्या आमरण उपोषणात जास्तीत जास्त संख्येने सहभागी होण्याचे आव्हान युवा प्रदेशाध्यक्ष प्रफुल कुमार इंगोले यांनी केले असून या बैठकीला सविता पवार, जयसिंग पवार, नानुबाई पवार, रेसुल पवार, साहेब्या यासह अनेक नागरिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

4 − 4 =