समर्थ वाचनालयात “Reading Inspiration Day”.

समर्थ वाचनालयात “Reading Inspiration Day”.

घाटंजी: येथील श्री समर्थ वाचनालयात रविवारी माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम यांची जयंती “Reading Inspiration Day” म्हणून साजरी करण्यात आली. प्रारंभी दीपप्रज्वलन व ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉ.एस.आर. रंगनाथन व डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमा पूजनाने झाली. अध्यक्षस्थानी श्री समर्थ वाचनालयाचे अध्यक्ष. म.मो चोपडे होते.

तर प्रमुख उपस्थितीत प्राचार्य. देवदत्त जकाते तसेच रामजी आडे विद्यालय आर्णीचे शिक्षक सुधीर बनसोड उपस्थित होते. देवदत्त जकाते यांनी डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्या जीवनावर प्रकाश टाकला आणि “वाचन प्रेरणा दिन” व वाचनाचे महत्व आपल्या प्रास्ताविकेतून पटवून दिले. शासनाकडून २०१५ पासून डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम यांची जयंती “वाचन प्रेरणा दिन” म्हणून साजरी करण्यात येत आहे.

“वाचाल तर वाचाल” तसेच “ग्रंथ हेच आपले गुरू” याबद्दल माहिती सुधीर बनसोड यांनी सांगितली.विद्यार्थ्यांनी रोज एक तास वाचन केलेच पाहिजे, वाचना शिवाय माणूस विद्वान होऊ शकत नाही. समाज ज्ञानसंपन्न होण्यासाठी तसेच कल्पना शक्तीला वाव मिळण्या साठी वाचन आवश्यक आहे असे प्रतिपादन म.मो चोपडे यांनी आपल्या भाषणातून केले.

डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम लिखित ग्रंथाचे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या “३५० व्या राज्यभिषेक सोहळ्याच्या” निमित्याने शिवाजी महाराजांवरील पुस्तकांचे प्रदर्शन भरवण्यात आले व सामूहिक १ तास वाचन करण्यात आले. संचालन समर्थ वाचनालयाच्या ग्रंथपाल ज्योती सोनटक्के यांनी केले तर आभार लिपिक योगेश गजबे यांनी मानले. कार्यक्रमाला विद्यार्थी , वाचकांची बहुसंख्येने उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

twenty − 12 =