*हिंगोली जिल्हा प्रतिनिधी : काशिनाथ नाटकर*
Sant Gadge Baba Jayanti: हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुका येथे दिनांक 23 /2 /2024 रोजी भारतीय बौद्ध महासभा वसमत यांच्या वतीने शहरातील हर्ष नगर बौद्ध विहार येथील संत राष्ट्र गाडगेबाबा यांच्या जयंतीनिमित्त बौद्ध विहार परिसर स्वच्छ करून अभियान राबवण्यात आला व राष्ट्रसंत गाडगेबाबा यांची जयंती साजरी करण्यात आली.
त्याप्रसंगी महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर व राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले व माजी वकील संघाचे अध्यक्ष एडवोकेट रणधीर तेलगोटे यांनी गाडगेबाबा यांच्या वेशभूषा परिधान करून बौद्धविवाहाचे मैदान स्वच्छ केले या कार्यक्रमाला दौलतराव गजभारे मेजर भगवान सूर्य तळ खंडोजी पंडित रावण नंद साहेबराव सरोदे यादव चौरे यांनी स्वच्छता अभियानामध्ये सहभाग घेतला होता या कार्यक्रमाला प्रतिष्ठित नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.