भारतीय संस्कृती ही सर्वांना घेऊन चालणारी – Sanjay Khode
*बाभुळगाव ता. प्र.मोहम्मद अदिब*
आपल्या देशात लोकशाही आहे. आपली संस्कृती ही सर्वांना घेऊन चालणारी असून जन्म देणारी जरी आईवडील असले पण भारत माता ही पोसनारी आई आहे. त्यामुळे भारत माताचा नेहमी आदर्श ठेवावा असे मत Sanjay Khode यांनी व्यक्त केले. प्रजसत्ता दिनानिमित्त बाभूळगाव येथील यवतमाळ अर्बन बँक बाभूळगाव येथे दरवर्षी प्रमाणे भारतमाता पूजनाचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून संघाचे स्वंयमसेवक संजय खोडे हे बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बँकेचे शाखा व्यवस्थापक प्रेमराज भोयर हे होते.तर प्रमुख पाहुणे म्हणून संघाचे स्वंयमसेवक संजय खोडे हे उपस्थित होते. यावेळी भारतमातेच्या फोटोचे उपस्थितांनी पूजन केले. 26 जानेवारी 1950 रोजी सकाळी 10.18 वाजता संविधान लागू करण्यात आले. अर्थात काँग्रेसच्या लाहोर अधिवेशनात पूर्ण स्वातंत्र्याची घोषना 1930 मध्येच करण्यात आली होती. संविधान लागू झाले त्यात 395 अनुच्छेद 8अनुसूची 22भाग होती ही संख्या वाढवून 465 अनुच्छेद 12अनुसूची 25 भाग ऐवढी करण्यात आली आहे.
प्रजसत्ता दिनाचे संचलनाचे आयोजन दिल्लीच्या राज्यपथावर सर्वप्रथम 1955 मध्ये करण्यात आले.अशी संविधानबातची माहिती तसेच तिरंगी ध्वजात असणाऱ्या तिन रंगाचे काय महत्व आहे आहे अशी अनेक माहिती शाखा व्यवस्थापक प्रेमराज भोयर यांनी आपल्या भाषणातून दिली. या कार्यक्रमास शिवसेना शहर प्रमुख प्रवीण लांजेकर, शाम गुप्ता, धर्मु छल्लाणी , संजय भा.खोडे, गंगाधर वानोडे, योगेश वानोडे, आरिफ छवारे, पांढुरंग मोने, गौरी इंगळे ,गोपाल शर्मा, हेमंत बोरकर, सचिन लांजेकर,प्रवीण शिरभाते, श्रीधर बुधे, चंदू बोरकर, मनोहर वांढरे, अविनाश वाघ, गणेश महाजन, गजानन नगोसे, तसेच बँकेचे कर्मचारी उपस्थित होते.