Sharad Pawar : शरद पवार गट १०० जागांवर लढण्यात ठाम,महाविकास आघाडी मध्ये फुट ?

Sharad Pawar : एनसीपी शरद पवार पक्ष 100 जागांवर लढणार?

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार नेते शरद पवार यांनी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत जागांबाबत मोठा विधान केलेला आहे.शरद पवार गट येणाऱ्या विधानसभा निवडणूकीत तब्बल 100 लढणार असल्याची माहिती समोर आली आहे. यापूर्वी शरद पवार यांनी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या पक्षासाठी जागांचा आणि ज्या पक्षाचे अधिक आमदार त्याचा मुख्यमंत्री हा फार्मूला ठरविला होता.तेव्हा त्यांनी एनसीपी शरद पवार गट 80 जागा वर लढणार असल्याची घोषणा केली होती.आता यात पुन्हा 19 ते 20 जागा वाढवून घेण्याची तयारी एनसीपी शरद पवार गटाकडून सुरू करण्यात आली आहे.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now

288 जागांपैकी कोण कमी जागा घेणार.

विधानसभेच्या निवडणुका दोन महिन्यांनंतर होणार आहेत. या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षामध्ये जागावाटपाची चर्चा आणि राजकीय घडामोडींना वेग आला आहे. महविकास आघाडीत जागांवर चर्चा होत असताना एकदा पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडून ९० ते १०० जागांवर लढण्याची तयारी सुरु असल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली आहे.त्यामुळे 288 पैकी महाविकास आघाडीचा कोणता पक्ष कमी जागांबाबत समझोता करेल यावर पुढील दिवसात आघाडीतील नेते चर्चा करू शकतात.सूत्रांच्या माहितीनुसार शरद पवार गट ९० ते १०० जागा मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे.यासाठी पक्षस्तरावर तयारी सुरु करण्यात आली आहे.

झूम मीटिंगमध्ये निरीक्षकांना महत्वाच्या सूचना.

या दोन दिवसांत शरद पवार गटाच्या वरिष्ठ नेत्यांकडून नेमलेल्या निरीक्षकांना झूम मीटिंगद्वारे यासंदर्भातील सूचना देण्यात आल्या आहेत.तसेच अनेक जिल्ह्यात पक्ष स्तरावर बैठकांचा सत्र झाला.यात आगामी निवडणुकांसाठी संभावित मतदारसंघ निहाय तयारी करण्याचे,पक्षाचा अहवाल लवकर गोळा करा आणि बूथ कमिट्या तयार करा अशा सूचना वरिष्ठ नेत्यांनी आपल्या निरीक्षकांना दिल्या आहेत.राष्ट्रवादी शरद पवार गटाने नेमलेल्या निरीक्षकांची झूम मीटिंगमध्ये यासंदर्भात सूचना देण्यात आल्या आहेत. लवकरच पक्षाला याबाबत अहवाल दिला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

महविकास आघाडीत जागा वाटपाची चर्चा सुरू.

दरम्यान विधानसभेच्या निवडणुका नोव्हेंबरमध्ये लागतील अशी शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपाची चर्चा सुरु झाली आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसने सर्वाधिक जागा जिंकल्या होत्या. त्यामुळे काँग्रेस जास्त जागा मागत असल्याची माहिती आहे. तर आघाडीत महत्वाचा पक्ष ऊबाठा गट देखील अधिक जागा पदरात पाडून घेण्यासाठी आग्रही आहे.

एनसीपी शरद पवार गट काही जागा सोडणार का.

शरद पवार गटाने १०० जागांवर चाचपणी सुरु केली असल्याचं समजत आहे.यात काही जागा कमी होऊ शकतात. पण, प्राथमिक चर्चा म्हणून १०० जागांसाठी हालचाली सुरु झाल्या आहेत. यासंदर्भात संबंधितांना सूचना देखील देण्यात आल्या आहेत. शरद पवार गट प्रत्यक्षात किती जागा पदरात पाडून घेण्यात यशस्वी ठरतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दरम्यान, महायुतीमध्ये जागावाटपाच्या चर्चेदरम्यान नेत्यांचा कस लागत असल्याची माहिती आहे.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now
Sharing Is Caring:

Leave a Comment

1 × 3 =

Whatsapp ने लॉंच किया नया फीचर , Whatsapp Channels. 5 पड़ावों से होकर गुजरता है रिश्ता. देश के सबसे महंगे वकील Harish Salve ने 68 वर्ष की उम्र में की तीसरी शादी. रूस ने मार गिराए यूक्रेन के  3  ड्रोन. रूस का लूना – 25 चांद पर क्रैश.