Reliance Jio Cloud : JIO आता देणार 100 GB चा “Free Storage” Photo, Video डिलीट करण्याची आता नसेल गरज.

Reliance Jio Cloud : JIO आता देणार 100 GB चा “Free Storage” Photo, Video डिलीट करण्याची आता नसेल गरज.

Reliance Jio Cloud : JIO आता देणार 100 GB चा “Free Storage” Photo, Video डिलीट करण्याची आता नसेल गरज.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now

या डिजिटल युगात मोबाईलमध्ये डाटा स्टोरेज आज प्रत्येकाची गरज झाली आहे.मोबाईलमध्ये अधिक डाटा स्टोअर करण्याचा पर्याय नसल्याने अनेकांना महत्वाचा डाटा कसा सुरक्षित ठेवावा ही चिंता असते,मात्र आता तुम्ही जर जिओ युझर्स असाल तर तुमच्यासमोर स्टोरेजचा प्रश्न सुटलाच आहे असा समजा.कारण जीओ कडून आता क्लाउड स्टोरेज साठी “100 जी बी”स्टोअर सुविधा मिळणार आहे.

जिओ युझर्ससाठी महत्त्वाची घोषणा.

29 ऑगस्टला रिलायन्सची 47 वी वार्षिक सर्वसाधारण बैठक झाली.यात रिलायन्स इंडस्ट्रिजचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत.यापैकी जिओ युझर्ससाठी मोठी खुशखबरी त्यांनी देताना जिओ युझर्सना आता 100 GB पर्यंत स्टोरेज वापरता येणार आहे.अशी घोषणा केली.विशेष म्हणजे या दिवाळीपासून जिओ युझर्सना ही सुविधा मिळणार आहे.या अंतर्गत वेलकम ऑफर नुसार जिओ युजर्सना आता 100 GB स्टोअर आणि एक्सिस मिळणार आहे.

देशात मोठ्या लोकसंख्येला AI(Artificial Intelligence) वर आधारित सेवा देण्याचा उद्देश्य.

मुकेश अंबानी यांनी वार्षिक सभेत घोषणा करताना.म्हटले की, जिओ वापरकर्त्यांना आता 100 GB पर्यंत मोफत क्लाउड स्टोरेज मिळेल. याद्वारे युझर्स त्यांचे फोटो, व्हिडिओ, कागदपत्रे,यासह सर्व महत्त्वाचा डेटा आणि डिजिटल कॉन्टेंट सुरक्षितपणे स्टोअर करू शकणार.यामागचा उद्देश फक्त मोफत स्टोरेज उपलब्ध करून देणे नसून देशात मोठ्या लोकसंख्येला AI(आर्टिफिशियल इंटीलिजेंस) वर आधारित सेवा उपलब्ध करून देणे ही आहे.यावेळी मुकेश अंबानी यांनी हॅलो जिओची देखील घोषणा केली असून AIच्या मदतीनं जिओ सेट टॉप बॉक्स चालवणंही आता खूप सोपं होणार आहे. जियो टीव्हीच्या ओ एस ला सेट टॉप बॉक्समध्ये आणणं आता शक्य झालं आहे. IOT – द्वारे जिओ टीव्ही, लाईट, एसी आणि घरातील उपकरणं प्रत्येकजण ऑपरेट करू शकणार आहे.

आता जिओ ब्रेनची सेवा ही मिळणार.

रिलायन्स इंडस्ट्रिज कडून डिजिटल युगात मोठ्या सुविधा देत आहेच.5-जी ची सेवा सुरू केल्यानंतर आता नुकतेच.हॅलो जिओ सुरू झाले होते,त्यात आता भर म्हणून रिलायन्स कडून जिओ ब्रेनची घोषणा करण्यात आली आहे.यात जिओ ब्रेन नावाचा एक AI प्लॅटफॉर्म असणार आहे. याकरिता गुजरात येथील जामनगरमध्ये विशेष AI सेंटर उभारला जाणार आहे.या वार्षिक बैठकीत मुकेश अंबानी यांनी माहिती दिली की,जिओचे देशात 49 कोटी ग्राहक आहेत.ते महिन्याला सरासरी 30GB डेटा वापरतात. तर दुसरीकडे जिओच्या होम ग्राहकांची संख्या आता 3 कोटी आहे.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

nine + 8 =