Red Number Plate : भारतात रस्ते वाहतुकीसाठी अनेक नियम बनविलेले आहे,यात वाहनांना नंबर प्लेट लावणे बंधनकारक आहे.Number Plates सर्व वाहनांवर लावणे अनिवार्य आहे नंबर प्लेट नसली तर Traffic Police आणि वाहतूक विभागाकडून थेट कारवाई करून त्याच्याकडून दंड आकारण्यात येतो. देशात विविध वाहनांसाठी वेगवेगळ्या रंगाचे नंबर प्लेट लावण्याचे नियम सुद्धा निर्धारित आहेत.{Rules For Vehicles Numbers Plates And Colors}.
अनेकदा आपण रस्त्यांवर धावणाऱ्या वाहनांवर विविध रंगाच्या नंबर प्लेट पाहत असतो.यात सर्वसामान्य नागरिकांच्या वाहनांसाठी पांढऱ्या रंगाची नंबर प्लेट निर्धारित केलेली आहे. तर दुसरीकडे क्देशात फक्त काहीच वाहनांना लाल रंगाची नंबर प्लेट लावण्यात येते,त्यामुळे सर्व सामान्य नागरिकांना ही लाल रंगाची नंबर प्लेट का लावण्यात आलेली आहे? आणि यासाठी काय नियम आहेत?लाल रंगाची नंबर प्लेट कोण वापरतात?आणि हे लावल्याने काय होते असे अनेक प्रश्न विचारले जातात,तर आपण या माध्यमातून पाहून घेऊया की ते कोण अतिविशिष्ट व्यक्ती असतात आणि त्यांच्या विशिष्ट वाहनांनाच लाल रंगाची प्लेट का लावण्यात येते.
सर्वसामान्य वाहनधारकांसाठी नंबर प्लेट पांढऱ्या रंगाची निर्धारित
देशात आणि महाराष्ट्रात सर्व प्रकारच्या इंधन आणि इलेक्ट्रिक वाहनांना नंबर प्लेट लावणे गरजेचे आहे.वाहनावर Number Plate नसले आणि असे वाहन रस्त्यावर चालविल्यास,जागोजागी उभे असलेले वाहतूक पोलीस कारवाई नियमानुसार वाहनचालकाकडून दंड वसूलतात आणि त्याला चलान देण्यात येते.
अनेकदा रस्त्यावरून विविध रंगांच्या वाहनांवर विविध रंगांचे नंबर साठी पाटी लावलेली असते.अनेकदा शौकीन लोक निर्धारित नंबर प्लेटवर आपल्या परीने विविध आकार प्रकारात नंबर प्लेटवर नियमांचे उल्लंघन करून नंबर लिहितात, मात्र सर्वसामान्य वाहनधारकांसाठी नंबर प्लेट पांढऱ्या रंगाची निर्धारित केलेली आहे.पर्यावरण पूरक वाहन म्हणून इलेक्ट्रिक वाहनांना हिरव्या रंगाचे नंबर प्लेट असते.
पण देशात लाल रंगाची नंबर प्लेट फक्त काहीच वाहनांवर वापरण्यात येते. लाल रंगाची नंबर प्लेट का लावण्यात येते हे 90 टक्के लोकांना माहिती नसण्याची शक्यता आहे.तर चला जाणून घेवू या लाल रंगाच्या Numbers Plates विषयी…..
Red Number Plate : या वाहनांसाठी वापरल्या जातात लाल रंगाची प्लेट.
देशात वाहनांवर लाल रंगाची नंबर प्लेट फक्त दोन अतिविशिष्ट प्रकारात येणारे व्यक्तींच्या वाहनांवर लावली जाते. यात देशाचे प्रथम नागरिक आणि भारताचे राष्ट्रपती असल्याने अतिसुरक्षित वाह्नावर लाल रंगाची नंबर प्लेट लावण्यात येते.
{The President Of India}आणि विविध राज्यांच्या राज्यपालांच्या कारवर लाल रंगाची नंबर प्लेट लावली जाते.{Governor Of State}महत्वाचे म्हणजे भारताचे राष्ट्रपती आणि देशातील विविध राज्यांची राज्यपाल यांच्यासाठी वापरण्यात येणाऱ्या वाहनांवर मागे आणि पुढे फक्त लाल रंगाची पाटी असते.
{Secure Vehicles For VVIP Persons Of India}त्यात कोणतेही नंबर लिहिले जात नाही,या लाल पाटीवर फक्त भारताची राजमुद्रा असलेला अशोक चिन्ह लावलेला असतो.{Ashok Stambh]यामुळे देशातील या अतिविशिष्ट व्यक्तींच्या वाहनांची एक वेगळी ओळख असते.
राष्ट्रपती आणि राज्यपालांच्या वाहनांच्या कॅनव्हाय मध्ये या वाहनांच्या मागेपुढे लाल रंगाची पाटी आणि अशोक चिन्ह असल्याने हे कार व्हीव्हीआयपी असते.आणि त्याला सुरक्षा यंत्रणेतील वाह्नांचा घेरा असतो.{Convoy Of President Of India}
कार कंपन्यांकडून केली जाते अशा विशिष्ट कारची चाचणी.
वाहन उत्पादन कंपन्यांना जेव्हा अतिविशिष्ट व्यक्ती असलेले राष्ट्रपती आणि राज्यपाल यांच्यासाठी वाहन उपलब्ध करण्याचा आदेश असतो,तेव्हा अशा कंपन्या अतिविशिष्ट व्यक्तींसाठी नवीन कार बनविताना याची चाचणीसाठी आणि प्रसिद्धीसाठी ते वाहन रस्त्यावरून चालवितात.
यावेळी सुरुवातीलाच या वाहनांना लाल रंगाची पाटी लावण्यात येत असते.असे वाहन रस्त्यावरून चालविताना लोकांचे लक्ष वेधण्यात येते, याने ही कार सर्वसामान्य लोकांसाठी उपलब्ध नसल्याचाही संदेश जातो,आणि दुसरीकडे अतिविशिष्ट व्यक्तींसाठी लाल रंगाची नंबर प्लेट लावून या कारचे टेस्टिंग सुरू असल्याची माहिती प्रशासनाला असते.
हे आहे लाल रंगाच्या नंबर प्लेट चे महत्व
देशात अतिविशिष्ट व्यक्तींच्या प्रवासासाठी वाहनांवर लाल रंगाची नंबर प्लेट लावण्यात येते.देशाच्या काही सर्वात महत्त्वाच्या व्यक्तींच्या सुरक्षेसाठी ही बाब राखीव आहे.लाल रंगाची नंबर प्लेट एका प्रकारे देशातील अतिविशिष्ट व्यक्तींची सुरक्षा आणि त्यांचे प्रतिष्ठेचे प्रतिक असते.देशातील सर्वसामान्य नागरिकांना आणि कितीही व्हीआयपी व्यक्ती असला, तरीही कोणताही व्यक्ती लाल रंगाची नंबर प्लेट आपल्या वाहनासाठी वापरू शकत नाही.
देशात सर्वसामान्य वाहनांमध्ये वापरण्यात येतात या रंगाचे नंबर प्लेट.
देशात विविध प्रकारचे वाहनांसाठी विविध प्रकारची नंबर प्लेट नियम बनविण्यात आलेली आहे.अतिविशिष्ट व्यक्तिमत्व राष्ट्रपती आणि विविध राज्यातील राज्यपाल यांच्या वाहनांसाठी फक्त लाल रंगाची पाटी वाहनांवर लावण्यात येते.
त्यांच्या व्यतिरिक्त कोणीही या लाल रंगाचा नंबर प्लेट मध्ये वापर करणार नाही याची दक्षता प्रशासनाकडून घेण्यात येते.कारण या लाल रंगाचे नंबर प्लेट देशाच्या अतिविशिष्ट व्यक्तींसाठी प्रोटोकॉल आणि Code of Counduct मध्ये महत्त्वाचे स्थान असते,यामुळे लाल रंगाच्या नंबर प्लेट चे वेगळे महत्त्व असते.या गाच्या नंबर प्लेट व्यतिरिक्त देशात विविध वाहनांसाठी खालील रंगांचे नंबर प्लेट वापरण्यात येतात ते आपण पाहूया.
- पांढऱ्या रंगाची नंबर प्लेट.
वाहनांवर पांढऱ्या रंगांची नंबर प्लेट,हे सर्वसामान्य नागरिकांच्या विविध चार चाकी दुचाकी आणि इतर वाहनांसाठी वापरल्या जातात.
- पिवळ्या रंगाची नंबर प्लेट.
देशात सर्व राज्यात पिवळ्या रंगाची नंबर प्लेट ही फक्त व्यवसायिक वाहनांसाठी वापरले जाते,टुरिस्ट आणि ट्रान्सपोर्ट क्षेत्रात सक्रिय वाहनांवर पिवळा रंग वापरून नंबर प्लेट लावली जाते.
- हिरव्या रंगाची नंबर प्लेट.
देशात मागील एका दशकात वाहनांवर हिरव्या रंगाची नंबर प्लेट लावण्याचा नियम अमलात आलेला आहे.सर्व प्रकारच्या इलेक्ट्रिक वाहनांवर अर्थातच बॅटरीवर चालणाऱ्या इलेक्ट्रिक वाहनांना हिरव्या रंगाची नंबर प्लेट लावण्यात येते.या रंगाची नंबर प्लेट लावल्याने हे वाहन पर्यावरण पूरक आहे,असा संदेश देण्यात येते,कारण इलेक्ट्रिक वाहनांमुळे प्रदूषणाचा धोका टळतो.
- निळ्या रंगाची नंबर प्लेट.
भारतात वाहनांवर निळ्या रंगाची नंबर प्लेट फक्त विविध विदेशी दूतावासांच्या कारसाठी = वापरात येते.देशात फक्त विदेशी राजदूतांच्या वाहनांवरच निळ्या रंगाची नंबर प्लेट लावण्याचा नियम आहे.