Sarfaraz Khan Team India: टीम इंडियात भेटली जागा, सरफराजने केला राडा!

Sarfaraz Khan Team India: टीम इंडियात भेटली जागा, सरफराजने केला राडा!

भारत विरुद्ध इंग्लंडच्या राजकोट कसोटीत पहिल्याच दिवशीच्या सामन्यात 62 धावांची शानदार खेळी खेळून क्रिकेट क्षेत्रात आपले पाय मजबूत करणारा चमकता तारा सरफराज खानला टीम इंडियाची कसोटी कॅप क्रिकेटर अनिल कुंबळे कडून मिळाली.

कोण आहे हा Sarfaraz Khan?

सरफराज खानचा जन्म 27 ऑक्टोबर 1997 मुंबई येथे झाला. त्याचे वडील क्रिकेटर नौशाद खान हे देखील रणजी ट्रॉफी पर्यंत खेळले आहे. त्याची आई तबसूम खान एक गृहिणी आहे. रोमाना जहूर असे सर्फराजच्या पत्नीचे नाव आहे. मुशीर खान आणि मोईन खान हे दोन भावंड आहेत. सर्फराज चे दोन्ही भाऊ क्रिकेट खेळण्यात पटाईत आहे आणि विशेष म्हणजे मुशीर ने मुंबईच्या अंडर – 16 टीमच्या कॅप्टन चे प्रतिनिधित्व केले आहे.

सर्फराज चे शिक्षण?

सरफराज ने आपले प्राथमिक शिक्षण मुंबईच्या रिझवी स्प्रिंगफिल्ड या शाळेतून पूर्ण केले आहे. क्रिकेट खेळीमुळे तो चार वर्ष शाळेत जाऊ शकला नसल्याकारणाने त्याने प्रायव्हेट कोचिंग मधून इंग्रजी आणि गणिताचे शिक्षण घेतले आहे.

तर त्याला क्रिकेट खेळण्याची प्रेरणा कशी मिळाली?

सरफराज च्या बालपणापासूनच क्रिकेट त्याच्या अंगाशी होते. त्याचे बाबा एक क्रिकेटर होते. परंतु त्यांना भारतासाठी कधीही खेळता आले नाही. याच कारणामुळे त्याचे स्वप्न होते की तो भारतीय टीम मध्ये एक दिवस नक्कीच सामील होऊन बाबाचं स्वप्न पूर्ण कारणार. “बाळाचे पाय पाळण्यात दिसतात” सरफराजचही असंच काहीसा होतं, त्याच्या बाबाला कळून चुकले की हा एक दिवस नक्कीच चांगली कामगिरी करणार आणि म्हणूनच नौशाद खान यांनी त्याला ट्रेनिंग देणे सुरू केले.

सरफराज हायलाईट मध्ये केव्हा आला?

जेव्हा त्याने वयाच्या 12 व्या वर्षी 2009 च्या हॅरीस शील्ड मॅच मध्ये 421 बॉलवर 439 धावा बनवून सचिन तेंडुलकरचा 45 वर्ष जुना रेकॉर्ड तोडला. यानंतर त्याने लवकरच मुंबई अंडर-19 साठी खेळी खेळणी सुरू केली होती आणि त्याच्या उत्कृष्ट प्रदर्शनामुळे भारतीय अंडर – 19 साठी निवड करण्यात आले होते. आपल्या प्रभावी कामगिरीच्या जोरावर 2014 मध्ये अंडर -19 विश्वचषक संघात त्यांनी स्थान मिळवले.

या स्तरावर त्याच्याकडे विश्वचषकात सर्वाधिक अर्धशतकांचा विक्रम आहे. 2014 अंडर- 19 विश्वचषकातील चांगल्या कामगिरीनंतर सरफराज खानला 2015 च्या आयपीएल लिलावात आरसीबीने 50 लाख रुपयांना विकत घेतले. वयाच्या 17 व्या वर्षी तो IPL मध्ये खेळणारा सर्वात तरुण खेळाडू ठरला.

आयपीएल करिअर –

22 एप्रिल 2015 मध्ये सरफराज ने CSK विरुद्ध आयपीएल मध्ये पदार्पण केले. त्यानंतर राजस्थान रॉयल्स विरुद्ध 21 चेंडूत 45 धावांची नाबाद खेळी खेळून प्रसिद्धी मिळवली.
मॅच खेळून तो ड्रेसिंग रूम मध्ये परत येत असताना विराट कोहलीने त्याला अभिवादन केले, तो एक अविस्मरणीय क्षण होता. 2015 च्या आयपीएल हंगामात 156.33 स्ट्राईक रेट ने 111 धावा करून तेरा सामने खेळले. 2016 च्या हंगामात 212.90 स्ट्राईक रेट ने 66 धावा काढत 5 सामने खेळले.

2017- 18 च्या हंगामात सरफराजला बरोबर खेळता आले नाही. 2019 च्या आयपीएल मध्ये आठ सामन्यांमध्ये 45 च्या सरासरीने 180 धावा केल्या. 2020 च्या हंगामात पाच सामने खेळले आणि 16.50 च्या सरासरीने 33 धावा केल्या. आयपीएल 2022 मध्ये दिल्लीसाठी सहा सामने सरकारने खेळले. 2023 च्या हंगामात ऋषभ पंत च्या अनुपस्थितीत यष्टीरक्षक फलंदाज म्हणून देखील त्यांनी काम केले.

सरफराज ला कशी भेटली टीम इंडिया मध्ये एन्ट्री?

असे म्हटले जाते की, बीसीसीआय आणि निवडकर्ते सरफराजलाआक्रमक वृत्तीमुळे आणि आपत्तीजनक इशाऱ्यांमुळे पसंती दर्शवत नव्हते. मग त्याला टीम इंडियाचा हिरवा कंदील कसा भेटला? तर त्याच्या उत्कृष्ट खेळीमुळेच. त्याने मागच्या चार सामन्यांमध्ये 161, 04, 55, 96 धावा करून शानदार प्रदर्शन दाखवले आणि हेच त्याचा निवडीचे मुख्य कारण ठरले. सरफाराजच्या प्रशंसकांना त्याचा क्रिकेट करियर बद्दल आशीर्वाद आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

seventeen − 5 =