सर्पमित्रांनी दिले अजगरास जिवनदान.
बाभूळगाव ता. प्र मोहम्मद अदीब: बाभुळगाव तालुक्यात डेहनी येथे प्रभाकर श्रावण नगराळे यांच्या शेतात ७ ते ८ फुट लांबी व २५ किलो वजनाचा अजगर आढळला. लगेच शेतकरी प्रभाकर श्रावण नगराळे यांनी सर्पमित्र सुमित धारने,गोलू अलोने,सुमित इंगोले,अक्षय शेळके यांना फोन करून बोलवून घेतले. व सर्पमित्र घटनास्थळी पोहचले व अजगराला पकडू जीवनदान देऊन निसर्गात मुक्त केले.
सर्प मित्रांनी डेहनी गवातील गावकऱ्यांना सापांबद्दल मार्गदर्शन केले. अजगर हा बिनविषारी साप असून अजगर या सापास वन्यजीव अधिनियम 1972 च्या अंतर्गत परिशिष्ट एक मध्ये समाबिष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे याची केले.हत्या किंवा छळ केल्यास 3 ते 7 वर्षाची कैद आणि 10 ते 25 हजार रुपयांचा दंड दोन्हीही होऊ शकतो अशी माहिती दिली. आणि कुठेही साप आढळल्यास किंवा कोणताही वन्यजीव प्राणी धोक्यात अथवा जखमी आढळल्यास जवळच्या सर्पमित्रास संपर्क साधावा अशी असे आवाहन केले.