दिवाळीपूर्वी Reliance JIO चा मेगा ब्लास्ट,1100 रुपयांमध्ये 2 नवीन फोन लॉन्च.
दिवाळीपूर्वी Reliance JIO चा मेगा ब्लास्ट,1100 रुपयांमध्ये 2 नवीन फोन लॉन्च.
रिलायन्स टेली कम्युनिकेशन च्या रिलायन्स जिओ कडून वेळोवेळी आपल्या ग्राहकांसाठी नवीन ऑफर्स आणि नवीन फीचर्स मोबाईल लॉन्च होतात. यंदा रिलायन्स जिओ कडून दिवाळीपूर्वी मेगा ब्लास्ट करण्यात आला असून 11 रुपयांपेक्षा कमी किमतीत रिलायन्स जिओनी दोन नवीन मोबाईल मार्केटमध्ये लाँच केली आहे.
Reliance Jio कडून नुकतेच इंडिया मोबाईल काँग्रेस 2024 (IMC 2024) मध्ये हे दोन नवीन 4G फीचर असलेले फोन लॉन्च केले आहेत. या दोन्ही फोन मध्ये अनेक नवीन फीचर्स आहेत.
फीचर फोन V3 आणि V4 4G फीचर फोन Jio भारत सीरीज अंतर्गत हे दोन्ही बाजारात लॉन्च करण्यात आले आहेत.याचे नवीन मॉडेल्स 1099 रुपये किमतीत लवकरच बाजारात दाखल होणार आहे.विशेष म्हणजे मागील वर्षी या कंपनीने Jio Bharat V2 मॉडेल हे लाँच केले होते. यामुळे भारतीय फीचर फोन बाजारात खळबळ उडाली होती. दरम्यान रिलायन्स jio कंपनीचा दावा आहे की आता लाखो 2G ग्राहक JioBharat फीचर फोनद्वारे 4G नेटवर्क चा वापर करीत आहेत.
ही आहे वैशिष्ट्ये.
रिलायन्स jio ne हा नवीन नेक्स्ट जनरेशन 4G फीचर फोन नवीनतम डिझाईन, 1000 mAh पॉवरफुल बॅटरी, 128 GB पर्यंत स्टोरेज वाढविण्याच्या क्षमतेसह लॉन्च केला आहे. हा फीचर फोन देशातील 23 भाषांना सपोर्ट करेल.विशेष म्हणजे Jio Bharat फोन फक्त 123 रुपयांमध्ये मासिक रिचार्ज केला जाऊ शकतो. यामध्ये अनलिमिटेड व्हॉईस कॉल आणि 14 जीबी डेटाची सुविधा ग्राहकांना मिळेल.
या सुविधाही मिळेल.
Jio भारत सीरीज अंतर्गत सादर केलेले V3 आणि V4 ya दोन्ही फोन मॉडेल Jio-TV, Jio-Cinema, Jio-Pay आणि Jio-Chat सारख्या काही सर्वोत्तम प्री-लोड ॲप्ससह बाजारात येतील. 455 हून अधिक लाइव्ह टीव्ही चॅनल आणि या फोनमध्ये एका क्लिकवर ग्राहकांना चित्रपट, व्हिडिओ आणि स्पोर्ट्स कंटेंटही मिळणार आहेत.तर यात, JioPay हा पर्याय सुलभ पेमेंट प्रक्रियेसाठी सहाय्य करेल.सोबतच JioChat अमर्यादित व्हॉइस मेसेजिंग, फोटो शेअरिंग आणि ग्रुप चॅट पर्याय यात राहणार आहे.
कुठून खरेदी कराल ?
Jio Bharat V3 आणि V4 ya दोन्ही फोन मॉडेल लवकरच सर्व मोबाईल स्टोअर्स तसेच JioMart आणि Amazon वर उपलब्ध होतील.यात जियो Pay ला UPI (युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस) सोबत जोडले आहे, त्यात एक साउंड बॉक्स राहणार असून हे डिजिटल पेमेंट सहज करण्यासाठी ग्राहकांना मदत करेल.