राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवकांशी Sangram Kote Patil यांनी साधला मुक्त संवाद.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवकांशी Sangram Kote Patil यांनी साधला मुक्त संवाद.

*चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी प्रमोद खिरटकर*

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तथा राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष Sangram Kote Patil चंद्रपूर जिल्हा दौऱ्यावर आले असता स्थानिक चंद्रपूर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या युवक पदाधिकाऱ्यांशी आतापर्यंतच्या वाटचाली संदर्भात मुक्त संवाद केला. सदर मुक्त संवाद या कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर यांनी केले होते.

कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन करून करण्यात आली, तसेच मुख्य वक्ते असलेले संग्राम कोते पाटील यांचे शॉल, श्रीफळ व शिवाजी महाराजांची मूर्ती देत स्वागत सत्कार करण्यात आला. राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस व राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी संग्राम कोते पाटील असताना त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे संघटन वाढीकरिता महाराष्ट्र राज्यात जवळपास साडेतीन लाख किलोमीटर एवढा प्रवास केला होता.

तसेच मराठवाड्यासह राज्यातील दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांसाठी स्कॉलरशिप, फी माफी, विद्यापीठ उपकेंद्रे सुरू करणे, रोजगार विषयासंबंधीची वेगवेगळी मोठे रस्त्यावर उतरून आंदोलने केली होती. या सर्व कार्याची दखल घेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. ना. श्री. अजितदादा पवार यांनी कोते पाटील यांचेवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस तथा राष्ट्रवादी युवक काँग्रेस व राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस चे राज्य समन्वयक पदाची जबाबदारी सोपविली.

क्रीडा, साहित्य, राजकीय, सांस्कृतिक, शैक्षणिक, औद्योगिक तथा चित्रपट क्षेत्रातील अनेक दिग्गज मान्य वरांशी स्नेहाचे संबंध जोपासणारे संग्राम कोते पाटील हे चंद्रपूर जिल्हा दौऱ्यावर आले असता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील युवक पदाधिकारी तथा कार्यकर्त्यांना त्यांच्या अनुभवातून पक्ष संघटन वाढीसाठी फायदा होईल तथा विविध क्षेत्रातील प्रश्नांबाबत संवाद साधता येईल या हेतूने जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर यांनी चंद्रपूर येथे कार्यक्रमाचे आयोजन केले होते व त्या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवक पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती देखील दर्शविली.

सदर कार्यक्रमात प्रमुख वक्ते व मार्गदर्शक म्हणून मा. संग्राम कोते पाटील उपस्थित होते. तसेच या कार्यक्रमाचे आयोजक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर यांचेसह, चंद्रपूर शहर जिल्हाध्यक्ष राजीव कक्कड, राष्ट्रवादी कॉग्रेसप्रदेश सचिव आबिदअली, जिल्हा राष्ट्रवादी युवक कॉग्रेस अध्यक्ष राकेश सोमानीराष्ट्रवादी काँग्रेस चंद्रपूर विधानसभा अध्यक्ष सुनील काळे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे चंद्रपूर शहर जिल्हाध्यक्ष अभिनव देशपांडे.

राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष सुजीत उपरे, राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष प्रशांत झांबरे, वैद्यकीय सेल जिल्हाध्यक्ष पंकज धेंगारें, राष्ट्रवादी सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष अमर गोमासे, अजितदादा पवार विचार मंच चे प्रदेश उपाध्यक्ष दीपक काटकोजवार, राष्ट्रवादी काँगेस चंद्रपूर तालुकाध्यक्ष श्रीनिवास गोस्कुला, सोशल मीडिया शहर जिल्हाध्यक्ष मनोज सोनी उपस्थित होते.

सदर कार्यक्रमाच्या यशस्वी ते करिता जिल्हा उपाध्यक्ष अमोल ठाकरे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष तीमोती बंडावार, रोशन फुलझेले, गणेश बावने, सुरेश नायर, संजय शेजुळ, नितिन घुबडे, सचिन मांडाले, राहूल भगत, राकेश रेपेल्लीवार, वसंत नाथर, राजकुमार खोब्रागडे, संजय खेवले, अश्विन सल्लम, निशांत वाकडे, विशाल नायर, राजु रेड्डी, अनुकूल खंडाळे, केतन जोरगेवार, सौरभ घोरपडे, कुलदीप सिंह.

रकिब सय्यद, अंकीत धेंगारे, प्रफुल्ल कुचनकर, पियुष चांदेकर, सिंहल नगराळे, संजय गौरकार, पवन जाधव, राहुल वाघ, संजय विश्वास, धीरज दुर्योधन, योहान येरगुराला, संदीप बिसेन, पवन बंडीवार, राहुल रेव्वेल्लीवार, अश्विन ठोंबरे, निलेश टोंगे, रोशन ढवळे, संजय रामटेके, प्रणित सरकार, सनी शर्मा, अमोल पारशीवे, सतिश मांडवकर यांनी केले असुन कार्यक्रमाचे उत्कृष्ठ संचालन प्रसिद्ध वक्ते प्रलय म्हशाखेत्री यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

five − 4 =