Saif Ali Khan Property : सैफ अली खान कुटुंबाची 15 हजार कोटींची संपत्ती जप्त होणार?

Saif Ali Khan Property : बॉलिवूड मधील प्रसिद्ध अभिनेते सैफ अली खान Bollywood Actor Saif ali Khan यांच्यावर मागील आठवड्यात चाकू हल्ल्याची चौकशी सुरु असतानाच आता सैफ यांची आणि त्यांच्या कुटुंबाची हजारो कोटींची संपत्ती जप्त केली जाणार आहे.

सैफ अली खान कुटुंबीय नवाब खानदान आहे.आणि त्यांची हजारो कोटींची संपत्ती मध्यप्रदेश आणि इतरत्र आहे.आता मध्य प्रदेशातून या संदर्भात मोठी बातमी समोर आली आहे. मध्य प्रदेश राज्य सरकार सैफ अली खानच्या कुटुंबाची 15 हजार कोटी रुपयांची संपत्ती कधीही ताब्यात ताब्यात घेऊ शकते.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now

यासाठी सरकारकडून जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत.सैफ अली खान यांच्या कुटुंबाची ही पैतृक संपत्ती का जप्त होणार यामागे अनेक कारणे आहेत.

गुरूग्राम,भोपाळच्या “कोहे फिजा’पासून चिखलोद, पर्यंत सैफ अली खान,शर्मिला टागोर,पतौडी कुटुंबाची मालमत्ता.

नुकतेच सैफ अली खान यांच्या हरियाणातील गुरुग्राम येथील पतौडी पॅलेस मध्ये सैफ कुटुंबीय राहण्यासाठी गेले होते,त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांची संपत्ती वर देशभरात चर्चा सुरू झाली.Pataudi Family Property In GuruGram.गुरुग्राम मध्ये सैफचे वडिलोपार्जित घर, त्याच्या संपत्तीचा मोठा हिस्सा आहे.

या मालमत्तेची किंमत अंदाजे 800 कोटी रुपये आहे.150 खोल्यांचा वाडा, ज्याला ‘इब्राहिम कोठी’ म्हणूनही ओळखले जाते,ही संपत्ती 10 एकरांपेक्षा जास्त क्षेत्रात पसरलेली आहे.पण पतौडी खानदान आणि सैफ यांच्या कुटुंबाची गुरूग्राम येथील या संपत्ती पेक्षा कित्येक पटीने जास्त आणि हजारो कोटींची प्रॉपर्टी ही मध्यप्रदेशात विस्तारलेली आहे.

भोपाळच्या “कोहे फिजा’पासून चिकलोद पर्यंत सैफ अली खान आणि शर्मिला टागोर यांच्या पतौडी कुटुंबाची मालमत्ता पसरलेली आहे. सध्या पतौडी कुटुंबाच्या मालकीच्या 100 एकर जमिनीवर तब्बल दीड लाख लोक वास्तव्यास आहेत.

मात्र भोपाळचे राजघराणे आणि नवाबाच्या संस्थानाच्या ऐतिहासिक मालमत्तांवर 2015 या वर्षात न्यायालयाने जी स्थगिती दिली होती ती आता संपुष्टात आलेली आहे.त्यामुळे आता मध्यप्रदेश सरकार सैफ अली खानच्या कुटुंबाची ही 15 हजार कोटी रुपयांची संपत्ती कधी ताब्यात घेऊ शकते,अशी शक्यता आहे.

उच्च न्यायालयाच्या आदेश,पण पतौडी कुटुंबाने अपील 30 दिवसांत अपील केली नाही.

नुकतेच समोर आलेल्या माहितीनुसार,मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने Madhya Pradesh High Court. पतौडी कुटुंबाशी संबंधित मालमत्ता प्रकरणात दाखल केसेस मध्ये अभिनेता सैफ अली खान, नवाब मन्सूर अली खान पतौडी यांच्या पत्नी आणि सैफ यांच्या आई शर्मिला टागोर, सैफ यांची बहीण सोहा अली खान,मन्सूर खान पतौडी यांची बहीण सबीहा सुलतान यांना शत्रू संपत्ती प्रकरणात न्यायालयाच्या अपिलीय प्राधिकरणासमोर पतौडी कुटबाची बाजू मांडण्याचे आदेश दिले.

यासाठी उच्च न्यायालयाने या संदर्भात जो आदेश दिला होता,त्यात पतौडी कुटुंबाला यासाठी अपील करण्यास 30 दिवसांचा अवधी दिला होता. मात्र ही मुदत संपलेली असतानाही आहे.या संपत्तीवर पतौडी कुटुंबाकडून कोणताही नवीन दावा झालेला नाही.मात्र यात उच्च न्यायालयाचे डिव्हिजन बेंचमध्ये आव्हान देण्याचा मोठा पर्याय सध्या पतौडी कुटुंबाकडे आहे.

पतौडी कुटुंबाच्या शत्रूसंपत्ती प्रकरणात हस्तक्षेप करण्यास नकार.

गेल्या महिन्यात मध्य प्रदेश उच्च न्यायालयाच्या जबलपूर मधील खंडपीठाने पतौडी कुटुंबाची मालमत्ता प्रकरणी शर्मिला टागोर, मुलगा सैफ अली खान आणि सबीहा सुलतान यांच्या शत्रू संपत्ती प्रकरणात हस्तक्षेप करण्यास नकार दिलेला आहे.

मात्र जबलपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती विवेक अग्रवाल यांच्या एकसदस्यीन बेंचने पतौडी कुटुंबाला शत्रू संपत्ती अभिरक्षक अधिनियम प्रकरणात दिल्ली येथील अपिलीय प्राधिकरणासमोर पतौडी कुटुंबाला अर्ज करण्याचं स्वातंत्र्य देण्यात आला होता.

Jabalpur High Court Bench Order On Saif Ali Khan Property Right दिल्ली अपिलीय प्राधिकरणाने या प्रकरणात पतौडी कुटुंबाकडून जर अपील झाला तर याच्या गुण दोषाच्या आधारावर निर्णय घ्यावा, असे जबलपूर बेंचने येथील प्रकरणाचा निपटारा करताना दिल्या आदेशात म्हटले आहे.

पतौडी कुटुंबाने कोणती याचिका दाखल केली होती.

सरकारकडून मध्य प्रदेशांमध्ये असलेल्या पतौडी कुटुंबाची संपत्ती संदर्भात शत्रू संपत्ती अधिनियम १९६८ च्या अंतर्गत भोपाळच्या शेवटच्या नवाबाच्या संपत्तीवर नियंत्रण आणण्यासाठी सरकारने निर्णय घेतला होता.

त्यामुळे मध्य प्रदेश सरकारच्या या निर्णयाविरुद्ध पतौडी कुटुंबाकडून वर्ष 2015 मध्ये याचिका दाखल केली होती.यात शत्रू संपत्ती अधिनियम 1967 अंतर्गत भोपाळमधील पतौडी नवाबाच्या संपत्तीवर नियंत्रण आणण्यासाठी सरकारने जो निर्णय घेतला त्याला आव्हान देण्यात आला.

का घेतला होता सरकारने निर्णय.

महत्वाचे म्हणजे पतौडी नवाब खानदानाची भोपाळ आणि मध्यप्रदेशात नवाबी संपत्ती विस्तारलेली असताना भोपाळच्या शेवटचे नवाबांची मोठी मुलगी राजकुमारी आबिदा सुलतान ह्या 1950 साली पाकिस्तानला वास्तव्यास गेल्या.त्यामुळे भोपाळ मधील आबिदा सुलताना यांच्या नवाबी खानदान मध्ये त्यांच्या हिश्श्यात असलेली मालमत्ता वर नवाबाच्या मृत्यूनंतर त्यांची दुसरी मुलगी मेहर ताज साजिदा सुलतान बेगम यांना भोपाळ येथील संपत्तीच्या उत्तराधिकारी अधिनियम १९४७ नुसार उत्तराधिकारी घोषित करण्यात आले होते.

आता पतौडी कुटुंबीय या मालमत्तेचे उत्तराधिकारी असल्याने त्यांची याचिका या शत्रू संपत्ती Enemy Property Act 1968 नियंत्रण अधिकार अधिनियमात महत्वाची आहे.मात्र उच्च न्यायालय जबलपूर बेंचने या संदर्भात जो आदेश दिला होता,त्यात पतौडी कुटुंबाने अपीलसाठी दिलेल्या 30 दिवसांचा अवधीत अपील दाखल न केल्याने या संपत्तीवर पतौडी कुटुंबाकडून कोणताही नवीन दावा नाही, असे समजून मध्य प्रदेश सरकार या संपत्ती ताब्यात घेण्यासाठी कारवाई करीत आहे मात्र सैफ अली खान आणि त्यांचे पतोडी कुटुंबीय आपल्या भोपाळ मधील मालमत्तेसंदर्भात सरकारी ताबा होत असताना पुढील न्यायालयीन भूमिका काय घेतात,हे पाहणे खूप महत्त्वाचे ठरणार आहे.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now
Sharing Is Caring:

Leave a Comment

10 + fifteen =

Whatsapp ने लॉंच किया नया फीचर , Whatsapp Channels. 5 पड़ावों से होकर गुजरता है रिश्ता. देश के सबसे महंगे वकील Harish Salve ने 68 वर्ष की उम्र में की तीसरी शादी. रूस ने मार गिराए यूक्रेन के  3  ड्रोन. रूस का लूना – 25 चांद पर क्रैश.