Sharad Pawar and Chaggan Bhujbal Meeting : बारामती तून फोन गेला अन् मराठा आरक्षण वर सर्वपक्षीय बैठकीवर विरोधी पक्षाचा बहिष्कार.
Sharad Pawar and Chaggan Bhujbal Meeting : बारामती तून फोन गेला अन् मराठा आरक्षण वर सर्वपक्षीय बैठकीवर विरोधी पक्षाचा बहिष्कार
का घेतली मग शरद पवारांची भुजबळांनी अचानक भेट
14 जुलै रोजी बारामती मधून मराठा आरक्षणावर आयोजित जाहीर सभेत राज्य सरकारने मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकी वर बारामतीतून फोन गेल्याने विरोधी पक्षाने बहिष्कार तर टाकला नाही असे विधान ओबीसी नेते व मंत्री छगन भुजबळ यांनी केले व मराठा आरक्षणवर महाविकास आघाडीच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्याचा प्रयत्न भुजबळांनी करताच राजकीय खळबळ माजली.मात्र भुजबळ यांनी राज्याचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा नाव न घेता या संदर्भात मराठा आरक्षण मुद्द्यावर दिलेल्या भाषणानंतर आज 15 जुलै रोजी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते व मंत्री छगन भुजबळ व शरद पवार यांच्यात झालेल्या भेटीने राजकीय स्तरावर विविध संकेत काढायला सुरुवात झाली होती. राज्यात महायुती सरकार असून मराठा आरक्षणाचा मुद्दा सरकार दरबारी व कोर्टात आहे, पण सरकारची मंत्री छगन भुजबळ यांना महायुती सरकार वर भरोसा आहे किंवा नाही? किंवा ते महाविकास आघाडीकडे हा चेंडू वळवून राष्ट्रवादी शरद पवार गटाकडे स्वतः ही वळणार का?असे प्रश्नही समोर येत आहे.एकंदरच दोघांच्या भेटीमुळे राजकीय चर्चा सुरू झाल्या आहे.
काय बोलले होते भुजबळ?
महत्वाचे म्हणजे काल भुजबळ यांनी बारामतीच्या सभेत बोलताना मराठा आरक्षणावर राज्य सरकार कडून सह्याद्री वर बोलाविण्यात आलेल्या सर्वपक्षीय बैठकीवर विरोधी पक्षाच्या बहिष्कारवरून थेट शरद पवार यांच्यावर टीका केली होती. उपमुख्यमंत्री अजित पवार व अनेक नेते व सभेत हजर असलेल्या मराठा समुदाय समक्ष भुजबळ म्हणाले होते,मराठा आरक्षणाचा वाद मिटवावा यासाठी सरकारने सह्याद्रीवर सर्वपक्षीय बैठक बोलावली होती यात सर्व पक्षाचे नेते येऊन त्यांनी मार्गदर्शन करावा मराठा आरक्षण चा प्रकरण शांत होऊन सर्वांना न्याय मिळेल असा हा प्रयत्न होता सर्वांनी या बैठकीत येणे क्रम प्राप्त होते, या संदर्भात मी जितेंद्र आव्हाड यांना या संदर्भातील कायद्याची प्रती दिल्या व राज्याचे ज्येष्ठ नेते म्हणून या बैठकीत शरद पवार साहेब यायला हवे अशी अपेक्षा केली होती, संध्याकाळी पाच वाजता बारामतीतून कुणाचा विरोधी पक्ष नेत्यांना फोन केला आणि त्यांनी सरकारच्या या बैठकीवर बहिष्कार टाकले.विशेष म्हणजे या सभेत
भुजबळ भाषणाला उभे राहीले तेव्हा एकच गोंधळ उडताना दिसला. एक मराठा लाख मराठा अशी जोरदार घोषणाबाजीही यावेळी करण्यात आली होती.
शरद पवारांची वेळ घेतली नाही म्हणून भुजबळ वेटींग वर…
दरम्यान बारामती मध्ये छगन भुजबळ यांनी शरद पवार यांच्यावर केलेल्या टिप्पणीनंतर आज लगेच भुजबळ यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांचे निवासस्थान गाठले पण त्यांनी भेटण्यासाठी वेळ घेतली नसल्याने त्यांना तब्बल एक तास शरद पवार यांची भेट घेण्यासाठी वेटिंग वर राहावे लागले,त्यामुळे भुजबळ यांच्या भाषणानंतर त्यांच्यावर शरद पवार नाराज तर नाही ना असे अर्थ काढण्यात येत होते,मात्र यानंतर दोघांची भेट झाली व भुजबळ यांनी माध्यमांना या भेटीचे कारणही सांगितले.
आता मराठा आरक्षणावर शरद पवार पुढाकार घेणार का?
या भेटीनंतर छगन भुजबळ यांनी माध्यमांसोबत झालेल्या चर्चेत दरम्यान भेटीचा कारण स्पष्ट केला.राज्यात मराठा-ओबीसी आरक्षणावरुन तंग झालेला वातावरण शांत व्हायला हवं ही माझी भूमिका आहे. मी या मुद्द्यावर कुणालाही भेटायला तयार आहे. यात काहीही राजकारण नाही.शरद पवार साहेबांसोबत मी तब्बल दीड तास चर्चा केली,राज्यात मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर पेटलेला राजकारण थांबून राज्यात शांतता टिकून राहावी,यासाठी आता शरद पवारांनी पुढाकार घेत थेट भूमिका घेतली पाहिजे.यासाठी मी आज त्यांची भेट घेतली असे छगन भुजबळ यांनी स्पष्ट केलं. चर्चेची माहिती देताना भुजबळ यांनी म्हटले की,शरद पवार यांनी आम्हाला माहिती दिली की मनोज जरांगे यांची मुख्यमंत्र्यांसोबत काय चर्चा झाली याची आम्हाला अजूनही माहिती नाही,सोबतच जरांगे यांना राज्याचे जे मंत्री भेटले त्यांनी जरांगे यांना आरक्षणासंदर्भात काय सांगितलं हे देखील आपणास माहित नाही, पण तुम्ही (भुजबळ स्वतः सरकार मध्ये असल्याने) याबाबत त्यांना विचारणा करायला हवी,असा सल्ला शरद पवार यांनी आम्हाला दिला,तर दुसरीकडे राज्यातील जिल्ह्यात गावांमध्ये मराठा आरक्षणावर एकूण काय परिस्थिती आहे याचा अंदाज शरद पवारांना आहे. त्यामुळे तुम्ही आता या मुद्यावर पुढाकार घ्या असं आवाहन मी शरद पवार यांना केलं, अशी माहिती छगन भुजबळ यांनी माध्यमांसोबत बोलताना दिली.
छगन भुजबळ यांची ओबीसी आरक्षण मुद्द्यावर थेट भूमिका.
राज्यात ओबीसी आरक्षणाला धक्का लागू देणार नाही अशी थेट भूमिका घेणारे नेते म्हणून छगन भुजबळ ओळखले जातात.ओबीसी मधून मराठा समाजाला आरक्षण नको,त्या ऐवजी मराठा समाजाला वेगळे आरक्षण द्यायला हवे अशी भूमिका त्यांनी अनेकदा मांडली आहे. या भूमिकेमुळेच त्यांची मराठा समाजामध्ये प्रतिमा वेगळी आहे. विशेष म्हणजे मराठा आंदोलनात अग्रणी नेते मनोज जरांगे पाटीलही भुजबळ यांच्यावर कडवी टिका करताना दिसतात.मराठा समाजाच्या आरक्षणाच्या आड जर कोणी असेल तर ते भुजबळच आहे, अशी भूमीकाही जरांगे पाटील यांनी मांडली आहे. त्यामुळे मला मराठा समाजात भुजबळ यांचा टोकाचा विरोध पाहायला मिळतो.