Saif Ali khan Attack : सैफ अली खानच्या पाठीत चाकू खुपसून असताना हॉस्पिटल मध्ये नेले.घरात घुसून असा झाला सैफ वर हल्ला!

Saif Ali khan Attack : प्रसिद्ध चित्रपट अभिनेते सैफ अली खान यांच्या वर मुंबई येथील बांद्रा येथील राहत्या घरी घुसून अज्ञात व्यक्तीने चाकूने वार करून त्यांना गंभीर जखमी केले आहे. सैफ अली खान यांच्यावर चाकूने हल्ला केल्याची माहितीची पृष्टी मुंबई पोलिस आणि डॉक्टरांनीही केली आहे.

मुंबई येथील सैफ अली खान यांच्या घरात झालेल्या या घटनेदरम्यान त्यांचे कुटुंबीय सुरक्षित असल्याची माहिती देण्यात आली आहे. या घटनेनंतर चित्रपट सृष्टीसह सर्व खळबळ उडाली असून मुंबई पोलिसांनी या संपूर्ण घटनेचा तात्काळ तपास सुरू केला आहे.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now

(Saif Ali khan Attack) सैफ अली खान यांच्यावर हल्ला झाल्यानंतर त्यांना पहाटेच गंभीर अवस्थेत लिलावती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले,तेथे डॉक्टरांनी त्यांच्या जखमांवर शस्त्रक्रिया केलेली आहे.यात काही जखमा गंभीर स्वरूपाचे असल्याचे डॉक्टरांनी म्हटले आहे,दरम्यान त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती सुद्धा देण्यात आलेली आहे.

असा झाला अभिनेते सैफअली खान वर हल्ला (Saif Ali khan Attack)

या घटनेनंतर समोर आलेल्या माहितीनुसार , बांद्रा भागात असलेल्या सद्गुरु शरण अपार्टमेंट मधील टॉप फ्लोर वर असलेल्या घरात चित्रपट अभिनेते सैफ अली खान हे राहतात.गुरुवारी पहाटे अज्ञात चोर हा गुरुवारी पहाटे सैफ अली खान यांच्या टॉप फ्लोर वर असलेल्या घरात चोरीच्या उद्देशाने घुसला होता. यावेळी सैफ अली खान यांच्या घरात कार्यरत कर्मचाऱ्यांनी आरडाओरड सुरू करताच या चोराने तेथून पळून जाण्याचा प्रयत्न केला.

यावेळी घरात मोठी आरडाओरड ऐकुन सैफ अली खान हे झोपेतून जागे झाले आणि ते आपल्या बेडरूम मधून बाहेर येताच,तो अज्ञात चोर त्यांच्यासमोर उभा ठाकला. चोर आणि सैफ अली खान समोरासमोर आल्यानंतर सैफ अली खानला काही समजण्यापूर्वीच त्या चोराने आपल्याजवळ असलेला चाकू काढून सैफ यांच्यावर हल्ला केला. यादरम्यान चोराने त्यांच्यावर एकूण 6 वार केले, यातून सैफ यांना गंभीर स्वरूपाच्या जखमा झालेली आहे.

पोलीस (Saif Ali khan Attack) करणाऱ्या त्या आरोपीचा शोध घेत आहे.दरम्यान गुरुवारी सकाळी मुंबई पोलिस आणि सैफ अली खानच्या मीडिया टीमने या हल्ल्या संदर्भात माध्यमांना माहिती जारी केली आहे. लीलावती हॉस्पिटल द्वारे यासंदर्भात दुपारी मेडिकल बुलेटीन जारी करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली होती.

सैफ यांच्या पाठीवर आणि मनक्यावर गंभीर दुखापत.

या हल्ल्यात सैफ अली खान यांच्या मनक्याला मोठी दुखापत झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्या मानेवर आणि पाठीवर चोराने चाकुचे वार केल्याने त्यांच्या मानेवर 10 से.मी.खोल जखम झाली.

या घटनेनंतर लगेच घरातील कर्मचाऱ्यांनी पहाटे साडेतीन वाजता त्यांना रुग्णालयात हलविले त्यावेळी सैफ अली खान यांच्या पाठीत चाकू खुपसलेला होता,डॉक्टरांनी नंतर शस्त्रक्रिया करून हा शस्त्र बाहेर काढला.

संपूर्ण घटनेचा तपास सुरू

मुंबई पोलिसांना पहाटेच या घटनेची माहिती देण्यात आली.त्यानंतर पोलीस टीम तात्काळ हॉस्पिटल आणि सैफ अली खान यांच्या घरी पोहोचले आणि या संपूर्ण घटनेचा तपास सुरू करण्यात आला. या अपार्टमेंट समोरील भागात मोठे असे वॉल कंपाउंड आहे.

तो लांघुन अज्ञात आरोपी हा सैफ अली खान यांच्या टॉप फ्लोरवर घरात चोरीच्या उद्देशाने घुसला, या सद्गुरु शरण अपार्टमेंटच्या Wall compound जवळ झाडावर आणि वरील मजल्यावर तसेच विविध ठिकाणी CCTV कॅमेरे लागलेले आहे.त्यांचे फुटेज पोलिसांनी घेतल्याची माहिती दुपारी समोर आली.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now
Sharing Is Caring:

Leave a Comment

2 × 1 =

Whatsapp ने लॉंच किया नया फीचर , Whatsapp Channels. 5 पड़ावों से होकर गुजरता है रिश्ता. देश के सबसे महंगे वकील Harish Salve ने 68 वर्ष की उम्र में की तीसरी शादी. रूस ने मार गिराए यूक्रेन के  3  ड्रोन. रूस का लूना – 25 चांद पर क्रैश.