Maratha Arakshan व Marathi शाळा रक्षणाकरीता एकवटले साकुरकर.

Maratha Arakshan व Marathi शाळा रक्षणाकरीता एकवटले साकुरकर.

Maratha Arakshan: आंतरवालीमध्ये मराठा योद्धा मनोज जरांगे पाटिल आपल्या समाज बांधवांना आरक्षण मिळावे म्हणून अन्न पाण्याचा त्याग करून आमरण उपोषणाला बसलेले आहे. त्यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत चालली असतांना त्यांना पाठिंबा.

म्हणून ता. १ नोव्हेंबर २३ रोजी सकाळी नऊ वाजता पासुन तालुक्यातील साकुर येथील ग्रामस्थांनी एकत्र येऊन महाराष्ट्रातील मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे व राज्यातील Marathi शाळा दत्तक देऊ नये म्हणून आंदोलन करण्यात आले आहे. जोपर्यंत मराठा आरक्षण मिळत नाही तोपर्यंत गावामध्ये सर्व पक्षीय नेत्यांना गाव बंदी करण्यात आली असल्याचे बोर्ड गावाच्या मुख्य द्वारा जवळ लावण्यात आले.

तालुक्यातील साकुर या गावी सर्व जाती धर्माचे लोकं गुण्यागोविंदाने रहातात. परंतु आपल्या सोबत रहाणाऱ्या मराठा समाजाला आरक्षण सरकारने द्यावे म्हणून सर्व जाती धर्माच्या लोकांनी गावातील ग्रामपंचायत येथे एकत्र येऊन मराठी शाळा वाचवा आणि मराठ्यांना आरक्षण द्या अशा घोषणा करत गावामधून मुख्य द्वारा पर्यंत मोर्चा काढण्यात आला. तसेच जरांगे पाटील यांना पाठिंबा जाहीर व आरक्षण मिळेपर्यंत सर्व पक्षीय नेत्यांना गाव बंदीचे पोस्टर गावाच्या वेशीवर लावण्यात आले.

यावेळी गावाचे सरपंच कांचन शिंदे, उपसरपंच शिवाजी सोमवंशी, प्रतिष्ठित संतोष जाधव, नंदु कदम, दत्तात्रय काकडे, विलास शिंदे, श्रीधर पवार, मयुर भोसले, संजय भोसले, संतोष गावंडे, संतोष पवार, अतुल शिंदे, सुरेश धुमाळे, कविता भालेराव, जिजा काकडे, उषा शिंदे, वनिता जाधव, भुषण गावंडे सह शकडो महिला पुरूष सहभागी झाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

20 − four =