Shasan Aaplya Dari: पालकमंत्री संजय राठोड यांनी प्रास्ताविकात राज्य शासनातर्फे राबविण्यात येत असलेल्या विविध योजना थेट लाभार्थ्यापर्यंत पोहोचत असल्याचे सांगत यवतमाळचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याची विनंती केली. जिल्हा आदिवासी बहुल असल्याने या विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे म्हणून मॉडेल स्कूलची निर्मिती व्हावी, शिक्षकांची रिक्त पदे मानधन तत्त्वावर तात्पुरत्या स्वरूपात तातडीने भरावी.
शेतकयांचे वन्यप्राण्यांपासून नुकसान टाळण्यासाठी झटका मशीन द्याव्यात सिंचन प्रकल्पासाठी ठोस निधी द्यावा, वीजपुरवठ्यासह आरोग्य यंत्रणा सक्षम करण्याबाबत निर्णय घ्यावा तसेच आदिवासी समाज बांधवांची संस्कृती व इतिहास जोपासण्यासाठी बिरसा मुंडा वास्तुसंग्रहालय उभारावे आणि यवतमाळला समृद्धी महामार्गाची कनेक्टिव्ही देण्याची मागणी राठोड यांनी केली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या सर्वच मागण्यांबाबत आपण सकारात्मक असल्याचे सांगितले. नागरिकांच्या आरोग्य संवर्धनासाठी महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेत देय उपचार निधी दीड लाखांहून पाच लाखापर्यंत वाढविल्याचे सांगत यवतमाळ समृद्धी महामार्गाशी जोडण्याबाबत एमएसआरडीसीला निर्देश देत असल्याचे जाहीर केले. २१ हजार शेतकन्यांना झटका मशीन तसेच ७५ मॉडेल स्कूलच्या प्रस्तावालाही त्यांनी मान्यता दिली.
वास्तुसंग्रहालयाबाबत सकारात्मक निर्णय घेऊ अशी स्वाही देत आरोग्य यंत्रणा बळकट करण्यासाठीचे योग्य ते निर्णय घेण्यात येतीर असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. दरम्यान, राठोड यांच्या भाषणापूर्वी खासदार भावना गवळी यांचे भाषण झाले. मागील नऊ वर्षांत केंद्र शासनाने राबविलेल्या विविध योजनांचा उल्लेख त्यांनी केला. सर्व घटकातील वंचित महिलांना पुढे आणण्यासाठी आरक्षणाचा महत्वाचा निर्णय घेतल्याचे स्थांनी सांगितले.