मराठा समाजाचा कुणबी नोंदीचा आकडा मुख्यमंत्री खोटा सांगत आहेत – Sanjay Lakhe Patil

मराठा समाजाचा कुणबी नोंदीचा आकडा मुख्यमंत्री खोटा सांगत आहेत – Sanjay Lakhe Patil

राज्यात पुन्हा एकदा मराठा आरक्षणावरून राजकारण तापलेले पाहायला मिळत आहे. त्याच पार्श्वभूमीवर आज जालना येथे मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक Sanjay Lakhe Patil यांनी पत्रकार परिषद घेत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार निशाणा साधत हल्लाबोल केला आहे.  यावेळी बोलताना संजय लाखे पाटील म्हणाले की राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मराठ्यांचा कुणबी आकडा हा खोटा दाखवत आहेत.

कारण सामान्य प्रशासन विभागाचे मुख्य सचिव यांनी स्पष्ट सांगितलेले आहे की न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या कमिटी नंतर राज्यामध्ये 1लाख 47 हजार नोंदी मिळालेल्या आहेत, त्यातील बत्तीस हजार नोंदी या मराठवाड्यातील आहेत त्यातल्या 18 हजार सहाशे ला प्रमाणपत्र मिळालेले आहेत आणि आणखीन एकही नाही ती वस्तुस्थिती असताना राज्य सरकारचे मंत्री या ठिकाणी सांगतात की 54 लाख नोंदी आहेत.

ती सत्यता करावी या तीन मागणीसाठी आम्ही येत्या 17 तारखेपासून ज्या दिवशी मुदत संपते उपोषण करणार आहोत आणि तसा आमचा निर्णय झालेला आहे. यासारखे बरेच विषयावर खुलासा आज पत्रकार परिषद घेत मराठा क्रांती मोर्चा चे राज्य समन्वयक संजय लाखे पाटील यांनी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे, यावरून पुन्हा हेच दिसून येत आहे की राज्यामध्ये पुन्हा मराठा आरक्षणाचा प्रश्न गंभीर होत चालले असल्याचे दिसून येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

3 + four =