उमरखेड येथे सकल मराठा समाजाचा कॅन्डल मार्च,महिलांचा उत्स्फूर्त सहभाग.

उमरखेड येथे सकल मराठा समाजाचा कॅन्डल मार्च,महिलांचा उत्स्फूर्त सहभाग.

उमरखेड येथे सकल मराठा समाजाचा कॅन्डल मार्च,महिलांचा उत्स्फूर्त सहभाग.

उमरखेड : मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी येथील स्थानिक छत्रपती शिवाजी महाराज चौकातून दि 31 ऑक्टोबर च्या सायंकाळी सकल मराठा समाजाच्या वतीने शहरातून कॅन्डल मार्च काढण्यात आला यात महिला , वृद्ध, युवक , युवतीसह मोठ्या संख्येने सकल मराठा समाज बांधव सहभागी झाले होते .

सकल मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा आणि समाजाला आरक्षण मिळावे म्हणून सकल मराठा समाज जाच्यावतीने शहरातून कॅण्डल मार्च चे आयोजन करण्यात आले होते .
शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मनोज जरांगे पाटील यांच्या पाठिंबाच्या फलकासह या मोर्चाला सुरुवात झाली . या कॅन्डल मार्चमध्ये ‘आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं ,कोण म्हणते आरक्षण देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही, एक मराठा लाख मराठा , अशी प्रचंड घोषणाबाजी कॅण्डल मार्चमध्ये करण्यात आली .

शहरातून फेरी काढत हा कांडल मार्च छत्रपती शिवाजी चौक पासून गांधीचौक ते सराफा लाईन ,चौबारा गणपती मंदिर, नाग चौक, संजय गांधी चौक ते मराठा उपोषण मंडपी सांगता करण्यात आली.

यावेळी शहरातून शेकडोच्या संख्येने सकल मराठा समाज बांधव सहभागी झाले होते .

उमरखेड तालुक्याच्या इतिहासात पहिल्यांदाच महीला एवढ्या मोठ्या संख्येने एकत्रित आल्याचे दिसून आले .
मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आज उमरखेड शहरात पहिल्यांदाच असंख्य महिला भगिनी व तरुणी कॅण्डल मार्च च्या माध्यमाने सहभागी झाल्या होत्या .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

sixteen + 5 =